द्राक्ष बागेची खरड छाटणीनंतर हायड्रोजन सायनामाईड

एप्रिल छाटणीनंतर द्राक्षबागेत एकसारख्या व जोमदार फुटी निघण्यासाठी द्राक्ष बागेची खरड छाटणी एक डोळा राखून करणे आवश्‍यक आहे,द्राक्षबागायतदार बऱ्याच वेळा दोन डोळे राखून छाटणी घेतात. यामुळे वरचा बारीक डोळा लवकर फुटतो व जुना महत्त्वाचा आणि जाड असा खालचा डोळा सुप्तावस्थेत राहतो. एक डोळा राखूनच छाटणी केल्यास खालचा डोळा दोन दिवस उशीर फुटेल, परंतु एकसारखी व जोमदार फूट निघण्यास मदत होईल. खरड छाटणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हायड्रोजन सायनामाईडची पेस्टिंग करावी. अनेक द्राक्षबागायतदार या वेळी हायड्रोजन सायनामाईड वापरत नाहीत. तरीसुद्धा बागेत फुटी निघतात. परंतु वातावरणात तापमान जास्त व आर्द्रता कमी असल्याकारणाने बाग मागेपुढे व उशिरा फुटते. तेव्हा हायड्रोजन सायनामाईड कमी प्रमाणात असले तरी (25 ते 30 मि.लि. प्रति लिटर) चालेल, परंतु पेस्टिंग अथवा फवारणी केल्यास बाग लवकर फुटण्यास मदत होईल,हायड्रोजन सायनामाईड २०० लिटर पाण्यासाठी एक लिटर + ७०० ग्रम १३.०.४५ + २५ मिली उच्च प्रतीचे स्टीकर मिसळून दुस-या किंवा तीस-या दिवशी ओलांद्यावर फवारणी करावी. करावी. यामुळे ओलांडा डागाळणार नाही. ज्या वेळी तापमान 40 ते 42 अंश से. असते, त्या वेळी बाष्पीभवन जास्त होते. अशा परिस्थितीत प्रति द्राक्ष वेलीस 20 लिटर पाणी द्यावे. घड निर्मितीच्या कालावधीत (खरड छाटणीनंतर 40 ते 60 दिवस) वेलीला पाण्याची गरज कमी (किमान दहा लिटर प्रति वेल) असते. तेव्हा या कालावधीत वेलीच्या वाढीचा विचार करून पाणी व्यवस्थापन करावे. काडीच्या परिपक्वतेकडे लक्ष द्यावे. त्यासाठी पालाशची उपलब्धता व शेंडा पिंचिंग करावे.
अधिक वाचा
.........................................................