
द्राक्षाची लागवड :द्राक्ष पिकाचा कालावधी हा ४ ते ५ महिने झाडावर असते.त्या वरील रोग व किडीच्या बंदोबस्तासाठी द्राक्ष बागायतदार औषधाची फवारणी करतात परंतु फळ पक्व होण्यापूर्वीच फवारणी बंद केली जाते.तेव्हा द्राक्ष तयार झाल्यानंतर त्यामध्ये शक्यतो औषधांचे अंश शिल्लक राहत नाही.आज जवळपास सर्वच द्राक्ष बागायतदार आपली द्राक्ष निर्यात करतात.परंतु निर्यातीसाठी द्राक्ष आकारमान हे १६ ते २० मिमी असावे लागते.म्हणून द्राक्ष वेलीवरील प्रत्येक घड हा निर्यातच होतो असे नाही.जो माल निर्यातक्षम असेल तो निर्यात होतो.व राहिलेला माल हा लोकल बाजारपेठेत जातो.तेव्हा द्राक्ष खाणे हे हानिकारक नाही.हे आता सिद्ध झाले आहे.भारतात मोठ्या प्रमाणात द्राक्षाची लागवड केली जाते. पुणे, सातारा, नाशिक, खानदेश तसेच पंजाबमध्येही द्राक्षलागवड केली जाते. युरोपमध्ये अधिक व्यापक प्रमाणात द्राक्षबागा उभारल्या जातात. द्राक्ष हे उत्तम प्रतीचे फळ आहे. रंगांवरून द्राक्षाचे हिरवी, काळी आणि लालसर काळी असे प्रकार तर बियांसह आणि बियाविरहित असेही प्रकार आढळतात. आयुर्वेदाने सबीज द्राक्षे श्रेष्ठ तर बिया नसलेली द्राक्षे अल्पगुणी मानली आहेत. काळ्या द्राक्षाचा वापर औषधांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. द्राक्षांपासून जॅम, ज्यूस, जेली, वाइन, व्हिनेगर बनवले जाते. द्राक्षे वाळवून मनुका, बेदाणे बनवले जातात. औषधांसाठी द्राक्षाचे बी, फळ, पाने यांचाही वापर होतो.
द्राक्षाची पौष्टिकता:
* द्राक्षात कॅल्शिअम, कॉपर, आयर्न, मॅग्नेशिअम, मॅंगनीज, पोटॅशिअम, सल्फर, सिलिकॉन असे पोषक घटक असतात.
* द्राक्षात जीवनसत्त्व सी आढळते त्यामुळे त्वचारोगावर उपयुक्त.
* जीवनसत्त्व बी 1, बी 2, बी; तसेच फ्लेवोनाइड्स आढळतात, जी शरीरास हितकर असतात.
* द्राक्षाचा रंग जेवढा गडद तितकी फ्लेवोनाइड्स अधिक असतात.
* त्वरित ऊर्जानिर्मितीसाठी द्राक्षाचा उपयोग होतो.
* द्राक्षबियांतील सॅलिसिलेटमुळे रक्त गोठत नाही, प्लेटलेट्स चिकटत नाहीत, त्यामुळे ती ऍस्पिरिनसारखी काम करतात.
* द्राक्षात ग्लुकोज असल्याने तापाने आजारी रुग्णांना द्राक्ष आवर्जून द्यावे; मात्र मधुमेहींनी द्राक्षाचे फार सेवन टाळावे.
* ताजी द्राक्षे योग्य प्रमाणात खाल्ल्यास बद्धकोष्ठतेवर गुणकारी ठरतात.
* डोळ्यांच्या आरोग्यासाठी द्राक्षे उपयुक्त असतात.
* द्राक्षामध्ये आढळणारे फोलेट गर्भवतींसाठी उपयोगी ठरते. या काळात योग्य प्रमाणात द्राक्षांचे सेवन करावे.
* रक्तशुद्धीसाठी द्राक्षाच्या रसाचा (ज्यूस) उपयोग होतो.
* द्राक्षातील फायटोकेमिकल्सचा कर्करोग, हृदयविकाराच्या प्रतिबंधासाठी उपयोग होतो.
* आपल्या शरीरासाठी एका व्यक्तीने कमीत कमी ६ किलो द्राक्ष एका सिझन मध्ये खावी.तेव्हा आपल्या शरीराची झीज उत्तम प्रकारे भरून निघते.
गुणकारी द्राक्ष
* द्राक्षफळ तोंडाला उत्तम रुची आणि स्वाद आणते.
* भूक-तहान शमविण्यासाठीही वापरता येते.
* शरीराचे आणि मनाचेही पोषण त्यातून होते.
* द्राक्षसेवनाने शरीराला व मनाला उत्साह,ऊर्जा, स्फूर्ती मिळते.
* शरीरसंवर्धनासाठी द्राक्ष उपयुक्त ठरते.
* अशक्तपणावरही द्राक्षे गुणकारी ठरतात.
* औषधी गुणधर्मामुळे द्राक्ष हा उत्तम उपचार समजला जातो.
द्राक्षाची निवड आणि वापर
* ताजी, घट्ट द्राक्षे निवडून घ्यावीत. ती सुरकुतलेली नसावीत. पिवळसर द्राक्षे मधुर असतात. शक्यतो रंगाने पिवळी द्राक्षे निवडावीत आणि लवकर संपवावीत. साठवण करू नये.
* द्राक्षे प्रथम पाण्यात बुडवून ठेवावीत. हलक्या हाताने चोळून स्वच्छ करावीत आणि मग खावीत.
0 आपली प्रतिक्रिया » :
टिप्पणी पोस्ट करा
द्राक्ष बागे विषयी आपली कोणतीही समस्या आम्हाला लिहून पाठवा.आम्ही आपल्या समस्याचे निश्चितच निरसन करू.प्रश्न तुमचा उत्तर तज्ञाकडून दिले जाईल.