नविन द्राक्षबागेत मालकाडी तयार करतांना

द्राक्ष बागेत फेब्रुवारी महिन्यात री-कट घेतल्यानंतर ओलांडे तयार करून मालकडी तयार केली जाते. हे काम जर वेळेवर करता आले नाही तर अशा परिस्थितीत फळधारक काड्यांची संख्या कमी होते. तेव्हा वेगवेगळ्या उपयोजना; तसेच व्यवस्थित  कामे करून वेलीवरील सांगाडा पूर्ण करून मालकड्या तयार करून घ्याव्यात.

 री -कट हा शक्यतोवर जानेवारी महिन्यात दुसरा आठवडा किंवा ज्या वेळी वातावरणातील तापमान किमान १५ अंश सेल्सिअसच्या पुढे वाढायला सुरवात होते, त्या वेळी घ्यावा. री-कट घेण्याच्या आठ ते दहा दिवसांपुर्वी कलम काडी सुतळी सोडून, बांबूपासून अलग करून शक्यतो वाकून घ्यावी. एकसारखी व लवकर फुट निघण्याकरिता हायड्रोजन सायनामाईडचे पेस्टिंग महत्वाचे असते.
  प्रत्येक काडीला पेस्टिंग केले किंवा नाही याची खात्री होण्याकरिता त्यामध्ये रंग किंवा सल्फरयुक्त बुरशीनाशके मिसळावीत. डोळे फुगण्याचा अवस्थेत उडद्या नावाच्या किडेपासून संरक्षण मिळण्याकरिता री-कटच्या पाच ते सहा दिवसांनंतर फवारणी घ्यावी.नवीन निघालेल्या फुटीपैकी शक्यतो खालची फुट निवडावी. या वेळी वरची फुट सहा इंच लांबीची होताच तिला शेंडा पिंचिंग करून खालची फुट वाढेल. यामुळे री-कट घेतल्यानंतर कुठल्याही रोगास प्रसार होण्याचे टळेल. जर दोन्ही फुटी एकसारख्या वाढत असल्यास दोन-खोड पद्धतीचा वापर करून वेलीला वळण देता येईल. नवीन फुटीला सुतळीच्या साह्याने बांबूला बांधून घेतल्यास खोड सरळ राहील. वेलीचा सांगडा तयार करतेवेळी फुट पहिल्या तारेच्या पाच ते सहा इंच खाली कापल्यास(पंजा) इंग्रजी 'व्ही' अक्षराप्रमाणे प्राथमिक ओलांडे तयार होतील. आशा प्रकारच्या ओलांडयावर सूर्यप्रकाश जास्त पडत नसल्यामुळे सनबर्न टाळता येतो.
  दुसरे ओलांडे तयार करण्याकरिता ती फुट तारेच्या तीन ते चार इंच मागे घेतल्यास त्या फुटीला ओलांडा तयार करतांना स्टॉप अ‍ॅन्ड गो पद्धतीने चालावे. पहिल्या वर्षी वेलीवर अंगावर (खोड) काडया तयार न करता ओलांडे तयार करून घ्यावे. ओलांडा तयार होऊन काही काडया मिळाव्यात याकरिता चार-पाच पानांवर फुट पिचिंग करावी. यालाच आखूड सबकेन म्हटले जाते.
  हे फक्त पहिल्या वर्षीच करावे. वेलीला या वेळी प्रत्येक मि.मी. बाष्पीभवनानुसार ४२०० लिटर पाणी प्रती हेक्टर प्रति दिवस याप्रमाणे पूर्णता करावी. फुटीची शासकीय वाढ करून घेण्याकरिता नत्राचा  पुरेपूर वापर करावा. पहिल्या वर्षी खुंटवेलीवर फेरसची कमतरता जाणवते, तेव्हा गरजेप्रमाणे वेलीला फेरस सल्फेटची उपलब्धताकरून घ्यावी. शक्यतोवर वेलीला काही दिवसांच्या अंतराने स्लरीमधून खते द्यावीत, यामुळे पानांचा आकार, चमक व पानांवरील ताजेपणा आढळून येईल ओलांडा तयार होत असताना फुटी मागेपुढे येत असताना आढळतील. या कड्यांमध्ये घडनिर्मिती करून घेण्याकरिता ओलांड्याच्या पहिल्या टप्प्यात २५० पीपीएम लिहोसीन (क्लोरमेक्वाट क्लोराइड) फवारणी व दुस-या  आठवड्यात पुन्हा दुसरी फवारणी तेवढीच मात्रा घेऊन करावी.
  युरासील व ६-बीए ची फवारणी फुटी नऊ ते दहा पानांवर येताच करून घ्यावी. ओलांडयाचा पहिला टप्पा संपताच वेलीला स्फुरदाची उपलब्धता करून घ्यावी. वेलीला री-कट व वळण देण्याचे नियोजन करावे. अशा वेळी वेलीला पालाशची उपलब्धता करून काडीची परिपक्वता करून घ्यावी.   

1 आपली प्रतिक्रिया » :

टिप्पणी पोस्ट करा

द्राक्ष बागे विषयी आपली कोणतीही समस्या आम्हाला लिहून पाठवा.आम्ही आपल्या समस्याचे निश्चितच निरसन करू.प्रश्न तुमचा उत्तर तज्ञाकडून दिले जाईल.

.........................................................