द्राक्षाची (एप्रिल) खरड छाटणी
१) छाटणीच्या १५ ते २० दिवसांपूर्वी म्हणजे द्राक्ष बाग माल उतरविल्या नंतर लगेचच २० टन कुजलेले शेणखत व २० किलो नत्र १०० किलो स्फुरद (दाणेदार) प्रति एकर द्यावेत.
२)खुंटावरील द्राक्ष वेलीस स्वमुळा वरील द्राक्ष वेलीच्या तुलनेत ३-४ दिवस पाण्याचा ताण द्यावा.
३)खुंटावरील जुन्या द्राक्षबागेत हायड्रोजन सायनाईडचा वापर एकसारखी फुट निघण्याकरिता करावा.
४)छाटणीनंतर डोळे फुटण्याचा अवस्थेत उघडल्यापासून संरक्षणाकरिता कार्बारील फवारणी करावी.
५) ४-५ पानाच्या अवस्थेत अशक्त, डबल येणा-या कड्या काढून प्रत्येक दोन स्क्वेअर फुटास १ ते १.२५ काडी राखावी,म्हणजेच विरळणी करावी.
६)जोमदार वाढीच्या (५पानाच्या) अवस्थेत ५०० पीपीएम लिहोसीनची फवारणी करावी.अथवा पाण्याचा ताण द्यावा.
७)छाटणीपासून ३० दिवसापर्यंत नत्र व पाणी भरपूर द्यावे व वाढ करून काडी दमदार करून घ्यावी.
८)बागेला आवश्यक असलेले पाणी उपलब्ध असल्यास ९ पानांच्या अवस्थेत ७ पानांवर खुडून सबकेन तयार करावे अन्यत:सरळ काडी ठेवावी.
९)४५ ते ६० दिवसांच्या कालावधीत नत्र बंद करून पाण्याची मात्रा १/३ करावी.
१०)शेंडा खुड्ल्यानंतर आलेल्या बगलफुटीवर ५ पाने आल्यानंतर पुन्हा ५०० पीपीएम लिहोसीनची फवारणी द्यावी.
११)४५ ते ५० दिवसाच्या काळात ५० किलो प्रती एकर पालाश द्यावे. यामुळे द्राक्षकाडी सशक्त होऊन भूरीसारख्या रोगास जास्त बळी पडत नाही.
१२) ५ पाने व १२ पाने या अवस्थेत ५० पीपीएम युरासिलची फवारणी द्यावी.
१३)४०व्या दिवशी १० पीपीएम ६-बीए ची फ़वारणी द्यावी.
१४)१५ पानाच्या अवस्थेत शेंड्याची पिंचींग करावे.म्हणजे काडी सरळ राहील.
१५)पाऊस जास्त असल्यास किंवा तसे वातावरण जास्त काळ असल्यास लिहोसीनची फवारणी मात्रा वाढवून द्यावी व वाढ थांबवावी.
१५)एकसारखी नवीन फुट काढू नये त्यामुळे तयार झालेले अन्नद्रव्य वाया जाते.
१७)६० दिवसातनंतर पुन्हा पालाश देऊन पक्वता करून द्यावी.
१८)कोरडया वातावरणात भूरीचा प्रादुर्भाव फवारणी करून टाळावा.
१९)तयार झालेल्या कड्या तारेवर सुतळीने बांधून घ्याव्यात. त्यामुळे सूर्यप्रकाश एकसारखा पडेल व घडनिर्मिती चांगली होईल.
२०)६० दिवसानंतर पाण्याची मात्रा कमी करावी म्हणजे नवीन फुट जास्त येणार नाही.
२१)काडी पक्व झाल्यानंतर व शक्यतोवर बुरशी नाशकांची आणि किडनाशकाची फवारणी संपल्यानंतर पावसाळी व आर्द्रतेच्या वातावरणात व्हर्ट्रीसेलीयम 2-3 फ्वारण्या कराव्या म्ह ण जे मिलीबग आटोक्यात राहील.

Rss Posts
0 आपली प्रतिक्रिया » :
टिप्पणी पोस्ट करा
द्राक्ष बागे विषयी आपली कोणतीही समस्या आम्हाला लिहून पाठवा.आम्ही आपल्या समस्याचे निश्चितच निरसन करू.प्रश्न तुमचा उत्तर तज्ञाकडून दिले जाईल.