प्रश्न तुमचे उत्तर तज्ञांचे

द्राक्ष बागेत काम करतांना अनेक समस्या येतात.या समस्यांसंदर्भात द्राक्ष बागायतदारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची तज्ञांनी दिलेली उत्तरे......


मातीचे आणि देठाचे पृथ:करण नियमीत करणे गरजेचे आहे काय?
-निदान करणे :अशा पध्दतीचे पृथ:करण वेलीमधील अन्नद्रव्यांचा असमतोलपणा, कमतरता व त्यांचे जास्त प्रमाण (विषमता) तपासण्यासाठी केली जाते.असे पृथ:करण केल्यास वेलीतील प्राकृतिक बिघाड कि,जो उत्पादकता कमी करतात,तो समजण्यासाठी मदत होते.कधी कधी वेलीमधील दोन पेक्षा अधिक मुलद्रव्यांची कमतरता आढळल्यास ती ओळखणे अवघड ज़ाते अशा वेळेस देठाचे पृथ:करण करणे जरुरीचे बनते.भुरी सारख्या रोगाचे लक्षण क़ि ज्यात पानांच्या बाहेरील बाजु आतमध्ये वळतात,पालाश कमतरतेशी मिळती जुळती असतात,द्राक्षबागायतदार अशा स्थितीत गोंधळून जातो.वेलीच्या मुळ्य़ांभोवती पाणी साठून राहिल्यास,तेथील हवा खेळती राहत नाही,आणि त्यात जर क्षारतेची भर पडली तर पाने तशीच लक्षणे दाखवतात. अशा पस्थितीत निरोगी वेल व आजारी वेल बाजुला करुन त्यांचे पृथ:करण केले जाते.त्यांचे नमुने एकत्र करण्यासाठी देखील निरोगी व आजारी वेल निवडली जाते.


निरीक्षण : अशा पध्दतीने पृथ:करण हे वेलीमधील अन्नद्रव्याची योग्य रितीने देखरेख करते. जेणे करुन आपणास परिणामी उत्पादन मिळते.यामुळे वेलींना लागणा-या अन्नद्रव्यांची चालु हंगामात गरज आणि अन्नद्रव्यांनवर निष्फळ खर्च कमी करता येतो. आपण सुक्ष्म घड निर्मीतीच्या वेळेस आणि घडांची फुलोरा अवस्थेत देठ पृथ:करण करण्यास शिफारस करतो,यामुळे वेलीमधील घडांचा दर्जा व उत्पादनासाठी लागणा-या अन्नद्रव्यांची निरीक्षणे करावयाची असल्यास, बागेत विशिष्ठ ठिकाण शोधुन प्रत्येक वेळेस त्याच वेलीवरुन नमुने गोळा करावेत.यामुळे अन्नद्रव्यांचे आणि त्यामुळे वेलीच्या उत्पादकतेचे निरीक्षण करणे देखील सोपे जाते.
मातीचे पृथ:करण हे हंग़ाम सुरु होण्य़ापूर्वी आणि खते देण्याआधी करुन घेणे महत्वाचे आहे, यामुळे जमीनीतील सामु,विद्युत वाहकता आणि विशिष्ठ मुलद्रव्यांचे कमी आधिक प्रमाण ओळखता येते,आणि त्याच प्रमाणात त्यांचे व्यवस्थापन करता येते.वेलीवरील संशोधनाद्वारे आपणाला असे निदर्शनास आले आहे की,वेलीतील गरज आणि जमिनीत असलेल्या अन्नद्रव्यांची मात्रा यांचा परस्पर संबंध हा एक सारखा नाही.म्हणूनच वेलीमधील अन्नद्रव्यांचे निरीक्षण क़ऱण्यासाठी देठ पृथ:करण करणे जरुरीचे आहे.


कलम यशस्वी होण्याकरिता कोणती परीस्थीती असावी?
- कलम यशस्वी होण्याच्या दृष्टीने बागेतील वातावरणात तापमान ३५ अंश से.पर्यंत व आद्रता ८० टक्क्यांच्यापुढे असणे मह्त्वाचे असते.खुंटकाडी ही पुर्ण परिपक्व झालेली नसुन,रसरशीत असल्यास त्या काडीतुन कलमजोडाच्या मध्यमातुन सायन काडीमध्ये रस पुढे जाईल व कॅलस लवकर तयार होण्यास मदत होईल.या गोष्टीसोबत कलम करणा-या कारागीराची कुशलता तेवढीच महत्वाची आहे.


कलम करण्याकरिता सायनकाडी (डोळ ) ही स्वमुळावरील की खुंटावरील वेलीवरुन घ्यावी?
- कलम करण्याकरीता सायनकाडी ही कोणत्याही प्रकारच्या वेलीवरुन घेतल्यास हरकत नाही.या मध्ये काडीची निवड क़ऱताना महत्वाचा मुद्दा हा आहे, की सायनकाडी परीपक्व झालेली असावी.ही काडी खुंटकाडीला मॅच होइल व मजबुत,फुगीर डोळे असलेली असावी.


रुटस्टॉक बागेतील काडया फारच बारीक असल्यास दोन काड्यांना जोडुन कलम करता येईल का?
-बागेत पुर्णपणे कलम यशस्वी होण्याकरीता काडीची जाडीसुध्दा तेवढीच महत्वाची आहे.बागेत एक दोन ट्क्के अशा दामनाच्या जाडीच्या( दोन-तिन एम एम) काड्यांनवर कलम करता येईल.यामधे फक्त प्रयत्न करता येईल.काही कलम यशस्वी होईल किंवा नाही याची जास्त खात्री नसेल.बागेत पुर्ण काड्या अशाच असल्यास शक्यतो कलम करु नये.


मी किती प्रमाणात खते वेलींना देऊ?
-वरती सांगितल्या प्रमाणे, वेलींना तंतोतंत प्रमाणात अन्नद्रव्ये देणे,हे वेलीच्या देठाचे व मातीचे परिक्षण क़ऱूण ठरवता येईल.वेलींना देण्यात येणा-या पाण्याचा दर्जा देखील काही प्रमाणात अन्नद्रव्ये व्यवस्थापनात मोलाचा वाटा निभावू शकतो,कारण बरीचशी मुलद्रव्ये ही पाण्यात असतात.याच्या पलीकडे कोणत्याही प्रकारची खते आपणाला द्यावयाची आहेत हे ठरवण्यासाठी पाण्याचा व मातीचा दर्जा देखील कारणीभूत ठरतो.


खुंटावर रंगीत जातीचे कलम करणे योग्य आहे का?
-बागेत असलेल्या पाण्याच्या व मातीच्या बिकट परिस्थीतीमुळे स्वमुळावरील बागेच्या उत्पादनात घट येत आहे.खुंट रोपांचा वापर सुरु झाल्यापासुन उत्पादनात वाढ झाली व सोबतच चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळु लागले.तेव्हा ,द्राक्ष जातीचा विचार न करता बागेत असलेल्या अडचणीचा विचार करुन कोणत्या खुंटाचा वापर करता येईल याकडे लक्ष द्यावे.


कलम केल्यानंतर डोळे फुटण्याकरीता किती कालावधी लागतो?
-कलम केल्यानंतर डोळे फुटण्याकरीता बागेतील वातावरण (तापमान व आद्रता) महत्वाचे असते.त्याच सोबत वापरलेली सायन काडी (डोळाची) कशी आहे, त्या काडीवरील डोळा कसा आहे, यावर ब-याच गोष्टी अवलंबुन आसतात.कलम केल्यानंतर काडी फुटायला साधारण बारा ते आठरा दिवसांचा कालावधी लागतो.


जिरणारा घड कसा समजावा?
-तीन-चार पानांच्या अवस्थेत आपल्याला घड बाहेर येतांना दिसतो.अशक्त घडाच्या तळात बाळी दिसेल व घडाचा आकार गोल दिसेल,रंग फिक्कट पिवळसर,असा घड जिरण्याची शक्यता जास्त असते.याच तुलनेत सशक्त अशा घडाचा आकार लाबट असेल व त्याच्या तळात बाळी नसेल.हा जोमदार असा न जिरणाऱा घड असेल.


घड जिरायला लाग़ताच काय करावे?
-फळछाटणी झाल्यानंतर चांगल्या वातावरणात सहा-सात दिवसानंतर डोळे फुटायला सुरुवात होते.बागेत पोंगा अवस्थेत जर वातावरण बिघडले असेल,म्हणजेच पाउस आला असेल,ढगाळी वातावरण असेल किंवा बागेत पाणी साचले असेल,अशा परीस्थीत वेलीमध्ये शरीरशास्रीय हालचालीमध्ये अडथळे येतात.पोंगा अवस्थेतील डोळ्यात सायटोकायीनचे प्रमाण कमी होउन जिबरेलीकचे प्रमाण वाढते,त्यामुळे घड जिरायला लागतो किंवा गोळी घड तयार होतो.अशा परीस्थीत बागेत सीसीसी व ६ बीए यांसारख्या संजिवकांची फवारणी करुन घड जिरण्यापासुन बागेला वाचवता येते.  


फेलफुट क़ाढण्याची योग्य वेळ क़ोणती?
-द्राक्षबागेत तिन ते चार पानांच्या फुटीनिघाल्या की घड दिसायला सुरवात होते.दोन दिवस पुन्हा थांबुन पाच पानांच्या अवस्थेत तो घड (जिरणाऱा क़िवा शसक्त) स्पष्टपणे दिसतो.तेव्हा अशा परीस्थीत फेलफुट काढुन घ्यावी यामुळे काडीतुन वाया जाणारे अन्नद्रव्ये घडाच्या वाढीकरता उपयोगात येईल. ही  फेलफुट काढण्याकरीता उशीर होणार नाही,याची बागायतदारांनी काळजी  घ्य़ावी,कारण या फुटी जेवढ्या कोवळ्या असतात,तेवढय़ाच अन्नद्रव्ये शोषुन घेण्याकरीता सक्षम असतात.     


अधिक वाचा

थोडक्यात-खरड छाटणीनंतर

द्राक्षाची (एप्रिल) खरड छाटणी
१) छाटणीच्या १५ ते २० दिवसांपूर्वी म्हणजे द्राक्ष बाग माल उतरविल्या नंतर लगेचच २० टन कुजलेले शेणखत व २० किलो नत्र १०० किलो स्फुरद (दाणेदार) प्रति एकर द्यावेत.
२)खुंटावरील द्राक्ष वेलीस स्वमुळा वरील द्राक्ष वेलीच्या तुलनेत ३-४ दिवस पाण्याचा ताण द्यावा.
३)खुंटावरील जुन्या द्राक्षबागेत हायड्रोजन सायनाईडचा वापर एकसारखी फुट निघण्याकरिता करावा.
४)छाटणीनंतर डोळे फुटण्याचा अवस्थेत उघडल्यापासून संरक्षणाकरिता कार्बारील फवारणी करावी.
५) ४-५ पानाच्या अवस्थेत अशक्त, डबल येणा-या कड्या काढून प्रत्येक दोन स्क्वेअर फुटास १ ते १.२५ काडी राखावी,म्हणजेच विरळणी करावी.
६)जोमदार वाढीच्या (५पानाच्या) अवस्थेत ५०० पीपीएम लिहोसीनची फवारणी करावी.अथवा पाण्याचा ताण द्यावा.
७)छाटणीपासून ३० दिवसापर्यंत नत्र व पाणी भरपूर द्यावे व वाढ करून काडी दमदार करून घ्यावी.
८)बागेला आवश्यक असलेले पाणी उपलब्ध असल्यास ९ पानांच्या अवस्थेत ७ पानांवर खुडून सबकेन तयार करावे अन्यत:सरळ काडी ठेवावी.
९)४५ ते ६० दिवसांच्या कालावधीत नत्र बंद करून पाण्याची मात्रा १/३ करावी.
१०)शेंडा खुड्ल्यानंतर आलेल्या बगलफुटीवर ५ पाने आल्यानंतर पुन्हा ५०० पीपीएम लिहोसीनची फवारणी द्यावी.
११)४५ ते ५० दिवसाच्या काळात ५० किलो प्रती एकर पालाश द्यावे. यामुळे द्राक्षकाडी सशक्त होऊन भूरीसारख्या रोगास जास्त बळी पडत नाही.
१२) ५ पाने व १२ पाने या अवस्थेत ५० पीपीएम युरासिलची फवारणी द्यावी.
१३)४०व्या दिवशी १० पीपीएम ६-बीए ची फ़वारणी द्यावी.
१४)१५ पानाच्या अवस्थेत शेंड्याची पिंचींग करावे.म्हणजे काडी सरळ राहील.
१५)पाऊस जास्त असल्यास किंवा तसे वातावरण जास्त काळ असल्यास लिहोसीनची फवारणी मात्रा वाढवून द्यावी व वाढ थांबवावी.
१५)एकसारखी नवीन फुट काढू नये त्यामुळे तयार झालेले अन्नद्रव्य वाया जाते.
१७)६० दिवसातनंतर पुन्हा पालाश देऊन पक्वता करून द्यावी.
१८)कोरडया वातावरणात भूरीचा प्रादुर्भाव फवारणी करून टाळावा.
१९)तयार झालेल्या कड्या तारेवर सुतळीने बांधून घ्याव्यात. त्यामुळे सूर्यप्रकाश एकसारखा पडेल व घडनिर्मिती चांगली होईल.
२०)६० दिवसानंतर पाण्याची मात्रा कमी करावी म्हणजे नवीन फुट जास्त येणार नाही.
२१)काडी पक्व झाल्यानंतर व शक्यतोवर बुरशी नाशकांची आणि किडनाशकाची फवारणी संपल्यानंतर पावसाळी व आर्द्रतेच्या वातावरणात व्हर्ट्रीसेलीयम 2-3 फ्वारण्या कराव्या म्ह ण जे मिलीबग आटोक्यात राहील.
अधिक वाचा

द्राक्ष उत्पादकांची निर्यातीकडे पाठ

निर्यात निम्म्याने घटली;उत्पादकाची पसंती स्थानिक बाजाराला,
गेल्या वर्षी युरोपिय देशांनी भारतीय द्राक्ष नाकारल्याचा परिणाम यंदाच्या निर्यातीवर दिसून आला असून,द्राक्षाची निर्यात निम्म्याने घटली आहे.महिनाभरापूर्वी सुरु झालेला द्राक्ष हंगाम आणखी आठवडाभर सुरु राहण्याची शक्यता आहे.आतापर्यत सुमारे १,६०० कंटेनर (अंदाजे २० हजार टन)द्राक्षाची निर्यात झाली आहे. गेल्या वर्षी ३ हजार ७०० कंटेनर द्राक्ष निर्यात झाली होती.
युरोपीय देशांकडून द्राक्षाला चांगला दर मिळत असल्याने दशकाभरापासून द्राक्ष निर्यातीत सतत वाढ होत गेली, या वर्षी द्राक्षांवर फवारलेल्या कीड-कीटकनाशकांचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याने कारण देऊन गेल्या वर्षी जर्मनीसह युरोपातील काही देशांनी भारतातील द्राक्ष नाकारली होती.त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी व एक्सपोर्टर यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते.युरोपातील द्राक्ष निर्यातीबाबत महाराष्ट्रातील शेतकरी अत्यंत सावध झाले आहेत.
शासकीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,या वर्षी युरोपातील नेदरलँडस,बेल्जियम आणि इंग्लंड या देशांमध्ये द्राक्ष निर्यात झाली.जर्मनीमध्ये द्राक्ष पाठवण्यास शेतक-यांची पसंती नव्हती यंदा १५ हजार शेतक-यांनी एकूण १२ ह्जार हेक्टर द्राक्षबागांची नोंदणी द्राक्ष निर्यातीसाठी केली होती, प्रत्यक्षात झालेली निर्यात मात्र मात्र कमी आहे. कारण याला निसर्ग आणि लोकल मार्केट आहे.
द्राक्षनिर्यात करणा-या एक्सपोर्टरांनी दिलेल्या माहिती नुसार, दरवर्षी निर्यात होण्यापूर्वी एकूण किंमतीच्या ४० टक्के रक्कम अदा केली जाते,उर्वरीत रक्कम द्राक्ष विक्रीनंतर खर्च वजा करून चुकते होतात.मात्र या वर्षी परिस्थती वेगळी आहे.मागील वर्षी युरोपात द्राक्ष निर्यात केलेल्या अनेक द्राक्षबागायतदारांना त्यांचे पैसे अजून मिळालेले नाहीत.त्यामुळे बागायतदारांनी याचा धसका घेतला आहे.द्राक्ष निर्यातीमध्ये नव्याने उतरलेल्या एक्स्पोर्ट कंपन्यानी सुध्दा गेल्या वर्षी निर्यातीसाठीचा आवश्यक दर्जा राखण्यास काही चुका केल्या.त्याचाही फटका या द्राक्ष बागायतदारांना सहन करावा लागला.
युरोपीय बाजारात यंदाच्या प्रतिक्रियेवर लक्ष
साधरणतः १४ एप्रिल पासून पुढे ३० दिवस भारतीय द्राक्ष निर्यातदारांनसाठी महत्वाचे असतात.या कालावधीत युरोपात प्रमुख्याने भारतातूनच द्राक्षे जात असल्याने दर चांगले मिळतात.भारतातून होणा-या एकूण द्राक्षनिर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा जवळपास ९९% असतो.त्यामुळे युरोपातील निर्यात आपल्या दृष्टीने फारच महत्वाची असते.मात्र मागील वर्षीच्या अनुभवामुळे बागायतदार कचरत आहेत.आत्ता पर्यत युरोपात पोहचलेल्या द्राक्षांचे स्वागत तेथे कसे करतात आणि त्या द्राक्षांना किती दर मिळतो,याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.या द्राक्ष उत्पादन कमी असल्याने भारतीय बाजारपेठेत द्राक्षांना चांगली किंमत मिळाली,परंतु एकरी उत्पादनात मात्र घसरण झाल्याचे चित्र दिसते.
नाशिक निर्यातदार संघ
पुणे,सोलापूर,सांगली या भागातील द्राक्ष निर्यात जवळपास संपली आहे.नाशिकमधून अजून काही प्रमाणात निर्यात सुरु आहे.मात्र,विपरीत हवामानामुळे यंदा द्राक्ष उत्पादन घटल्याचे चित्र आहे.द्राक्ष उत्पादन कमी असल्याने स्थनिक बाजारपेठेत चांगले दर ही मिळाले आहे.सरासरी ३० रुपये किलोपेक्षा आधिक दर शेतक-यांना बागेच्या स्तरावर मिळाले आहेत.त्यामुळे निर्यातीचा धोका पत्करण्याचे शेतक-यांनी टाळले.बेदाण्याला यंदा चांगले दर मिळालेल्याने बेदाणे निर्मितीलाही उत्पादकांनी प्रधान्य दिले.
द्राक्ष निर्यात पूर्णतः व्यापा-यांच्या हातात आहे,बोटांवर मोजण्याइतकेच शेतकरी स्वत:द्राक्ष निर्यात करतात.निर्यातीसाठीचे निकष कडक आहेत.शेतक-यांना शासकीय पातळीवरून सर्वतोपरी सहकार्याची गरज असते.त्यात त्रुटी असल्याने शेतक-यांनी धसका घेतला आहे.लातूर सारख्या जिल्हामधून गेल्या वर्षी सव्वादोनशे कंटेनर द्राक्षाची निर्यात झाली होती.या वर्षी ती ५० कंटेनरपर्यत खाली आली.आहे.
अधिक वाचा

गुणवत्ता आणि दर्जा व्यवस्थापन

द्राक्षाची गुणवत्ता आणि मालाचा दर्जा हा व्यवस्थापनातून होणा-या कामांवरती अवलंबून असतो. जास्तीत जास्त रसायनांच्या वापरामुळे दर्जावर परिणाम होतो. तर असंतुलित व्यवस्थापनामुळे गुणवत्ता ढसळते. पूर्वी आयुर्वेदामध्ये द्राक्षाच्या वापर बुरशी व जीवाणू नाशक म्हणून केला जात असे परंतु आजकाल त्याच द्राक्षांना काढणीपर्यंत बुरशी, बॅक्टेरीयाची लागवण होते. दिवसेंदिवस द्राक्षाची गुणवत्ता आणि त्याचा दर्जा खालावल्याचे आढळून येते. पाश्चीमात्य देशांमध्ये आंबट, गोड द्राक्षाला मागणी असते म्हणून त्या गुणवत्तेची द्राक्ष बनविली आणि कीड रोगांच्या कारणामुळे ती जर निर्यात झाली नाही तर स्थानिक बाजार पेठेमध्ये द्राक्षाला ग्राहक मिळत नाही. मग ग्राहक देखील सहज बोलतात पूर्वी सारखी द्राक्ष राहिली नाही, द्राक्ष आंबट राहिली, पांचट लागतात. म्हणजे नेमका द्राक्षाचा दर्जा ढासळला कुठे या समस्येच्या मुळापर्यंत पोहचल्यास त्यांची लागेबांधे सापडतील.
पूर्वी द्राक्षाला सहज फुगवण व गोडी मिळत होती. त्यामध्ये शेंगदाणा पेंड, सेंद्रिय खते यांचा वापर शेतकरी करत. आजकाल द्राक्षाच्या फुगवणीसाठी, साका बांधण्यासाठी अनेक कृत्रिम रसायनांचा वापर केला जातो. सीपीपीयु सारख्या रसायनाने द्राक्षामध्ये प्रथिनांची प्रमाण चांगले राखले जाते परंतु त्याचा प्रतिकूल परिणाम हा द्राक्षातील शर्करा आणि पिष्टमय पदार्थ यांच्यावर होतो. केवळ प्रथिनांच्या प्रमाण वाढीमुळे शर्करा आणि पिष्टमय पदार्थाचे प्रमाण द्राक्षात कमी होते. शर्करेमुळे द्राक्ष गोड लागतात व त्यास वजन मिळते तर स्निग्ध पदार्थामुळे द्राक्षाची चव कळते, त्याचा सुगंध दरवळतो आणि त्यांची टिकवू क्षमता वाढते. केवळ या दोन घटकांच्या  दुर्लक्षित  पणामुळे द्राक्षाची गुणवत्ता व दर्जा ढासळला असून त्या दृष्टिकोनातून शेतक-यांनी बागेचे व्यवस्थापन करावे असे वाटते.
द्राक्ष फुगवणी मधील प्रथिनांच्या वाढीबरोबर शर्करा आणि स्निग्ध पदार्थ यांचे देखील प्रमाण टिकून ठेवल्यास द्राक्षाची गुणवत्ता आणि दर्जा बागायतदारांना अनुभवता येतो.यामुळे शरद सीडलेस ,त्याच बरोबर थॉमसन,माणिक चमन,आणि सोनाका या वाणांना देखील चांगला भाव मिळतो.व मालाची टिकवू क्षमता वाढते.
अधिक वाचा

द्राक्षावरील खोडकिडा- समस्या आणि व्यवस्थापन

भारतामध्ये द्राक्षावर खोडकिडा प्रथमत: विभागीय फळ संशोधन केंद्र पुणे येथे सन १९६८ मध्ये आढळून आली.सुरुवातीस ही कीड दुय्यम स्वरूपाची होती कारण या किडीचे प्रमाण एक-दोन टक्केच दिसून येत असे शिवाय ज्या बागा जुन्या झालेल्या असत अशाच बागांमध्ये ही कीड आढळून येत असे.त्यामुळे द्राक्षबागायतदार या किडीचा प्रामुख्याने असा विचार करत नसे.परंतु द्राक्षबागायतदार खुंटाकडे वळले तस तसे या किडीचे प्रमाण वाढत असतांना दिसून येत आहे.आज या किडीचा विचार केला असता ही एक प्रमुख कीड म्हणून ओळखली जाते.हल्ली ह्या किडीचे प्रमाण ५०ते ९० टक्क्यांनी वाढले आहे.या किडीस पोषक असलेले उष्ण कोरडे वातावरण आणि पाण्याची कमतरता शिवाय योग्य खुंट रोपाची निवड न केल्या गेल्या मुळे आणि खोडावर तसेच ओलांड्यावर अनावधनाने झालेल्या जखमामुळे ही कीड वाढते.
किडीची ओळख:
खोड किडीचे भुंगेरे हे २-३ से.मी.लांब व विटकरी रंगाचे असतात शिवाय अन्टेना (मिशा)ह्या शरीरा पेक्षा  जास्त लांब असतात.हे भुंगेरे पावसाळ्यात रात्रीच्या वेळी प्रकाशाकडे आकर्षित होतात.खोड किडीची अळी ही रंगाने पांढरट पिवळसर असते.अळीचे डोळे हे चपटे असून लहान असतात.शिवाय ह्या अळीला पाय नसतात,फक्त शरीरच्या हलचाली वरून अळी खोडात किंवा ओलांड्यात मागे पुढे सरकते.
किडीचा जीवनक्रम:
खोड किडीचे मादी भुंगेरे जून-जुलै महिन्यात बाहेर पडून खोडावर किंवा ओलांड्यावर ज्या ठिकाणी वेलीला जखमा असतील तेथे किंवा जखमा करून त्यात १०० ते २०० अंडी घालते.अंडी दीड ते दोन आठवड्यात उबवून अळ्या बाहेर येतात.बाहेर पडलेल्या अळ्या खोड तसेच वलांडे पोखरण्यास सुरवात करतात.अळीने खोडात किंवा ओलांड्यात प्रवेश केल्यानंतर ४ ते ६ महिने आतच राहते.कोषावस्था हीसुद्धा आतच असते.कोषावस्था एक महिन्याची असते.कोषांतून बाहेर पडलेले भुंगेरे तीन महिन्या पर्यत जगू शकतात.अशा त-हेने एक वर्षात फक्त एकच जीवनक्रम पूर्ण होतो.
अड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्या जखमेच्या ठिकाणी पोखरण्यास सुरवात करतात.खोड किंवा ओलांडे पोखरलेल्या वेलीचे पाने प्रथम पिवळी दिसू लागतात.आणि नंतर या पानांवर सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यासारखी लक्षणे दिसू लागतात.कालांतराने अशा वेली किंवा ओलांडे वाळून जातात.खोडात किंवा ओलांड्यात जर अळी असेल अशा वेळी अळीने पाडलेल्या छिद्रातून भुसा बाहेर येत असतो.कारण जर खोडावर किवा आजुबाजूला निरीक्षण केले असता आपणास भुसा दिसून येतो.
ज्या बागा खुंटावर आहेत (रुट) अशा बागेमध्ये आपणास जरा वेगळा अनुभव येतो.कलम करतांना द्राक्ष बागायतदार चार ते पाच फुटवे ठेवतात. कलम करते  वेळी फक्त चांगल्या निरोगी पेन्सिल आकाराच्या दोन काडयावर कलम केले जाते.आणि शिल्लक फुटवे कट केले जातात. परंतु अशा ठिकाणी पेस्ट केली जात नाही.या कट केलेल्या फुटव्यावर(कड्यावर ) मादी भुंगेरे अंडी घालतात.आणि त्याच ठिकाणा पासून पोखरण्यास सुरुवात करतात.त्यामुळे आपणास खुंटावरील बागेत दुस-या वर्षापासूनच खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येतो.याचा अर्थ खुंटावरील बागेत खोड किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो असा नाही तर आपण वेलीला केलेल्या जखमांमुळे मादी भुंगे-यांना अंडी घालण्यास वाव मिळतो.म्हणून खुंटावर कलम केल्यानंतर पेस्ट केलीच पाहिजे.
व्यवस्थापन:
१) जून तसेच जुलै महिन्यात बागेजवळ प्रकाश सापळे लावले असता या सापळ्याकडे खोड किडीचे भुंगेरे आकर्षित होतात.असे आकर्षित झालेले भुंगेरे रॉकेल मिश्रीत पाण्यात नष्ट केले असता पुढील उत्पत्ती थांबेल.
२) आपल्या द्राक्ष बागेत खोडावर तसेच ओलांड्यावर जखमा होणार नाही याची दक्षता घ्यावी.जखमा असल्यास खोड तसेच ओलांड्यावर १:१  या प्रमाणात ब्लायटोस आणि कार्बारीलचे पेस्टीग करावे.पेस्टीग  हे एप्रिल तसेच ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस घेणे अधिक चांगले.
३) छाटणी आगोदर खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास असे ओलांडे,खोड किंवा काड्या करवतीने काढून घ्याव्या.आणि जखमांवर वरील प्रमाणे पेस्टीग करावे.
४)रुटस्टोकवर कलम करतांना अतिरिक्त फुटवे काढल्यानंतर त्यावर पेस्ट करावे.म्हणजे नवीन बागेत खोडकिडीचा प्रादुर्भाव होणार नाही.
५)बागेत खोड किडीचा प्रादुर्भाव झालेला आसेल अशा वेळी खोड किडीचे छिद्रे तारेच्या साह्याने मोकळी करावीत.व अशा छिद्रात इंजेक्शनच्या  साह्याने नुवान २० मिली प्रतिलीटर या प्रमाणात द्रावण तयार करून प्रत्येक छिद्रात २० ते २५ मिली या प्रमाणात सोडून छिद्र गाळाच्या साह्याने हवाबंद करावीत.नुवान खेरीज आपण क्लोरोपायरीफॉस सुद्धा वापरू शकता.क्लोरोचे प्रमाण २५ मिली प्रतिलीटर या प्रमाणात वापरावे.
६) माझ्या प्रयोगानुसार छिद्रात इंजेक्शनच्या  साह्याने जर पेट्रोल सोडून गाळाच्या साह्याने  छिद्र  लगेचच बंद केलीतर खोड कीड लगेच मरते.
विषारी आमिष वापरताना वर्षातून दोन तीन वेळेस वापरावे.
अशा त-हेने द्राक्ष बागायतदार बंधूंनी आपल्या बागेची सुरुवातीपासूनच काळजी घेतली तर निश्चित खोड किडीचे प्रमाण एकदम कमी होऊन आपल्या बागेचे होणारे नुकसान टाळता येईल.
अधिक वाचा

माहिती तंत्रज्ञान शेतीसाठी उपयुक्त


शेतीमधील नवीन तंत्रज्ञाना बरोबरीने इंटरनेटवर देखील माहितीचा प्रचंड खजिना आहे.देशातील मह्त्वाच्यासंस्थांच्या वेबसाईटवर(संकेतस्थळ)काय काय पहाल,त्याबाबतची माहिती...

 www.agri.mah.nic.in : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे.या संकेतस्थळवर कृषी विभाग,त्यातील नवी भरती ,विभागाची कार्यपद्धती आदी माहिती सुरुवातीला दिली आहे.तसेच राज्याचा नकाशा दिला आहे.त्यातील प्रत्येक जिल्हावार माउसने क्लिक केल्यावर त्या त्या जिल्हातील शेती संबधीची माहिती मिळते.त्याशिवाय बियाणे,खते,कीटकनाशके यांच्या उपल्बधतेची माहितीही या संकेतस्थळावर मिळते.विशेष म्हणजे हे संकेतस्थळ मराठी भाषेतही पाहाण्याची सोय आहे.
या संकेतस्थळावर उपल्बध असलेली महत्वाची माहिती:
१) शैक्षणिक,माती परीक्षण आणि कीडनाशक अंश तपासणी प्रयोगशाळांची माहिती
२) बाजारभाव, निर्या,किमान आधारभूत किंमत
३) शेतीसंबधित महत्वाची आकडेवारी,राष्ट्रीय पीक विमा 
४) पीक उत्पादन,प्रतवारी, अन्नप्रक्रिया, सेंद्रियशेती,जैवतंत्रज्ञान,ग्रीन हाउस, उतीसंवर्धन, एकात्मिक पीक व्यवस्थापन ,मृद व जल संधारण इत्यादीची सविस्तर माहिती 
५) हवामानाचा अंदाज,मह्त्वाचे नकाशे, सादरीकरणे, टेंडर्स 
६) मह्त्वाचे संपर्क ,प्रदर्शने,प्रशिक्षण कार्यक्रम
७) विविध योजना, जीआर, लाभार्थींची नावे, कृषीविषयक शासकीय प्रकाशने
८)राज्य शासनाचे पुरस्कारविजेते, हिवरे बाजार या गावाची यशोगाथा
९)नॅशनल हॉर्टीकल्चर मिशन आणि नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन यासंबंधीची माहिती.
या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
www.apeda.com:'कृषी व प्रक्रियायुक्त अन्न निर्यात विकास प्राधिकरण' (अपेडा) या संस्थेचे हे संकेत स्थळ आहे.यावर संस्थेची माहिती,नोंदणी करण्याची पद्धत,संस्थेची कार्य पद्धती, भारताचे निर्यात विभाग,बासमती निर्यात विकास संस्था,अभ्यास अहवाल,प्रकाशने, आपेडा कडून निर्यात केली जाणारी उत्पादने,त्यांच्या लॅब रेग्नीशन सिस्टीम,व्यापारासंदर्भातील माहिती,ट्रेड जंक्शन,आंतराष्ट्रिय किंमती, पीकनिहाय आयातदार व निर्यातदारांची यादी आदी माहिती या संकेत स्थळावर मिळू शकते.त्याच प्रमाणे काही आंतरराष्ट्रिय मह्त्वाच्या घटना, निर्यातीसंबंधी नवे निर्णय तसेच नव्या योजना,इंडीयन अ‍ॅग्री ट्रेड जंक्शन,ग्रेपनेट इत्यादी बद्दलची माहिती या संकेत स्थळावर उपल्बध आहे.ही माहिती हिंदी मध्ये पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
www.nabard.org:हे संकेतस्थळ राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेचे(नाबार्ड) आहे.बँकेची माहिती,तिची विकासकार्य,मॉडेल्स प्रकल्प,ग्रामीण अर्थव्यवस्था,नाबार्डचे विभाग,कर्जपुरवठा विषयी माहिती, नाबार्ड रुरल बॉडस,न्यूजलेटर.नोकरीच्या संधी,संद्या चालू असलेली कामे, तसेच ताज्या घडामोडी, टेंडर्स, वार्षीकअहवाल आदी बाबदची सविस्तर माहिती या संकेतस्थळावर उपल्बध आहे.या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
शेतीविषयी महत्वाची संकेतस्थळे खालील प्रमाणे 
कृषी विद्यापिठांचे संकेतस्थळे :
www.dbskkv.org:
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,दापोली 
www.mpkv.mah.nic.in:
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी 
www.mkv2.mah.nic.in
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी 
www.pdkv.mah.nic.in
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला 
  ही महाराष्ट्रतील कृषी विद्यापीठांची संकेतस्थळे आहेत.या संकेतस्थळावर विद्यापीठाची सविस्तर माहिती उपल्बध आहे.
अधिक वाचा

यशस्वी द्राक्ष उत्पादक होतांना

द्राक्ष शेती करतांना अनेक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करावा लागतो.यशस्वी द्राक्ष उत्पादक होण्यासाठी चांगले व्यवस्थापन,बाजाराचे नियोजन ,द्राक्ष पिकासंबंधीचा सतत अभ्यास व संशोधन,शेती करण्याची मनापासून प्रबळ इच्छा या गोष्टी ज्या शेतक-याकडे असतील,तो शेतकरी कधीच कर्जबाजारी होणार नाही.
द्राक्ष शेती करणे हा आता केवळ पारंपारिक शेती करण्याचा विषय नाही,अभ्यास,प्रचंड मेहनत,दक्षता घेऊन ही शेती करणे काळाची गरज आहे.बदलते हवामान,पीक परिस्थिती,तातडीने करावयाचे कामे याबाबद प्रचंड दक्ष असावे लागते.
द्राक्ष शेतीमधील काही महत्वाचे घटक:
अधिक वाचा

द्राक्ष शेतीतील नवी दिशा

द्राक्ष खाणारा ग्राहक हाच केन्द्रबिंदू मानून: त्याच्या आवडी-निवडी,प्रांतानुसार भावणारी चव लक्षात घेऊन द्राक्षाचे उत्पादन घेतले पाहिजे ,प्रत्येक द्राक्ष उत्पादकाने निर्यातक्षम द्राक्ष आणि देशांतर्गत बाजारपेठेसाठी द्राक्ष या दोन बाबी भिन्न आहेत,हे लक्षात घेतले पाहिजे ....
नाशिक जिल्हात जवळपास ६० वर्षा पासून द्राक्ष शेती रुजली आणि ती आज मुख्य 'नगदी पिक ' म्हणून नावारुपाला आली आहे.आज संक्रमण काळातून जात असलेली ही शेती काही वेळा 'आपण का करतो 'असा प्रश्न शेतक-यांना पडतो.उत्पादन क्षमतेत खूप मोठा बद्दल झाला आहे.उत्पादन खर्चातही खुपमोठी तफावत पडत आहे.अर्थाजनासाठी ते आज 'आंबट-तुरट ठरत चाललेले आहे.
नाशिक जिल्हात जवळ जवळ एक लाख ५५ हजार एकरांवर द्राक्ष लागवड झाली आहे.त्यात प्रामुख्याने निफाड तालुका,दिंडोरी,चांदवड,येवला,इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या सर्व भागांत द्राक्ष आहेत.संपूर्ण जिल्हाच द्राक्ष शेतीसाठी जणू सरसवला.आज खाण्याची द्राक्ष थॉमसन,सोनाका,गणेश,शरद सीडलेस,प्लेम सीडलेस,आणि इतर अनेक जाती ,की ज्यात द्राक्ष बागायतदारांकडे देखील काही जाती विकसित झाल्याचे चित्र आहे.गेल्या दोन वर्षापासून  द्राक्षाचा ज्यूस किंवा द्राक्षावर प्रक्रिया करून काय पदार्थ तयार करता येतील यावर  द्राक्ष बागायतदार संघ अभ्यास करत आहे.खाण्याच्या द्राक्षात फार मोठी क्रांती झाल्याचे चित्र दिसते.
अधिक वाचा

द्राक्षावरील महत्वाच्या रोगांचे नियंत्रण


द्राक्ष पिकात येणा-या विविध रोगांचे आणि त्यांची ओळखण्याची लक्षणांची माहिती मोलाची ठरते .यात रोग,रोगांचा प्रसार ,लागणीची तीव्रता यावरून रोगास कारणीभूत असलेल्या रोगजंतूंची माहिती असणे गरजेचे असते.वनस्पती आणि पिकात दोन प्रकारचे रोग उदभवत असतात अ)जैविक किंवा सूक्ष्मजंतु  ब)अजैविक किंवा सूक्ष्म जंतु शिवाय. (उदा:जमिनीची नापीकता, खते, पाणी, हवामान, सूर्यप्रकाश आदी)
अ) जैविक कारणांमध्ये बुरशी(Fungus), जीवाणू(Bacteria), विषाणू (Virus) चा प्रमुख्याने समावेश होतो.द्राक्ष पिकामध्ये या प्रमुख कारणामुळे मोठया प्रमाणात नुकसान होते.त्यामुळे वेळीच रोगाची ओळख करून त्यांचे नियंत्रणाकरीता किंवा उच्चाटना करीता कृती करणे महत्वाचे असते.रोगाचे निदान झाल्याशिवाय उपाय योजने चुकीचे ठरते.त्याकरीता द्राक्ष पिकात आढळणारे रोग,त्यांचे जीवनक्रम आणि उपाय आदीची महत्वाची माहिती असणे आवश्य असते.
(१) केवडा(Downy mildew )द्राक्ष पिकात या रोगाची लागण प्लझमोपॅरा व्हीटीकोला(Plasmopara Viticola) या बुरशी पासून होत असते.या बुरशीचे धागे एक पेशीय नळीच्या आकाराचे असतात.या बुरशीचे चर 
बीजूक वेलीच्या भागावर वाढत असतांना आपली मुळे(हॉसस्टोरिया)वेलीच्या पेशीत प्रवेशतात.यांचा शिरकाव हिरव्या भागावरील त्वचारंध्रा किंवा जखमेतून होत असतो.पानाच्या आतील भागात वाढणारी
अधिक वाचा

sitemap

अधिक वाचा

नाशिकच्या द्राक्षांना आता पेटेंट दर्जा

नाशिक - नाशिक जिल्ह्याचे प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, देशात आणि परदेशातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या नाशिकच्या द्राक्षांना अधिकृतपणे बौद्धिक संपदे (पेटेंट) चा दर्जा मिळाला आहे. केंद्र शासनाच्या चेन्नई येथील भौगोलिक उपदर्शन पत्रिकेत 31 मे 2010 ला नाशिकच्या द्राक्षांची नोंदणी झाली. याचा आर्थिक फायदा व अधिकृत संरक्षण नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांना होणार आहे. 

दोन वर्षांपूर्वी नाशिकच्या द्राक्षांचे पहिले सादरीकरण आणि संशोधन शासनाला सादर करण्यात आले. त्यासाठी भौगोलिक उपदर्शन (जिऑग्राफिकल इंडिकेशन-जीआय) रजिस्ट्री, चेन्नई या संस्थेचे पी.एच. कुरियन तीन दिवस नाशिकमध्ये होते. या तीन दिवसांच्या कालावधीत त्यांनी नाशिकच्या द्राक्षांची पाहणी व अभ्यास केला, त्यानंतर नाशिक ग्रेप्स फार्मर्स या संस्थेतर्फे दाखल करण्यात आलेल्या अर्जाचा विचार करून नाशिकच्या द्राक्षांना बौद्धिक संपदेचा दर्जा दिला. पुणे येथील ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सीचे व्यवस्थापक व सहकारी प्रा. गणेश हिंगमिरे व ऍड. रोहित मेतकरी (नाशिक) यांचे सहकार्य मिळाले.
अधिक वाचा »
अधिक वाचा

द्राक्ष उत्पादनात संजीवकाचा वापर

द्राक्षाचे उत्पादन घेण्यासाठी वेगवेगळ्या तंत्राचा अवलंब केला जातो.पीक संजीवकाचा वापर हे त्या पैकी एक आहे.पीक संजीवके म्हणजे ती एक प्रकारची सेंद्रीय रासायनिक द्रव्ये असतात.द्राक्ष पिकामध्ये वेगवेगळे परिणाम व बदल घडून आणण्याचे सामर्थ या कृत्रिमरित्या तयार केलेल्या संजीवकांमध्ये असल्याने त्याचा वापर उच्च दर्जाच्या द्राक्ष उत्पादनासाठी जगभर सर्रासपणे केला जातो.संजीवकांचा वापर केल्याशिवाय आपणास द्राक्ष उत्पादन करणे अशक्य आहे.म्हणून द्राक्षांमध्ये जिब्रेलिक अ‍ॅसिड(जी.ए.) ऑक्झिन,सायटोकायनिन्स,ग्रोथ रीटार्डटस व ग्रोथ इनहिबीटर्स या पाच प्रकारच्या संजीवकाचा वापर केला जातो.या प्रत्येक संजीवकाचे कार्य ,वापरण्याचा उद्देश व वापर करण्याच्या वेळा वेगवेगळ्या आहेत.या संजीवकांचा वापर सूक्ष्म प्रमाणात व योग्य वेळी केल्यास त्यांचे अपेक्षित परिणाम दिसून येतात.संजीवकांचा वापर सतत व अवाजवी प्रमाणात केला जात असल्याने त्यांचा काळजी पूर्वक व वाजवी प्रमाणात केला पाहिजे.द्राक्ष पिकात प्रमुख्याने वापरली जाणारी पुढील संजीवके प्रमाणे-  
१.सायकोसील(सी.सी.सी.)
हे संजीवक द्राक्ष बागायतदारांना लिहोसीन ह्या नावाने परिचित आहेत.या वाढ निरोधकाचा वापर द्राक्ष उत्पादनात एप्रिल छाटणी तसेच ऑक्टोबर छाटणी नंतर सर्रास केला जातो.या संजीवकास क्लोरमक्काट क्लोराईट (सी.सी.सी.)असेही म्हणतात.याचे रासायनिक नाव टू-क्लोरोईथाईल डायमिथाईल अमोनिया क्लोराईड असे आहे.बाजारात  हे ५०% तीव्रतेच्या द्रावणामध्ये लिहोसीन या नावाने उपलब्ध आहे.
वापरण्याचा उद्देश  
एप्रिल छाटणीनंतर वेलीवर आलेली नवीन फुट सहा ते सात पानाची असताना सायकोसील २५० पी.पी.एम.तीव्रतेच्या द्रावणाचा फवारा घेतल्यास वेलीमधील जीएची पातळी कमी केली जात असल्याने सायटोकायनिन्स व जीए यांच्या गुणोत्तरात वाढ होऊन काडीवर फळधारक डोळे तयार होण्यास मदत होते.तसेच काड्यांच्या पे-यामधील अंतर कमी केले जाते.जर काड्यांच्या पे-याची लांबी वाढली तर काड्या वांझ  फुटण्याची दाट शक्यता असते.
२. या संजीवकाच्या वापरामुळे वेलींची पाने जाड होतात व पानांमध्ये हरितद्रवव्याचे प्रमाण वाढते. यामुळे पानांच्या प्रकाश संश्लेषणांच्या कार्यात वाढ होते. तसेच लिहोसीन वापर केल्याने पानातून होणा-या बाष्पत्सर्जनाचा क्रियेचा वेग कमी केला जात असल्याने वेल पाणी टंचाईच्या काळात सुद्धा तग धरून राहू शकते.
३. ऑक्टोबर छाटणीनंतर वेलीवरील फुटी फार जोमाने वाढतात. या वेळी खोडातील अन्नरसाचा ओघ घडाच्या वाढीसाठी ओळून घडाची योग्य वाढ होण्यासाठी व घड न जीरण्यासाठी घड पोपटी रंगाचे असतांना या संजीवकाचा २५० पीपीएम एवढया तीव्रतेचा एक फवारा द्यावा यावेळी घेतलेल्या फवारणीमुळे फुलांची गळ कमी होऊन फळधारणा वाढण्यास मदत होते.
वापरतांना घ्यावयाची काळजी  
१.लिहोसीन या संजीवकाची वेलीवर फवारणी करताना जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा.
२.एप्रिल छाटणीनंतर आलेल्या नवीन फुटी ६ ते ७ पानाची असतांना व ऑक्टोबर छाटणीनंतर आलेल्या फुटीवरील घड पोपटी रंगाचा असतांना या संजीवकाचा वापर करावा.
३.या संजीवकाचा वापर योग्यवेळी केल्यास २५० पीपीएम तीव्रतेचे द्रावण चांगला परिणाम दाखवते,जर फवारणीस थोडा उशीर झाल्यास ३७५-४५० पीपीएम एवढया तीव्रतेचे द्रावण वापरावे.मात्र कोणत्याही परिस्थिती मध्ये ५०० पीपीएम पेक्षा जास्त तीव्रतेचे द्रावण वापरू नये.
४.घड फुलो-यानंतर ८ ते १० दिवसांच्या कालावधीमध्ये या संजीवकाचा वापर करु नये.कारण याच काळात मण्यामध्ये पेशी विभाजनाची क्रिया फार वेगाने होत असते.याच्या वापरामुळे पेशीविभाजनाच्या क्रियेवर विपरीत परिणाम होतो.म्हणून या काळात त्याचा वापर करु नये.
५.एखाद्या वेळेस चुकून जास्त तीव्रतेच्या लिहोसीन द्रावणाची फवारणी केली गेली तर,२०० ग्रम युरिया १०० लिटर पाण्यात विरघळून पानावर फवारणी करावी.किंवा १० पी.पी.एम एवढया तीव्रतेच्या जीएच्या द्रावणाची फवारणी करावी.
द्रावण तयार करण्याची पद्धत
हे संजीवक लिहोसीन या नावाने ५०% तीव्रतेच्या द्रावणामध्ये बाजारात मिळते व पाण्यात पूर्णपणे मिसळते.या संजीवकाचे वेगवेगळ्या पीपीएमचे द्रावण खालीलप्रमाणे तयार करावे.
 ५०० पीपीएम = १०० मिली लिहोसीन + १०० लिटर पाणी
२५० पीपीएम = ५० मिली लिहोसीन + १०० लिटर पाणी
३७५  पीपीएम = ७५  मिली लिहोसीन + १०० लिटर पाणी
४५० पीपीएम = ९० मिली लिहोसीन + १०० लिटर पाणी
२. जिब्रेलिक अ‍ॅसिड (जी.ए. )
 या संजीवकाचा वापर द्राक्ष उत्पादनात सन १९५२ पासून केला जात आहे,शास्रज्ञांनी आता पर्यत जवळ-जवळ ६० प्रकारच्या जीएचा शोध लावला आहे.परंतु  GA 3 याचा वापर द्राक्ष उत्पादनात मोठया प्रमाणात केला जातो.जीएचा वापर योग्य प्रमाणात व योग्य वेळी केल्यास आपणास अपेक्षित परिणाम दिसून येतात.जीएचा वापर पामुख्याने ऑक्टोबर छाटणीनंतर केला जातो.
वापरण्याचा उद्देश  
१. या संजीवकाचे मुख्य कार्य म्हणजे मण्यातील पेशींची संख्या न वाढवता त्या लांब व मोठया केल्या जातात. जीएच्या १०-१५ पीपीएम तीव्रतेच्या द्रावणाचा पहिला फवारा घडांचा पोपटी रंग जाऊन हिरवा होऊ लागल्यावर म्हणजेच फुलोरा उमलण्याच्या अगोदर द्यावा या मुळे मोहराची विरळणी केली जात असल्याने घड विस्तारला जातो व मणी मोठे होण्यास चांगला वाव मिळतो.
२. घडतील फुलोरा उमलण्यास सुरवात होतांना म्हणजे घडतील फुलांच्या २५% टोप्या पडल्यावर २५ पीपीएमची  बुडवणी व तेवढयाच पीपीएमच्या जीएची बुडवणी घडतील ५०% फुलांच्या टोप्या पडल्यावर करावी. जीएच्या शेवटच्या ३०/४० पीपीएमच्या दोन बुडवण्या ७५% व १००% फुलांच्या टोप्या पडल्यावर कराव्यात. या मुळे मण्याचे देठ लांब होतात व मणी लांब होतात. मण्यांची चागली फुगवण होऊन मणी एकसारखे वाढतात. एकूण जीएचा वापर १०० ते १२५ पीपीएम पेक्षा जास्त होऊ देऊ नये.
वापरतांना घ्यावयाची काळजी  
१. फळधारणा झाल्यानंतर १०-१२ दिवसांच्या कालावधीत मण्यामध्ये पेशी विभाजनाची क्रिया जोरात चालू असते. म्हणून या कालावधीतच जीएचा वापर करावा. म्हणजे आपेक्षित परिणाम दिसून येतात, नंतर वापर केल्यास काहीही उपयोग होत नाही.
२. जीएचा वापर केल्यानंतर आपेक्षित परिणामासाठी किमान १० तास पाऊस पडू नये.
३. ज्या दिवशी जीएचे द्रावण तयार केले त्याच दिवशी पूर्णपणे वापरावे. तसेच जुना जीए वापरू नये. नामांकित कंपनीचाच जीए वापरावा.
४.फुलो-याच्या काळात जास्त तीव्रतेच्या जीएचा वापर केल्यास शॉट बेरीज प्रमाण वाढते.
५.जीएच्या द्रावणात सीपिपियु व्यतिरिक्त इतर कोणतेही संजीवक किंवा रसायन मिसळणे टाळावे.
६.घडावर केवडा इत्यादी सारखे रोग असल्यास जीएची बुडवणी टाळावी.
द्रावण कसे तयार करावे
  वेगवेगळ्या पीपीएमचे द्रावण करावयाचे झाल्यास १ ग्रॅम, जीए ३० मिली अ‍ॅसिटोनमध्ये विरघळून त्यात स्वच्छ व क्षार विरहित पाणी मिसळून ते १ लिटर करावे म्हणजेच १००० पीपीएम एवढ्या तीव्रतेचे मुळ द्रावण (Stock Solution) तयार होते.
१० पीपीएम = १ ग्रॅम जीए, १ लि. मूळ द्रावण + ९९ लि. पाणी = १०० लि.
२५  पीपीएम = १ ग्रॅम जीए, १ लि. मूळ द्रावण + ३९ लि. पाणी = ४० लि.
४०  पीपीएम = १ ग्रॅम जीए, १ लि. मूळ द्रावण + २४ लि. पाणी = २५ लि.
  या संजीवकाचा परिणाम प्रामुख्याने वातावरणाचे तापमान, जमिनीतील ओलावा, फुलो-याच्या विविध अवस्था, द्राक्षाची जात, रोग व किडींचा प्रादुर्भाव आणि वेलीवरील घडांची संख्या यावर अवलंबून असतो.
३. सिक्स बीए ( बेंझाईल अ‍ॅडीनाईन )
  हे संजीवक सायटोकायनीन्स या गटांत मोडते. याचे मुख्य कार्य म्हणजे पेशी विभाजन करणे हे आहे.सायटोकायनीन्स मुखत्वे वेलींच्या मुळामध्ये तयार होतात. एप्रिल छाटणीनंतर तसेच ऑक्टोबर छाटणीनंतर या दोन्ही वेळी सिक्स बीएचा वापर प्रामुख्याने केला जातोच.
 वापरण्याचा उद्देश 
१.एप्रिल छाटणीनंतर आलेल्या फुटींचा शेंडा थांबविल्यानंतर सूक्ष्म घडनिर्मितीच्या वेळी या संजीवकाचा ५ ते १० पीपीएम एवढया तीव्रतेच एक फवारा घेतल्यास वेलीची पांढरीमुळी अधिक जोमाने चालते व जास्त कार्यक्षम बनते. पानांचे कार्य व पांढ-या मुळीचे कार्य यांचा समन्वय योग्यरित्या साधला जाऊन सूक्ष्म घडनिर्मिती जोमाने व हमखासपणे होते.
२.ऑक्टोबर छाटणीनंतर घडांमध्ये फळधारणा झाल्यानंतर घडांवर तसेच घडाच्या पुढील पानांवर ५ पीपीएम एवढया तीव्रतेच्या सिक्स बीएचा एक फवारा घेतल्यास मण्यांची फुगवण चांगली होते.गर्डलिंग करण्यास उशीर झाल्यास सिक्स बीएचा १० पीपीएमच्या द्रावणाचा फवारा घेतल्यास गर्डलिंगमुळे जी मण्यांची फुगवण होते ती फुगवण याच्या वापरामुळे मिळवता येते.
  या संजीवकाचा वापर जास्त प्रमाणात केल्यास पानांची गळ होते.म्हणून याचा काळजीपूर्वक वापर करावा. सिक्स बीएच्या जास्तीत जास्त दोन फवारण्या घ्याव्यात.मात्र एकूण वापर २० पीपीएमपेक्षा जास्त करु नये.
द्रावण कसे तयार करावे
  सिक्स बीए एक विरघळन्यासाठी आयसो प्रोपाइल अल्कोहलचा वापर करतात. १ ग्रॅम सिक्स बीए सुरवातीस आयसो प्रोपाइल अल्कोहोलमध्ये विरघळून घेऊन नंतर लागणारे पाणी घालून पुढील प्रमाणे वेगवेळ्या तीव्रतेचे द्रावण तयार करावे
५ पीपीएम = १ ग्रॅम सिक्स बीए  + २०० लि. पाणी
१० पीपीएम = १ ग्रॅम सिक्स बीए + १०० लि. पाणी
२० पीपीएम = १ ग्रॅम सिक्स बीए + ५० लि. पाणी
४.सिपीपीयू (फोरक्लोरफेन्यूरॉन)  
सिपीपीयू हे एक संयुग असून याचा सायटोकायनीन्स या गटांत समावेश होतो. या संजीवकाचे मुख्य कार्य म्हणजे पेशी विभाजन करून मण्यांचा आकार वाढवण्यास मदत करणे. जगभरात या संजीवकाचा वापर सर्रासपणे केला जातो, सध्या महाराष्ट्रातील द्राक्षबागायतदारसुद्धा याचा वापर मोठया प्रमाणावर करु लागले आहे निर्यातीसाठी लागणारी मण्यांची साईज याचा वापर जीए बरोबर करून मिळवता येते.
 वापरण्याचा उद्देश 
१.सिपीपीयू वापर जीएबरोबर केल्यास मण्यांच्या वजनात वाढ होते, मणी जास्त गोलाकार व टपोरे बनतात आणि त्यांच्या लांबी-रुंदीचा गुणक वाढविण्यास मदत होते. जीएच्या सतत वापरामुळे घडामध्ये शॉट बेरीज तयार होणे, कमी घडनिर्मिती होणे, मणी तडकणे व काढणीनंतर होणारी मण्यांची कुज इत्यादी दुष्परिणाम होत असल्याने जीएचा वापर कमी करून मण्यांची चांगली फुगवण मिळवण्यासाठी याचा वापर केला जातो.
२.निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करण्यासाठी जेवढी जीएची मात्रा द्यावी लागते तेवढी मात्रा सीपीपीयूचा वापर केल्यास द्यावी लागत नाही.
३. सिपीपीयूच्या वापरामुळे काढणीनंतर वाहतुकीच्या दरम्यान होणारी मण्यांची गळ थांबवली जाते. तसेच घडाचा देठ मजबूत होतो. घडांचे देठ शेवट पर्यंत हिरवेगार राहतात व माल ताजा राहून एकसारखा दिसतो.
४.द्राक्ष मण्यांच्या सालीत तयार होणारे अ‍ॅन्थोसायनिन्स नावाचे रंग द्रव्य थोपून धरण्यास मदत करते सीपीपीयु  संजीवक द्राक्षमण्यात रंगद्रव्य तयार होऊ देत नसल्यामुळे पिंक बेरीज या समस्येवर मात करता   येईल अशी अपेक्षा वाटते. मात्र रंगीत जातीच्या द्राक्षांमध्ये याच्या वापरामुळे मण्यातील रंगद्रव्य कमी होऊन त्यांचा रंग फिकट होण्याची शक्यता वाटते. म्हणून याचा वापर रंगीत (काळ्या)  द्राक्षांच्या जातीमध्ये जरा जपूनच करावा.    
५.सिपीपीयूच्या वापरामुळे नंतरच्या घडनिर्मितीवर काहीही अनिष्ठ परिणाम होत नाही.
  सिपीपीयूच्या संजीवकाच्या वापरामुळे घडाची पक्कवता १५ ते २० दिवस उशिरा येते. याच्या जास्त वापरामुळे मण्यांची साल जाड होण्याची शक्यता असते व मण्यांना थंडीच्या दिवसात भेगाही (मणी तडकणे) पडू शकतात म्हणून याचा वापर काळजीपूर्वक करावा.
घडतील मण्याची साईज ३ मिमी असताना २५ पीपीएम जीए बरोबर २पीपीएम सीपीपीयु मिसळून पहिला डीप घ्यावा व मणी ६ मिमी साईजचे असतांना ३ पीपीएम सीपीपीयु मिसळून २५ पीपीएम जीचा दुसरा डीप घ्यावा. यामुळे मण्यांची फुगवण चांगली होते व उत्पादनात वाढ झाल्याचे प्रयोगावरून दिसून आले आहेत.
 द्रावण कसे तयार करावे
बाजारात सीपीपीयु हे १००० पीपीएम या तीव्रतेच्या मूळ द्रावणात २५० मिली, ५००मिली किंवा १ लिटर मध्ये उपलब्ध आहे. १.५ मिली सीपीपीयु १ लिटर पाण्यात मिसळ्यास ते १.५ पीपीएमचे द्रावण तयार होते किंवा ३ मिली सिपीपीयू १ लिटर पाण्यात मिसळल्यास ते ३ पीपीएमचे द्रावण तयार होते.थोडक्यात आपणास जेवढया पीपीएमचे द्रावण तयार करावयाचे आहे तेवढे मिली सिपीपीयू घेऊन एकूण १ लिटर द्रावण तयार करावे.
५.इथ्रेल (इथेफॉन)  
हे संजीवक ग्रोथ इनहिबीटर्स (इथीलीन) या गटात मोडते. बाजारात हे इथ्रेल,इथेफॉन,सेफा या नावाने मिळते.याचे रासायनिक नाव टू क्लोरोइथाईल फॉस्फोनिक  अ‍ॅसिड असे आहे.
वापरण्याचा उद्देश 
१.ऑक्टोबर छाटणीपूर्वी सुमारे दोन आठवडे १००० ते २५०० पीपीएम एवढया तीव्रतेच्या इथ्रेलची फवारणी केल्यास वेलीची पानगळ होण्यास मदत होते.यामुळे नेमक्या डोळयांवर छाटणी करणे सुलभ जाते.तसेच छाटणीनंतर काडीवरील डोळे लवकर फुटण्यास मदत होते.
२.द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरू लागल्यावर ५०० पीपीएम एवढया तीव्रतेच्या इथ्रेलली फवारणी घडावर करावी. यामुळे रंगीत जातींच्या द्राक्षांमध्ये सर्व मणी लवकर व एकसारखे पिकतात तसेच मण्यांमध्ये साखरेचे प्रमाण वाढण्यास मदत होते.या संजीवकाचा वापरामुळे वेलीतील इथीलींचा साठा वाढविला जात असल्याने हिरव्या द्राक्षांमध्ये पिंक बेरीज वाढण्याची शक्यता असते.तर रंगीत द्राक्षांमध्ये जास्त गर्द येण्यास मदत होते.
द्रावण कसे तयार करावे 
इथ्रेल हे संजीवक पाण्यात पूर्णपणे मिसळते याची तीव्रता ४०% असते.वेगवगळ्या पीपीएमचे इथ्रेलचे द्रावण पुढील प्रमाणे तयार करावे.
१००० पीपीएम = २५० मिली इथ्रेल + १०० लिटर पाणी  
२५०० पीपीएम = ६२५ मिली इथ्रेल + १०० लिटर पाणी
२००० पीपीएम = ५०० मिली इथ्रेल + १०० लिटर पाणी
६.एनएए (napthaylin acetic acide)
हे संजीवक ऑक्झीन्स या गटात मोडते.याचा वापर ठराविक हेतूनेच द्राक्ष उत्पादनात करतात.वेलीवर घडांची संख्या मर्यादित असल्यास व इतर संजीवकांचा मात्रा योग्य प्रमाणात दिल्या असल्यास या संजीवकाचा वापर करण्याची गरज भासत नाही.घड फुलो-यातून बाहेर पडल्यापासून ते मणी बाजरीच्या आकाराचे होईपर्यतच्या काळात होणारी मणी गळ कमी करण्यासाठी २० पीपीएम एवढया तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी करावी.तसेच मणी पिकण्यास सुरु होतांना १५ ते २० पीपीएम एवढया तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी केल्यास मण्यावर लव (लस्टर )चांगली येते.द्राक्ष काढणीच्या अगोदर १० ते १५ दिवस अगोदर २० - २५ पीपीएम एवढया तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी केल्यास द्राक्ष काढणीनंतरच्या हाताळणी मध्ये होणारी मणी गळ थांबविली जाते.
अश्या प्रकारे आपण जर द्राक्ष उत्पादनात पीक संजीवकांचा वापर केल्यास निश्चितपणे निर्यातक्षम द्राक्ष पीक घेऊ शकता .
अधिक वाचा

छाटणीनंतरचे पाणी व्यवस्थापन

द्राक्ष वेलीवरील माल काढल्यानंतर खरड छाटणीपर्यतच्या कालावधीत ब-याच बागांना पाण्याचा ताण असतो;परंतु या काळात वेलीला नव्या मुळ्या येत असल्याने व वेल खरड छाटणीनंतर वाढणा-या फुटीकरीता या काळात अन्नसाठा करीत असल्याने पाण्याची फारच गरज असते,म्हणून पाण्याचा ताण या काळात देऊ नये.
खरड छाटणीनंतर पुढील २० दिवसांत पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास जमिनीच्या प्रकारानुसार मुरमाड ते मध्यम जमिनीतील द्राक्ष बागेस मोकळे पाणी (प्लड पाणी ) द्यावे. त्याचे चांगले परिणाम मिळतात.
पाणी व्यवस्थापन : या काळात वेलीवर फुटी नसतात; मात्र वेलाची फुटण्याची क्रिया चालू राहते. या वेळी ठिबक सिंचनाने मोजके पाणी देणे गरजेचे असते, म्हणजे वरंबा दीड फुट रुंदीत ओला होईल एवढे पाणी द्यावे पाणी देण्याचा कालावधी जमिनीच्या प्रकारानुसार ठरवावा.                                                                                            
  •  मुरमाड ते मध्यम प्रतीच्या जमिनीस एक दिवसाआड पाणी ठीबकने देणे योग्य.
  • खोल काळ्या जमिनीस मात्र दोन दिवसाआड पाणी ठीबकने द्यावे.
२० ते ४० दिवसांतील पाणी  व्यव्स्थापन
       हा फुटीच्या वाढीचा कालावधी असतो. या काळात फुटीचा जोम व पेरांची लांबी बघून पाणीपुरवठ्यात बदल करावा लागतो, तरीही खरड छाटणी ते पुढील २० दिवस जेवढे पाणी दिले जाते, त्यामध्ये २० टक्के वाढ करणे गरजेचे असते.
खरड छाटणीनंतर २० ते ४० दिवसांत रुट्स्टॉकवरील बागेस द्यावयाचे पाणी:
        गेल्या सहा-सात वर्षापासून बेंगरूळू रुट्स्टॉकची लागवड वाढत आहे व रुट्स्टॉक वरील बागेचे ओनरुटच्या तुलनेत ४० ते ५० टक्केच पाणी लागते, असा समज ब-याच द्राक्ष बागायतदारांमध्ये आहे. थोडे जरी पाणी जास्त झाले तरी घड तयार होण्याची प्रक्रिया फार कमी होते असे समजून या काळात भीतीपोटी फारच कमी पाणी दिले जाते. त्याचा परिणाम फुटीची जाडी न वाढणे,  पानांचा आकार छोटा राहणे व पाण्याच्या ताणामुळे वेलीस अन्नसाठा करण्यास अडचणी येतात; परिणामी फळांच्या छाटणीत मालाला वजन कमी मिळणे, दर्जा घसरणे, फुगवण कमी होणे यासारखे प्रकार होतात.
खरड छाटणीनंतर ४० दिवसा नंतर पाणी व्यवस्थापन:
  या कालावधीत फुटीचे शेंडे बंद केल्या नंतर काडी जाड होण्याचा कालावधी असतो व सूक्ष्मघड तयार होण्याचा, घडाचा आकार वाढण्याचा कालावधी असतो. या काळात पाणी जादा देऊ नये; मात्र फार पाण्याचा ताणही पडणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे असते, तापमान कमी झालेले असल्यास वरील टप्या पेक्षा १० ते १५ टक्के प्रमाण कमी करावे; मात्र तापमान कमी झालेले नसल्यास वरील प्रमाणेच पाणी पुरवठा करावा.
द्राक्षवेलीला पाण्याची नेमकी गरज:      

  • द्राक्षावेलीच्या ९० टक्के पाणी व खते घेणा-या मुळ्या वरील ३ ते ८ इंचात असतात त्यानुसार दिले जाणारे पाणी याच भागात पसरेल असे द्यावे, ८ इंचा पेक्षा खाली जाणारे पाणी हे द्राक्ष मुळाच्या दृष्टीने अत्यंत कमी उपयोगी असते.  
  • ठिबक सिंचन आपल्याकडे ज्या देशातून आले, त्या इस्राइलच्या संशोधनानुसार फळपिकांचे पूर्ण क्षमतेने उत्पादन मिळवण्याकरिता एका वेलीला अगर झाडाला वाढण्यास जमिनीच्या पृष्ठभागावरील जेवढे क्षेत्रफळ दिलेले आहे, त्याच्या ३० टक्के भाग रुंदीत ओला झाला, तरच पूर्ण क्षमतेने उत्पादन येते. उदा.: द्राक्ष बागेची लागवड नऊ बाय पाच फुट अंतरावर असल्यास वरंबा तीन फुट रुंदीत ओला झाला पाहिजे. 
  • पाणीवापरात ५० टक्क्याने बचत करण्यासाठी सर्वसामान्य पद्धत म्हणजे क्रियाशील मुळाच्या परिसरात सेंद्रीय आच्छादनाचा वापर. 
  • प्रमाणापेक्षा जादा पाण्याच्या वापरणे फळपिकांच्या मुळ्या कुजण्याचे प्रमाण वाढून पिकांची उत्पादनात ३० टक्क्यापर्यंत घट येते. 
  • प्रमाणापेक्षा जादा पाणीवापराने जमिनीत क्षारांचे प्रमाण वाढते, उत्पादकता घटते.          
 
अधिक वाचा

द्राक्षबागेतील तणांचे व्यवस्थापन

  द्राक्षबागेतील तणांचे व्यवस्थापनास द्राक्षबागेच्या उभारणीमध्ये तसेच उत्पादनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. तणांच्या व्यवस्थापनामध्ये बागायतदारांसमोर अनेक पर्याय असतात. परंतु त्याचे योग्य नियोजन हे परिस्थितीनुरूप बदलावे लागते. 
  तणांच्या व्यवस्थापणाची संकल्पना द्राक्ष उभारणी बरोबर चालू होत असते. किंबहुना बहुतेक नियंत्रणास चिवट अशा बहुवर्षीय तणांचे व्यवस्थापन द्राक्ष बाग लागवडीअगोदरच जास्त सोपे असते. द्राक्ष लागवडीसाठी जमिनीची पूर्वतयारी करीत असताना एक-दोन वेळा खोल नांगरट करून हिरळी-लव्हाळासारख्या तणांचा वाढीस कारणीभूत काश्या व गाठी गोळा करून नष्ट केल्यास द्राक्षबागेच्या उभारणीच्या सुरवातीच्या काळात या तणांचा प्रादुर्भाव होत नाही. द्राक्षबाग उभारणीमध्ये पहिली तीन वर्षे तणांचा पादुर्भाव मोठया प्रमाणावर होत असतो. त्यानंतरचे काही वर्षे वेलीच्या सावलीमुळे तणांचा प्रादुर्भाव काही अंशी कमी होत जातो. सात ते आठ वर्षानंतर मात्र चिवट अशा बहुवर्षीय तणांची मोठ्या प्रमाणात वाढ होत राहिल्याने त्याच्या बागेतील मशागतीच्या कामावर व उत्पादकतेवर परिणाम होत असतो. 
एकात्मिक तण व्यवस्थापण खालील प्रकारांनी करता येवू शकते.  
१.तणांचे भौतिक निर्मूलन 
२.तणनाशकांचा वापर 
३.जैविक पध्दतीने तणांचा नाश 
४.आच्छादनांचा वापर 
१.तणांचे भौतिक निर्मुलन   
  द्राक्षबागेतील ओळींमधील तण हाताने खुरपून काढणे आवश्यक ठरते. वेलीपासून दोन्ही बाजूस १.५ ते २ फुटापर्यंत म्हणजेच ओळींचा ३-४ फुटांचा पट्टा अशाप्रकारे तणविहिरीत करावा लागतो. या पट्ट्यामध्ये ठिबकचे पाणी मिळत असल्याने त्याचबरोबर वेलीस दिली जाणारी खते उपलब्ध असल्याने तणांची वाढ खुपच जोमदारपणे होते. छाटणीनंतर पहिले ४० ते ६० दिवस तानांची वाढ जास्त असते व त्यानंतर ती काही अंशी कमी होत जाते. कारण वेलीची सावली पूर्णतः हा भाग व्यापून टाकत असते. त्याचप्रमाणे उन्हाळा व पावसाचे कालावधीमध्ये तणे मोठ्या प्रमाणात वाढतात. त्या मानाने नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीमध्ये तणांची वाढ कमी होते. तणे फुलो-यामध्ये येण्याअगोदर खुरपून काढल्यास नंतरची वाढ लवकर होत नाही. परंतु हरळी-लव्हाळा यांसारखे तणे खुरपून काढल्या-नंतर त्यांची ३-४ दिवसातच नवीन वाढ झालेली आढळून येते.ही   पद्धत खर्चिक असली तरी आवश्यक असते व वर्षातून ९-१० वेळा अशी खुरपणी करणे भाग पडते. हरळी व लव्हाळा यासारख्या तणांचा पूर्ण बंदोबस्त करण्यासाठी जमिनीची तो पूर्ण भाग खोदुन त्यांच्या मुळासहित सर्व भाग एकत्र करून नाहीसे केल्यास त्यांवर चांगले नियंत्रण मिळविणे शक्य होते. 
१) द्राक्षबागेच्या ओळीमध्ये ३ ते ४ फुटांचा पट्टा हाताने खुरपून साफ  केला जातो. तर दोन ओळीमधील जागेमध्ये शक्यतो ट्रक्टरच्या  सहाय्याने कुळवणी करून तण काढले जाते.
२)द्राक्ष्बागेस ठिबक संचाने पाणी दिले जात असल्याने ओळींचा पट्टा किंवा बांधच फक्त ओला होत असल्याने या ठिकाणी तणांची वाढ नियमित होत राहते.
३)पावसाचा काळ वगळता इतर वेळी मधल्या भागात तणांची वाढ होत नाही.
४)ओळीमध्ये वाढणारे तण साधारणपणे दर १५ ते २१ दिवसांनी काढावे लागते व वर्षातून सरासरी ९ ते १० वेळा खुरपणी भाग पडते.
५) तणे फुलावर येण्यापूर्वी काढल्यास नंतरची वाढ लवकर होत नाही.
६)हरळी किंवा लव्हाळयासारखी तणे खुपच वेगाने वाढतात. खुरपणीनंतर ३ ते ४ दिवसांतच त्यांची नवीन वाढ सूरु असताना आढळून येते. 
२.तणनाशकांचा वापर  
द्राक्षबागेमध्ये काही तणनाशकांचा वापर करणे शक्य असते.यामध्ये प्रमुख्याने पुढील तणनाशकांचा वापर केला जातो. 
  १.ग्लायफोसेट -उगवलेल्या तणासाठी
  २.ऑक्झी फेन्यूरॉन
१) द्राक्षबागेत हरळी व इतर तृणवर्गीय तणांच्या बंदोबस्तासाठी ग्लायफोसेट या तणनाशकाचा ८ मि.ली/प्रती लिटर या प्रमाणात वापर केल्यास १५ ते २१ दिवसांमध्ये पूर्ण तणांचा बंदोबस्त होतो. ग्लायफोसेट हे आंतरप्रवाही तणनाशक असल्याने पानांद्वारे शोषल्याने ते मुळापर्यत पोहचते व मुळाचा नाश होतो.लव्हाळया सारख्या अति चिवट तणाच्या  बंदोबस्तासाठी १२ते १५ मिली /लिटर ग्लायफोसेटचा वापर करावा.या तणनाशकाचा वापर करतांना त्यामध्ये युरिया किंवा अमोनिया नायट्रेटचा १.५ ते २% प्रमाणात केल्यास ग्लायफोसेट  शोषण होऊन तणनाशकाचा परिणाम चांगला मिळतो.
२) तण उगवन्यापुर्वी ऑक्झीफेन्यूरॉन या तणनाशकाची १.५मिली/लिटर या प्रमाणात जमिनीवर फवारणी करावी.
३) तणनाशकाची फवारणी करतांना जमिनीत वापसा असावा व फवारणी नंतर २४ तासापर्यंत पाणी देऊ नये.
४) तणनाशकाची फवारणी करतांना वैशिष्टपूर्ण ट्रेड नोझल चा वापर करावा व फवारणीचे द्रावण द्राक्षवेलीच्या कोणत्याही हिरव्या भागावर पडणार नाही याची काळजी घ्यावी.
५)फवारणी करण्यापुर्वी द्राक्ष वेलीच्या बुंध्याशी वाढणा-या फुटी काढून टाकाव्या तसेच जमिनीच्या दिशेने वळलेल्या फुटी मंडपास व्यवस्थित बांधून घ्याव्या.
६) द्राक्ष बाग लागवडी पूर्वी तणनाशकांचा वापर करूनच नवीन लागवड करावी.म्हणजे पुढे काही काळ तणांची समस्या त्रासदायक होत नाही.
७) नवीन द्राक्ष लागवडीमध्ये तणनाशकाची फवारणी करतांना काळजी घेऊन वेलीच्या बुंध्याभोवती प्लास्टिक कागद धरून मगच फवारणी करावी.
८) तणनाशकाची फवारणी शक्यतो बाग छाटणीनंतर लगेच करावी.कारण या काळात वेलीवर पाने नसतात तसेच सूर्यप्रकाश जमिनी पर्यत पोहचत असल्याने तणांचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होते.
९) विशेष सूचना द्राक्षबागेत २-४-डी या तणनाशकाचा वापर कोणत्याही परिस्थितीत करू नये.
३.जैविक पद्धतीने तणांचा बंदोबस्त करणे 
जैविक पद्धतीने तणांचा बंदोबस्त खालील प्रकारे करता येऊ शकतो 
अ) पीक फेरपालट 
ब) आंतरपिके 
क) तण खाना-या किडींचा वापर 
४.आच्छादनांचा वापर 
या मध्ये चवळी,उडीद, मुग,ताग ,मका,बाजरी अशी हिरवळीची पिके जिवंत अच्छादन म्हणून घेता येतात.अशी हिरवळीची पिके फुलावर आल्यानंतर तेथेच युपटून जमिनीवर आडवी करावी किंवा जमिनीत गाडावीत,तसेच इतर उगवलेल्या गवतांचे /तणांचे अशाच पद्धतीने जमिनीवर आच्छादन केल्यास तणांचा चांगलाच बंदोबस्त होतो.
५.इतर उपाय - अ) यंत्राद्वारे जमिनीची मशागत करणे:  
 द्राक्षबागेत दोन ओळीमधील पट्टा तण विरहीत ठेवण्यासाठी यापद्धतीचा अवलंब करता येतो.दोन ओळी त्या दृष्टीने योग्य अंतर राखणे आवश्यक असते.याप्रकारे मशागत करीत असतांना वेलीपासून कमीत-कमी २  फुटांचे अंतर असावे.कोळपणी किंवा वखरणी चा वापर केला जातो.दोन ओळीमधील या जागे मध्ये तणांचा प्रादुर्भाव फक्त पावसाळी कालावधीमध्येच होत असतो.
  फवारणीसाठी तसेच इतर कामांसाठी ट्रक्टर व मजूरांचा होणारा वावर यामुळे या ठिकाणी तणे पायदळी तुडवली जातात व त्यांची वाढ आपोआप खुटते.परंतु त्याच्या नंतर वखरणी केल्यास तणांचा बंदोबस्त चांगल्या प्रकारे होतो.
ब) पाणी देण्याच्या पद्धत: 
पाणी देण्याच्या पद्धतीचा तणांच्या वाढीवर परिणाम होत असतो.प्रवाही सिंचन पद्धत द्राक्षबागेमध्ये सध्या प्रचलित नाही. परंतु काहीवेळा द्राक्षबागेस पाटपाणी दिले जाते. व त्यानंतर तणांची वाढ एकदम फोफावते. ठिबक सिंचन पध्दतीमध्ये वेलीच्या ओळींचा साधारणतः एक मीटर रुंदीचा पट्टा ओलसर होत असल्याने तेवढयाच भागात तणांची वाढ होते. 'सब सरफेस इरिगेशन' अर्थात जमिनीखाली २० ते २५ सें.मी. पाणी दिल्यास द्राक्ष वेलीस पाणी मिळू शकते. परंतु तणांच्या वाढीसाठी पाणी उपलब्ध न झल्याने त्यांचे वाढीस काही प्रमाणात अटकाव येतो. 
अधिक वाचा

द्राक्ष लागवड तंत्रज्ञान

  भारतात द्राक्ष लागवडीसाठी असणा-या एकूण क्षेत्राच्या निम्यापेक्षा जास्त क्षेत्र हे एकटया महाराष्ट्रातच असल्याने द्राक्ष शेतीस महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत विशिष्ट असे स्थान प्राप्त झालेले आहे. यशस्वी द्राक्ष उत्पादन हे एका विशिष्ट व उच्च तंत्रावर अवलंबून आहे. दर्जेदार व निर्यातक्षम द्राक्षाची प्रत ही फार उच्च दर्जाची असावी लागते. अशा द्राक्षाचे उत्पादन करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. या तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी बंधूनी त्याच्या शेतावर आवलंबला तर अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांच्या द्राक्षाची मागणी वाढून निर्यात वाढेल.
हवामान व जमीन 
  उष्ण व कोरडया हवामानामध्ये द्राक्षवेलीची वाढ चांगली होऊन चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळते. द्राक्षाची वाढ कमी पावसाच्या प्रदेशात आणि उष्ण व कोरडे हवामान, असलेल्या प्रदेशात चांगली होते. सरासरी कमाल हवामान ३५ ते ४० अंश सेल्सिअसच्या आसपास आणि किमान सरासरी तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली जात नाही. अशा ठिकाणी द्राक्षाची लागवड यशस्वीरित्या होऊ शकते. 
  द्राक्ष पिकाला मध्यम काळी, कसदार आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन चांगली असते. तरीपण द्राक्षाचे पीक निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीत येऊ शकते. द्राक्षाची मुळे जमिनीच्या ६० सें.मी. खोलीच्या थरात पसरतात. मातीचा वरचा ६० सें.मी. थर व त्याखाली ठिसूळ मुरूम असल्यास अशा जमिनीत द्राक्षे चांगली येतात. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा.
अभिवृध्दी व लागवड पद्धती 
  द्राक्षाची लागवड छाट कलमापासून केली जाते. जोमदार, निरोगी आणि अधिक उत्पन्न देणा-या वेलीपासून विशिष्ट जातीची छाट कलमे करावीत. १५ ते २० सें.मी. लांबीची छाट कलमे करावीत. द्राक्षबागेची लागवड दोन पध्दतींनी करतात.एक म्हणजे छाट कलमे कायमच्या जागी ऑक्टोबर महिन्यात लावून आणि रोप वाटिकेत छाट कलमांना मुळ्या फुटल्यानंतर जानेवारी महिन्यात रोपवाटिकेत काढून बागेत लागवड करतात. अलीकडे, द्राक्षात खुंट वापरून इच्छित जातींची कलमे करून लागवड करण्यात येत आहे. सूत्रकृमी, चुनखडी तसेच पाण्याचा ताण यावर मात करण्यासाठी खुंट वापरून यश मिळवता येते. बंगलोर डॉगरीज, रामसे १६१३ इ.जाती खुंट म्हणून वापरतात.
पूर्वमशागत 
  सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यापूर्वी ६० सें.मी बाय  ६० सें.मी खोली व रुंदीचे दक्षिण उत्तर चर घ्यावेत. हे चर चांगली माती व खतांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. खतमातीच्या मिश्रणात हेक्टरी २० किलो या प्रमाणात १० % कार्बारील भुकटी मिसळावीत. चराच्या तळाला झाडाच्या ठिकाणी २ ते २.५ किलो सुपर फॉस्फेट व २० ते २५ किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे.
सुधारित जाती  
  महाराष्ट्रात थॉमसन सिडलेस, तास ए.गणेश, सोनाका सिडलेस, माणिक चमन, शरद सिडलेस, फ्लेम सिडलेस, अनाबेशाही, बंगलोर पर्पल या जातींची लागवड केली जाते. त्यापैकी अलीकडच्या काळात थॉमसन सिडलेस, तास ए गणेश व सोनाका या जातींची सर्वात जास्त प्रमाणात लागवड केली जाते.
  द्राक्षाच्या बिनबियांच्या जातीमध्ये थॉमसन सिडलेस ही उत्कृष्ट प्रतीचे उत्पादन देणारी जात आहे.या जातीचे उत्पादन हेक्टरी २० ते २५ टन असून घड मध्यम,भरगच्च मण्यांनी भरलेला असतो. साखरेचे प्रमाण २० ते २२% असल्यामुळे बेदाणे करण्यास या जातीचा वापर मोठया प्रमाणावर केला जातो.
अनाबेशाही ही जात आंध्रप्रदेशात हैदराबाद सभोतालच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर लावली जाते.या जातीचे हेक्टरी उत्पादन २० ते २५ टनापर्यंत असून घडांचा आकार मध्यम, मणी मोठे व फिक्कट पिवळसर रंगाचे असतात यात साखरेचे प्रमाण १५ ते १६% असते.
  तास-ए-गणेश ही जात थॉमसन सिडलेस या जाती पासून निवड पध्दतीने सांगली जिल्हयातील तासगाव येथे शोधून काढण्यात आली. सोनाका ही जात नानज, जिल्हा सोलापूर येथे थॉमसन सिडलेस या जाती मधून निवड पध्दतीने शोधून काढण्यात आले या जातीत साखरेचे प्रमाण २४ ते २६% असल्याने बेदाणे तयार करण्यास ही जात चांगली आहे.
लागवड पध्दत
  ऑक्टोबर महिन्यात लावलेली छाट कलमे जानेवारी पर्यंत शेतात लावणीसाठी तयार होतात. चांगल्या मुळ्या फुटलेली छाट कलमे थोडी पाने काढून आणि कोवळा शेंडा खुडून मुळांना इजा होऊ न देता मातीच्या हुंडीसह काढून कायमच्या जागी लावाव्यात.
खते 
  द्राक्षवेलींना लागणा-या सर्व आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा हा वेलीची वाढ, उत्पादन गुणवत्ता यावर अवलंबून असतो. म्हणून एप्रिल आणि ऑक्टोबर छाटणीचा काळ हा खते देण्याच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. यासाठी रासायनिक खते आणि सेंद्रीय खते यांचा समतोल वापर करावा लागतो. रासायनिक खते देतांना जमिनीमध्ये सेंद्रीय खतांची मात्रा योग्य मुळाच्या वाढीकरिता स्फुरदाची अवश्यकता असते. म्हणून द्राक्षाच्या लागवडीपूर्वी चरातून किंवा खड्ड्यातून स्फुरदयुक्त खते देणे आवश्यक आहे. द्राक्षांच्या काड्या लावल्यापासून पीक येईपर्यंतच्या काळात खते देणे आवश्यक आहे द्राक्षासाठी प्रति हेक्टरी ९०० कि. नत्र, ५०० कि. स्फुरद व ७०० कि. पालाश ऑक्टोबर व एप्रिल छाटनीला मिळून द्यावे त्या पैकी ५०० कि. नत्र, २५० कि. स्फुरद हे ऑक्टोबर छाटणीच्या वेळी विभागून द्यावीत. सेंद्रीय खते आणि उशिरा उपलब्ध वर खते ऑक्टोबर छाटणीच्या पूर्वी १५ ते २० दिवस अगोदर द्यावीत. नत्र आणि स्फुरदाचा संबंध वेलीवरील काड्या परिपक्क होण्याशी आहे. तसेच नत्र व पालाशचा संबंध घडाच्या वाढीसाठी तसेच घड चांगल्या प्रकारे पक्क्व होण्याशी आहे.
पाणी व्यवस्थापन 
  द्राक्ष वेलीला पाणी अधिक लागत नसेल तरी योग्य वेळी देणे पाणी देणे फार मह्त्वाचे आहे. एप्रिल छाटणीनंतर पाण्याच्या किमान तीन पाळ्या द्याव्यात. ऑक्टोबर छाटणीनंतर हलके पाणी द्यावे. नंतर मात्र २० ते २५ दिवस पाणी देऊ नये. नंतर फळधारणा झाल्यानंतर फळे तयार होईपर्यंत बागेला नियमित पाणी द्यावे. पाण्याची टंचाई भासल्यास वेलीवरील घडांची संख्या कमी करावी तसेच जमिनीवर पालापाचोळा किंवा काळ्या पॉलीथीनचे आच्छादन टाकावे,म्हणजे जमिनीतील ओलावा टिकुन राहतो.ठिबक सिंचन पध्दतिने पिकांची पाणी वापरण्याची घनता २५% नी वाढते.यामुळे उपलब्ध पाण्याचा योग्य वापर होऊन बागायती क्षेत्र वाढविता येते.
अंतरमशागत 
द्राक्षवेलीची लागवड केल्यानंतर तणांचा बंदोबस्त करणे,जमीन भुसभुशीत करून पाणी देण्यासाठी वाफे तयार करणे,हिरवळीची खते देणे,जमिनीत खते मिसळणे व पाणी देणे,रोग-किडीचा बंदोबस्त करने इ.बाबीचा विचार करून अंतर मशागत केली जाते.
द्राक्षबाग छाटणी 
महाराष्ट्रातील हवामानात द्राक्षवेलीची वाढ वर्षभर होत असते.म्हणून द्राक्षवेलीची वर्षातून दोन वेळा छाटणी करतात. साधारणपणे ऑक्टोबर व एप्रिल महिन्यात छाटणी केली जाते. छाटणीचा मुख्य उद्देश कड्यांवरील डोळ्यामध्ये सुप्तावस्थेत असलेल्या घडांची वाढ होणे, त्याचबरोबर विक्रीची योग्य वेळ साधून जादा भाव मिळवणे, मशागतीची कामे सोपी होणे, पीक संरक्षण सोपे होणे तसेच कार्यक्षम पाने तयार होण्यासाठी एप्रिल व ऑक्टोबर छाटणीचा उपयोग होतो.
  एप्रिल छाटणीत फक्त खोड व ओलांडे राखून वेलींची बाकीचा सर्व भाग छाटून टाकावा लागतो. म्हणून या छाटणीला खरड छाटणी असे म्हणतात. एप्रिल छाटणीतून ठेवलेल्या डोळ्यावर ऑक्टोबर महिन्यापर्यंत फळे देणा-या नवीन काड्या तयार होतात.
  ऑक्टोबर छाटणी करतांना काडीची पक्वता लक्षात येण्यासाठी काडीवरील पाने एक दोन दिवस अगोदर काढावीत. यावेळी कमजोर, रोगट काड्याही काढून टाकाव्यात. ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस काडीवर किमान ६ ते ९ डोळे राखावेत.
अधिक वाचा

नवीन द्राक्ष बागेची लागवड

नगदी पीक म्हणून द्राक्ष लागवड करून भरपूर उत्पादन घेण्याची प्रत्येक शेतक-याची अपेक्षा असते. हे पीक बहुवर्षीय असून, एकदा लागवड झाल्यानंतरपिकाचे आयुष्यमान १२-१४ वर्ष असते. तेव्हा लागवडी संदर्भातील प्रत्येक गोष्टी बारकाईने पाहून निर्णय घेणे फारच. महत्वाचे ठरते.
  द्राक्ष पीक हे देशातील सर्वात महत्वाचे फळपीक मानले जाते. राज्यात प्रामुख्याने नाशिक, सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत द्राक्ष लागवड होते. या फळपिकाच्या वाढीकरिता, तसेच उत्पादनास पोषक असे वातावरण या विभागात आढळते. बहुवर्षीय पीक असल्याने त्याच्या लागवडीसंबंधी सर्व बाबींची सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे.
आवश्यक घटक
तापमान : द्राक्षाची शाकीय वाढ व्यवस्थित होण्याकरिता उष्ण व कोरडे वातावरण या बागेत असणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे फळांच्या वाढीकरिता सुद्धा अशाच वातावरणाची गरज असते. घडाच्या पक्वतेच्या काळात असलेला पाऊस घड चिरण्याची समस्या निर्माण करतो. वेलीला वाढीच्या काळामध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढल्यास फळधारणेवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट येते. त्याचप्रमाणे फळछाटणीनंतर तापमान १५ अंश से.पेक्षा कमी असल्यास डोळे फुटण्यामध्ये अडथळे येतात.
पाऊस : अधिक पावसाच्या वातावरणात द्राक्ष बाग लागवड हानिकारक ठरू शकते, कारण घडनिर्मिती होण्याकरिता कोरडे वातावरण गरजेचे असते; परंतु याच कालावधीत पाऊस सुरु असल्यास घडनिर्मिती विपरीत परिणाम होऊन उत्पादनाचे नुकसान होऊ शकते. त्याचप्रमाणे फळ छाटणीनंतर फुलोरा अवस्थेत पाऊस असल्यास निरनिराळ्या रोगांचा प्रादुर्भाव त्या वेलीवर होऊन उत्पादन पूर्णपणे घटते.
माती : द्राक्ष बाग जरी कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये शक्य होत असली, तरी हलकी व मध्यम प्रतीची
जमीन, जिथे पाण्याचा निचरा चांगला होतो. अशा प्रकारच्या जमिनीत वेलीला वाढ चांगली होते. फळांची प्रतसुद्धा या जमिनीत चांगली अनुभवास येते. याकरिताच जमिनीचे भौतिक गुणधर्म उदा. मातीचा पोत, मातीची रचना, मातीची खोल व पाणी धरून ठेवण्याची क्षमता व त्याचप्रमाणे मातीचा सामू(PH) व क्षारता इत्यादी घटकांचा व द्राक्षवेल लागवड करताना विचार करणे गरजेचे असते. पोत म्हणजे त्या जमिनीत असलेले वाळू व मातीच्या कणांचे प्रमाण यावरून मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता लक्षात येते. जास्त असलेले मातीचे कण ही पाणी जास्त काळ धरून ठेवते; परंतु जर त्याच जमिनीत वाळूचे प्रमाण जास्त असल्यास मुळातील क्षेत्राच्या खाली वेलीला दिलेले पाणी व अन्नद्रव्य वाहून जातात त्यामूळे मातीचा पोत लक्षात घेणे फार गरजेचे होते. जमिनीची खोली ही सुध्दा मुळाचा विस्तार व वाढ यावर परिणाम होतो. खुंटाची मुळे जास्त खोलवर पसरत असल्याने कोणत्याही प्रकारच्या जमिनीत लागवड करता येते. स्वमूळावरील वेलीची मुळे एक ते दीड फुटापर्यंत खोलवर जाऊ शकतात; परंतु खुंटावरील मुळे चार ते पाच फुट खोलीवर जातात, त्यामुळेच जमिनीचे महत्व लागवडीमध्ये गरजेचे असते.
द्राक्ष जातींची निवड :हिरव्या द्राक्षांमध्ये थॉमसन सीडलेस, तास-ए -गणेश, सोनाका, माणिक चमन, इ. जाती फायदेशीर ठरतात, तर रंगीत जातीमध्ये शरद सीडलेस, प्लेम सीडलेस व रेड ग्लोबसारख्या द्राक्ष जातीचा समावेश आहे. यासोबतच वाइन करण्याकरिता अलीकडे प्रक्रिया केंद्राची उभारणी मोठया प्रमाणावर चालू आहे. याकरिता शेनीनब्लॅक  कॅबरनेट, सॅव्हिग्नोन,शिराज इ. जातींचा समावेश आहे.
लागवड :
  द्राक्ष लागवड करताना कालावधी महत्वाचा असतो. खुंटावरील कलम केल्यानंतर त्या रोपांची मुळे जमिनीत पसरून त्याचा विकास होऊन कलम करण्याकरिता सात ते आठ मि.मी जाडीची काडी घेणे गरजेचे असते. याकरिता जवळपास सहा-सात महिने कालावधी निघून जातो तेव्हा लागवड ही साधरणता: जाने-फेब्रुवारी महिन्यांत करणे गरजेचे होते. जमिनीची प्रकार यावर लागवडीचे अंतर अवलंबून असते. हलक्या जमिनीत ९ 'स '५ तर भारी जमिनीत ९ 'स६' पुरेसे होते.
जमिनीची पूर्वतयारी : 
  द्राक्ष हे पीक इतर पिकांपेक्षा नाजूक असते. द्रक्षवेलीला पाण्याचा पुरवठा करण्याकरिता वेलीच्या निरनिराळ्या वाढीच्या अवस्थेत वेगवेगळ्या मात्रेची पाण्याची गरज असते, म्हणूनच या पिकाला पाणी हे ठिबक सिंचनाद्वारे प्रत्येक वेलीस लिटरच्या मापाने द्यावे लागते. प्रत्येक वेलीस सारख्या मात्रेने पाणी मिळण्याकरिता सारखा दाब असणे आवश्यक असते. तेव्हा लागवडीपूर्वी जमीन सपाट करून घेतल्यास हे शक्य करून घेता येते. द्राक्ष पिकाला पाण्यासोबत खतांचीसुद्धा गरज असते. प्रत्येक वेलीला दिलेल्या प्रत्येक ग्रम खतांचा वापर होऊन, त्यापासून चांगल्या प्रतीचे उत्पादन अपेक्षित असते; तेव्हा वेलीला दिले गेलेले खत फक्त वेलीच्या मुळाणेच उचलून घेतल्यास हे शक्य होते. शेतामध्ये बहुवर्षीय गवत उदा: लव्हाळ, हरळीचा व इतर तणांचा सुरुवातीलाच नायनाट करावा.
लागवडीकरिता निवडलेले क्षेत्र
  द्राक्ष पिकाच्या वाढीवर वातावरणाचा फारच मोठा प्रभाव असतो,कोरडे वातावरण फारच गरजेचे असते. हलकी ते मध्यम प्रतीची जमीन, पाण्याचा चांगला निचरा होणे, इ. गोष्टी फारच हितकारक समजल्या जातात; कारण असे वातावरण मिळाल्यास व्यवस्थापनाच खर्च कमी होतो. द्राक्षवेलीवर रोग व किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो. रोगांपैकी केवडा, करपा भुरी तर किडी करीता खोड व लालकोळी  हे रोग फार हानिकारक आहेत. ज्या वातावरणात आद्रता जास्त असते तिथे डाउनी मिल्डयू (केवडा) सारख्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त असतो. तसेच शेजारच्या बागेत जर आर्द्रता निर्माण करणारे पीक असेल (उदा: ऊस) तर या रोगाचा प्रादूर्भाव जास्त होतो. ज्या वातावरणात सतत पाऊस असतो, अशा ठिकाणी करपा या रोगाचा प्रादुर्भाव जास्त असतो; तेव्हा लागवडीकरीता शक्यतोवर अशा प्रकारचे वातावरण टाळावे.
लागवडीची दिशा आखणी व चर घेणे : 
  लावडीची दिशा ठरवणे हा फार महत्वाचा मुद्दा आहे. इतर पिकांमध्ये ही परिस्थिती नसते. निर्यातक्षम प्रतीची द्राक्ष तयार करण्याकरिता घड एकसारख्या हिरव्या रंगाचा आवश्यक असतो. द्राक्षवेलीची कॅनॉपी जरी कमी-जास्त असली तरी दुपारपर्यंतचा सूर्यप्रकाश व दुपारनंतर वेलीच्या विशिष्ट भागांवर मिळणारा सूर्यप्रकाश एकसारख्या हिरव्या रंगाचे द्राक्ष घड ठेवण्याकरिता महत्वाचा ठरतो. घड सावलीत राहण्याकरिता वेलीच्या ओलांड्यांची दिशा ही उत्तर-दक्षिण असणे गरजेचे असते, तेव्हा लागवडीची दिश सुद्धा उत्तर-दक्षिण राहील याची काळजी घ्यावी. या दिशेने लागवड केल्यास वाय किंवा 'टी' प्रकारची वळण पद्धत उपयोगाची ठरते कारण यामध्ये कॅनॉपी ही व्हरटीकल अशी असते. तर याच तुलनेत पसरट अशी कॅनॉपी ज्या वळण पद्धतीमध्ये असते, तिथे ही लागवडीची दिशा महत्वाची नसते उदा: मांडव पद्धत.या पद्धतीमध्ये पसरट अशी कॅनोपी असते पत्येक घड हा कॅनोपीच्या खाली असतो, त्यामुळे यापद्धतीत लागवडीची दिशा पूर्व-पश्चिम असावी.
  लागवड करण्यापूर्वी आखणी करून घेणे फार गरजेचे असते. दोन वेलींतील अंतर ठरवून आखणी करून घ्यावी .हलक्या ते मुरूम असलेल्या जमिनीत टेबल ग्रेप्स  करीता आठ ते नऊ फुट अंतर ठेवता येते. कारण या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्यामुळे कॅनॉपी पाहिजे तशी वाढत नाही, त्यामुळे वरील अंतर पुरेसे होऊ शकते. भारी जमिनीत वाढीचा जोम जास्त असल्यामुळे दहा फुट अंतर गरजेचे असते. यापेक्षा अंतर कमी केल्यास बागेत सूक्ष्म वातावरण वाढेल व रोगांचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता असेल तेव्हा जमिनीच्या पोतानुसार अंतर ठरवावे. याच तुलनेत वाईनग्रेप्सचा विचार केल्यास मुळातच या वेलीची वाढ कमी असते, तसेच उत्पादनसुद्धा टेबल ग्रेप्सच्या तुलनेत फारच कमी घेतले जाते, घड सावलीत असावेत असे नाही, त्या मुळे वाईन ग्रेप्सच्या लागवडी करिता दोन वेलीतील अंतर सात ते आठ फुट पुरेसे होते.द्राक्ष लागवडी करिता जमिनीचा पोत व पाण्याची प्रत फार महत्वाची असते. आपल्या भागात प्रत्येक ठिकाणी पाण्यात क्षार व जमिनीत चूनखडी आढळून येते. अशा वेळी द्राक्ष लागवड ही खुंटाचा वापर करूनच करण्याची शिफारस केली जाते. खुंटरोपाची मुळे ही फार खोलवर (जवळपास पाच-सहा फुट) जातात, त्यामुळे जमिनीत मुळाचा विस्तार चांगला होण्याकरिता जमिनीतील वातावरण चांगले असणे गरजेचे असते, तेव्हा लागवडीपूर्वी चारी घेणे फारच गरजेचे आहे, मशीनच्या साह्याने दोन फुट रुंद व दोन फुट खोल अशी चारी घ्यावी.चारी घेतांना वरच्या एक फुट थरावरची माती एका बाजूला ठेवावी व खालच्या दुस-या एक फुटाची माती दुस-या बाजूला टाकावी.चारी भरतेवेळी वरची माती तळावर टाकून त्यावर शेणखत,काडीकचरा ,पाचट,कंपोस्ट इ.गोष्टी टाकाव्यात,तसेच त्यावर सुपरफॉस्फेट टाकून खालची आजपर्यत उपयोगात न आलेली माती टाकून चारी झाकून घ्यावी.खडकाळ किंवा मुरूम असलेल्या जमिनीत रीपिंग करणे फारच गरजेचे आहे.चार-पाच फुट लांब अशी मशीनची सोंड  जमिनीत आतपर्यंत जाऊन पोकळी निर्माण करते,त्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते व त्याचा चांगला फायदा होतो.
अधिक वाचा
.........................................................