- देवभूमी चाखणार नाशिकची द्राक्षे

- बागायतदार संघाचा पुढाकार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गतवर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्षांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून या द्राक्षांची देशांतर्गत बाजारपेठेत विक्री करण्यासाठी द्राक्ष बागायतदार संघाने पुढाकार घेतला आहे. खासकरून देवभूमी अर्थात केरळमध्ये नाशिकच्या द्राक्षांची विक्री करण्याचा संघाचा विचार आहे. विशेष म्हणजे, रेल्वेची वॅगन उपलब्ध होणार असल्याने देवभूमीत राहणा-यांना यंदा नाशिकची द्राक्षं चाखायला मिळणार आहेत. 
अनुकूल हवामान, पाण्याची उपलब्धता आणि रोगांचे अत्यल्प प्रमाण यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा द्राक्षाचे उत्पादन जवळपास पन्नास टक्क्याहून अधिक होण्याची शक्यता आहे. यंदाच्या द्राक्षांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची गुणवत्ता असल्याचे द्राक्ष बागायतदार संघाने म्हटले आहे. गेल्या चार ते पाच वर्षांची तुलना करता यंदाच्या द्राक्षांची गुणवत्ता अधिक उजवी असल्याचे मत संघाचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. या द्राक्षांची टिकवण क्षमताही चांगली राहणार असल्याने त्यांच्या विक्रीत अडचण येणार नाही, असाही विश्वास द्राक्ष बागायतदार बाळगून आहेत. 
.................. 
नाशिकच्या द्राक्षांना केरळमध्ये चांगली मागणी असते. त्यामुळे तेथे द्राक्षांचे मार्केट स्थापन करण्याचा द्राक्ष बागायतदार संघाचा विचार आहे. रेल्वे वॅगनच्या उपलब्धतेचाही फायदा होणार आहे. येत्या चार ते पाच दिवसांत होणाऱ्या संघाच्या बैठकीत त्याबाबत विचार केला जाणार आहे. 

- विजय गडाख, अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ
संदर्भ -म.टा.२९ डिसेंबर२०११
अधिक वाचा

थंडीचा द्राक्ष बागेवर होणारा परिणाम

सध्याच्या परिस्थितीमध्ये थंडीचा द्राक्ष बागेच्या वाढीवर परिणाम होताना दिसतो आहे. द्राक्ष बागेमध्ये सध्या वेगवेगळ्या परिस्थिती आढळून येतात. उशिरा छाटणी केलेल्या बागेत सध्या नऊ ते दहा मि.मी. आकाराचे मणी असतील, तर वेळेवर किंवा लवकर छाटलेल्या बागेत मण्यांमध्ये पाणी उतरायला सुरवात झाली असेल. अशा या परिस्थितीमध्ये थंडीचा घडांच्या वाढीवर कसा परिणाम होतो या संदर्भातील माहिती आजच्या लेखात घेत आहोत.
- डॉ. आर. जी. सोमकुंवर
सध्याच्या परिस्थितीमध्ये अति थंडी आपण अनुभवतो आहे. या वेळी प्रत्येक बागेत घडाचा विकास होण्याची अवस्था मात्र आढळून येईल. घडाचा विकास होण्याकरिता वेलीमध्ये शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग तेवढाच संतुलित असणे गरजेचे होते. त्या सोबत संजीवकांचा वापर केल्यामुळे मण्यातील प्रत्येक अवयवांमध्ये वाढ होण्याची शक्ती निर्माण होते. बागेत ही प्रक्रिया चालू राहण्याकरिता ठराविक तापमान महत्त्वाचे असते. तेव्हाच इतर गोष्टींचा फायदा होतो.
सध्याच्या परिस्थिमध्ये ज्या बागेत मण्यात पाणी उतरायला आठ ते दहा दिवस आहेत, अशा बागेत आता लवकरच मण्याचा आकार वाढवणे गरजेचे होते. परंतु किमान तापमान हे फारच कमी झाल्यामुळे वेलीमध्ये क्रिया मंदावल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणजे मण्याचा आकार वाढणे थांबले असे आपण म्हणतो. पाणी उतरल्यानंतर जवळपास तीन मि.मी. आकार वाढतो. तेव्हा पाणी उतरेपर्यंत बऱ्यापैकी आकार वाढवून घेणे गरजेचे होते. हा आकार वाढविण्यासाठी आपण पुन्हा संजीवकाचे डीप घेण्याचा प्रयत्न करतो. त्याचा चांगला परिणाम मिळावा म्हणून त्यामध्ये स्टिकरसुद्धा मिसळले जाते; परंतु सध्या जर थंडी आहे तर विकास होणार नाही. म्हणजेच आपण ज्या उपाययोजना केल्या त्याचा फायदा झाला नाही किंवा होणार नाही. उलट मण्यावर स्टिकरमुळे पांढरे डाग दिसायला लागतात. हे डाग पुसून जाण्याकरिता आपण पुन्हा कोणती फवारणी करावी याबद्दल चौकशी करतो. आता संजीवकांचीसुद्धा विशिष्ट मर्यादा ठरवल्यामुळे निर्यात करणाऱ्या द्राक्षाकरिता या गोष्टींचा विचार करणे गरजेचे झाले आहे.
घडावर गाठी येणे आणि देठ सुकणे -
घडावर गाठी येणे तसेच देठ सुकून मणी सुकण्याची समस्या या वर्षी बऱ्याच बागांमध्ये दिसून आली आहे. ज्या बागेत ही परिस्थिती आढळून येते, अशा बागेत बारकाईने निरीक्षणे केल्यास घडाच्या पुढील काडीवर प्रत्येक डोळ्यांवर फुगीर भाग म्हणजेच गाठीप्रमाणे चित्र दिसते. अशा ठिकाणी पेरासुद्धा लहान दिसतो. काही ठिकाणी जुनी काडी सुद्धा अशीच दिसते. याच काडीवर आलेला घड सुद्धा अशाच प्रकारचा आहे. घडाच्या दांड्यावर गाठ दिसते, ही गाठ पोकळ असते. मण्यात पाणी उतरत असताना त्या गाठीवर चीर पडते आणि तो घड निकामी होतो. त्यामुळे नक्कीच या परिस्थितीमध्ये वेलीवर एकतर कुठल्या तरी गोष्टींचा ताण बसला असावा किंवा काही गोष्टींचा अतिरेक झाला असावा किंवा या वर्षी बऱ्यापैकी पाऊस झाला असल्याने त्याचा परिणाम म्हणून ही परिस्थिती उद्‌भवली असावी. सध्या जरी यावर उपाय दिसत नसला तरी ही परिस्थिती टाळण्याकरिता खरड छाटणीच्या वेळी मात्र विशेष काळजी घेणे महत्त्वाचे राहील.
(लेखक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे येथे कार्यरत आहेत.)
सध्याच्या परिस्थितीमधील उपाययोजना -
सध्याच्या थंडीच्या कालावधीत बागेतील तापमान कसे वाढवता येईल याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. बागेत मशागत करून मोकळे पाणी देणे, शेडनेटचा वापर करणे, पेपरने घड झाकून घेणे, इत्यादी गोष्टी आपल्याला तातडीने करता येतील. या सोप्या उपाययोजना केल्यास त्याचा फायदा घडाच्या विकासाकरिता नक्कीच होऊ शकेल. बागेत सकाळी शेकोटी पेटवून तापमान वाढवता येईल, परंतु प्रत्येक ठिकाणी हे शक्‍य होईल असे नाही. बोदावर आच्छादन करून घ्यावे. यामुळे मुळांतील तापमान चार ते पाच अंश से.ने वाढते. अशा परिस्थितीमध्ये मुळी सुद्धा काम करायला लागते आणि थोडेफार तरी अन्नद्रव्य वर उचलले जाऊन घडाचा विकास होण्यास मदत होईल.
अधिक वाचा

आधुनिक द्राक्ष शेतीचे तंत्रज्ञान



जीएची फवारणी शक्‍यतो सकाळच्या वेळी करावी. त्यामुळे चांगले परिणाम दिसून येतात. साधारणपणे सकाळी 9 ते 12 या वेळेत फवारणी किंवा डीपिंग करावे. नंतर तीन ते पाच वाजेपर्यंत संध्याकाळी फवारणी किंवा डीप देण्यात यावे. एप्रिल छाटणीनंतरची सूक्ष्म घडनिर्मिती व्यवस्थित झाली नसल्यास अशा बागेतील घड कमजोर दिसतात. अशा बागेमध्ये पाच पीपीएम जीएचे प्रमाण वापरावे. तसेच पुढच्या अवस्थेतसुद्धा कमी प्रमाणातच जीए द्यावे. एखादा घड स्थिरावल्यानंतर फुलोरा अवस्थेत पाकळ्यांची वाढ जास्त झाली नसल्यास 20 पीपीएम जीए द्यावा. हे करत असताना घडाच्या वाढीची अवस्था ओळखणे आवश्‍यक असते. अन्यथा, सुधारणा होण्याऐवजी विपरीत परिणाम दिसू शकतात.
मागील लेखात आपण जीएचे द्रावण तयार करण्याविषयी माहिती घेतली. आजच्या लेखात आपण जीएचा प्रभावीपणे वापर कसा करावा याविषयी माहिती घेऊ. बिनबियांच्या द्राक्षांमध्ये जीए या संजीवकाचा वापर अनिवार्य ठरतो. द्राक्षवेलीच्या ऑक्‍टोबर छाटणीनंतर वाढीच्या विविध अवस्थेत वेगवेगळे परिणाम साधण्यासाठी जीएचा प्रभावी वापर केला जातो.
1) प्राथमिक वाढीसाठी वापर ः जीएचा वापर हा पाकळ्यांमधील अंतर वाढविण्यासाठी घडाच्या प्राथमिक अवस्थेत म्हणजे "प्रीब्लूम' अवस्थेत केला जातो. जीएचा हा वापर सर्वच प्रकारच्या द्राक्ष उत्पादनांमध्ये केला जातो.
व्यवस्थापन ः
1) घडांचा रंग पोपटी हिरवा म्हणजे साधारणतः सात पानांच्या अवस्थेमध्ये किंवा घडाचा आकार साधारणतः एक इंच असताना दहा पीपीएम जीएची फवारणी करावी.
2) दुसरी फवारणी तीन ते चार दिवसांनंतर 15 पीपीएम या प्रमाणात घ्यावी.
3) फवारणीपूर्वी वांझ फुटी काढून विरळणी करून घ्यावी.
4) सर्वसाधारणपणे एकरी 400 ते 600 लिटर फवारणीचे द्रावण वापरावे.
गरज भासल्यास दुसऱ्या फवारणीनंतर किंवा डीपिंग झाल्यावर 20 पीपीएम जीएचा वापर तीन ते चार दिवसांनंतर करावा. त्यामुळे पाकळ्यांची लांबी वाढून घड मोकळा होण्यास मदत होते.
दक्षता -
1) घड पोपटी रंगांच्या अवस्थेमध्ये असताना जीएच्या द्रावणात घड ताणले गेल्यामुळे घड मोडण्याची किंवा तुटण्याची शक्‍यता असते.
2) ढगाळ हवामान असल्यास जीएची फवारणी टाळावी. हवा कोरडी असताना फवारणी घ्यावी. तसेच डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता वाढत असल्याने या फवारणी अगोदर "डाऊनी'साठी प्रतिबंधक फवारणी करणे आवश्‍यक असते. या वेळी डाऊनीपासून मुक्त राहण्यासाठी जीएसोबत बुरशीनाशकांचा वापर करावा.
3) या अवस्थेत जीएचा जास्त प्रमाणात वापर टाळावा. जीएच्या जास्त वापरामुळे घडाचे व पाकळ्यांचे देठ जाड व कडक होतात. देठ शेंड्याकडे चपटे झालेले आढळून येतात. घड उन्हात असल्यास देठ लाल पडण्याची शक्‍यता असते. तसेच सावलीतील घड पूर्णपणे गळू शकतात.
4) जीएची फवारणी शक्‍यतो सकाळच्या वेळी करावी. त्यामुळे चांगले परिणाम दिसून येतात. साधारणपणे सकाळी 9 ते 12 या वेळेत फवारणी किंवा डीपिंग करावे. नंतर तीन ते पाच वाजेपर्यंत संध्याकाळी फवारणी किंवा डीप देण्यात यावे.
5) एप्रिल छाटणीनंतरची सूक्ष्म घडनिर्मिती व्यवस्थित झाली नसल्यास अशा बागेतील घड कमजोर दिसतात. अशा बागेमध्ये वरीलप्रमाणे जीएचा वापर न करता दहा पीपीएम ऐवजी पाच पीपीएम जीएचे प्रमाण वापरावे. तसेच पुढच्या अवस्थेतसुद्धा कमी प्रमाणातच जीए द्यावे.
एखादा घड स्थिरावल्यानंतर फुलोरा अवस्थेत पाकळ्यांची वाढ जास्त झाली नसल्यास 20 पीपीएम जीए द्यावा. हे करत असताना घडाच्या वाढीची अवस्था ओळखणे आवश्‍यक असते. अन्यथा, सुधारणा होण्याऐवजी विपरीत परिणाम दिसू शकतात.
मणी व फुलगळीसाठी वापर ः
अनेक वर्षांपासून जीएचा वापर विरळणी करण्यासाठी होत आहे. जीएच्या वापरामुळे घडाच्या देठाची लांबी वाढून मण्यांमधील अंतर वाढते आणि फुलगळ होऊन पुढील विरळणी करणे शक्‍य होते.
आमच्या संस्थेतील संशोधनात असे आढळून आले आहे, की जीएमुळे घडांची व पाकळ्यांची लांबी वाढते; परंतु अपेक्षेप्रमाणे मणीगळ होत नाही. कुठल्याही रसायनांमुळे अजून तरी थॉमसन सीडलेस जातीमध्ये शंभर टक्के विरळणी साध्य होत नाही. ढगाळ वातावरण असेल किंवा कार्बारिलचा जास्त प्रमाणात वापर झाल्यास घड पूर्णपणे झडण्याचा संभव असतो. शिवाय मण्यांची संख्या कात्रीच्या साह्याने कमी करणे आवश्‍यक ठरते.
व्यवस्थापन -
1) मणीगळ करण्यासाठी 50 टक्के फुले उमलण्याच्या अवस्थेत 20 पीपीएम ते 40 पीपीएम जीएच्या द्रावणात घड बुडवणी करावी. वेलीला पाण्याचा जास्त ताण देऊ कारण पाण्याचा जास्त दिलेला ताण वेलीला अडचणीत आणू शकतो. अशा वेळी जमिनीचा प्रकार (हलकी किंवा भारी जमीन) फार महत्त्वाचा ठरतो. अशा परिस्थितीमध्ये फुलगळ व्हायला लागली की पूर्ण घड खाली होतो. हे सर्व टाळायचे असल्यास बागेला पाण्याचा ताण बसू नये. याकरिता जमिनीचा प्रकार व वाढीची व्यवस्था याचा सारासार विचार करून पाण्याचे नियोजन करावे.
दक्षता काय घ्याल?
1) पूर्ण फुलोरा ते तीन-चार मि.मी. अवस्थेच्या काळात जीएचा वापर करू नये. यामुळे विरळणी न होता "शॉर्ट बेरीज'चे प्रमाण वाढते.
2) जीएसोबत कार्बारिलची फवारणी करू नये. तसेच पाण्याचा ताण जास्त दिल्यास कार्बारिल वापरण्याचे टाळावे.
3) विरळणीसाठी ढगाळ हवामानात जीएची फवारणी घेऊ नये.
4) कॅनॉपी (विस्तार) जास्त असेल व घड सावलीत असतील तर फवारणी होऊ नये.
विरळणीच्या मात्रा पूर्ण झाल्यानंतर व मणी सेट झाल्यानंतर घडाची लांबी अधिक असेल, तर कात्रीच्या लांबीएवढे किंवा वीतभर लांबी ठेवून शेंडा खुडावा. कात्रीच्या साह्याने विरळणी करताना घडातील पहिल्या तीन पाकळ्या सारवून चौथी, सहावी, आठवी, दहावी, बारावी इ. या क्रमाने घडातील पाकळ्या, मण्यांचा आकार दोन-तीन मि.मी. व्यासाचा असताना काढाव्यात. बऱ्याच बागांमध्ये घडाच्या वरच्या बाजूचे मणी आकाराने लहान राहिल्याचे दिसून येणे. याचे प्रमुख कारण म्हणजे वरील मणी हे संजीवकांच्या द्रावणात पूर्णपणे बुडविले जात नाहीत. ते व्यवस्थित न बुडविले गेल्याने आकाराने लहान राहतात. यासाठी वरील तीन पाकळ्या काढून नंतरच्या दोन-तीन पाकळ्या ठेवून त्यानंतर अल्टरनेट पाकळ्या घडावर ठेवून बाकीच्या पाकळ्या काढून टाकाव्यात. साधारणतः 10-12 पाकळ्या प्रत्येक घडावर ठेवाव्यात व प्रत्येक पाकळीस सरासरी दहा मणी ठेवल्यास 100-120 मण्यांची मर्यादा लक्षात घेऊन थिनिंगची मर्यादा ठरवावी. अशाप्रकारे प्रत्येक घडावर 100-120 मणी राहतील व घड सुटसुटीत/ मोकळा होईल.
तक्ता क्र. 1
जीएचा निर्यातक्षम घडाच्या पाकळ्यांच्या वाढीसाठी व फुलोरा अवस्थेतील वापर
क्र.अवस्थासंजीवक व त्याचे प्रमाणद्रावणाचा सामूकार्य
1)5 पाने अवस्था किंवा पोपटी रंगाचा घडजीए 10 पीपीएम + युरिया फॉस्फेट5-6पाकळ्यांची लांबी वाढविणे
2)पहिल्या अवस्थेनंतर 3-4 दिवसांनीजीए 15 पीपीएम + सायट्रिक किंवा फॉस्फोरिक ऍसिड5-6पाकळ्यांची लांबी वाढविण्यासाठी
3)गरजेनुसार दुसऱ्या अवस्थेनंतर 3-4 दिवसांनीजीए 20 पीपीएम + सायट्रिक किंवा फॉस्फोरिक ऍसिड5-6पाकळ्यांची लांबी वाढविण्यासाठी
4)50% फुलोरा अवस्थाजीए 40 पीपीएम + सायट्रिक किंवा फॉस्फोरिक ऍसिड5-6पाकळ्यांची लांबी वाढविण्यासाठी 
अधिक वाचा

द्राक्ष घडाच्या गुणवत्तावाढीसाठी जीएचा प्रभावी वापर

बिया असणाऱ्या द्राक्षांत मण्यांच्या वाढीसाठी द्राक्ष मण्याची बी संजीवकांचा नैसर्गिक स्रोत असते; परंतु बिनबियांच्या द्राक्षामध्ये बाहेरून संजीवकांचा वापर करणे आवश्‍यक ठरते. यात प्रामुख्याने जीएचा वापर महत्त्वपूर्ण ठरतो. स्थानिक बाजारपेठ तसेच निर्यातीसाठीच्या सर्वच द्राक्षांमध्ये ऑक्‍टोबर छाटणीनंतर जीएचा वापर केला जातो.
द्राक्ष बागेत संजीवकांचा योग्य वापर ही आवश्‍यक आणि अत्यंत महत्त्वाची बाब आहे. संजीवकांच्या वापराशिवाय निर्यातक्षम द्राक्ष निर्मिती अशक्‍य आहे. संजीवके ही पाहिजे त्या प्रमाणात आणि योग्य त्या वाढीच्या अवस्थेतच देणे फायद्याचे ठरते. असे न झाल्यास पाहिजे ते परिणाम दिसून येत नाहीत, त्यासाठी संजीवकांचे द्रावण करण्यापासून ते वापरापर्यंत प्रत्येक बाबतीत काटेकोरपणा पाळला पाहिजे; तरच आपल्याला संजीवकांचे उत्कृष्ट परिणाम द्राक्षवेलीवर दिसून येतील.
बिया असणाऱ्या द्राक्षांत मण्यांच्या वाढीसाठी द्राक्ष मण्याची बी संजीवकांचा नैसर्गिक स्रोत असते; परंतु बिनबियांच्या द्राक्षांमध्ये बाहेरून संजीवकांचा वापर करणे आवश्‍यक ठरते. यात प्रामुख्याने जीएचा वापर महत्त्वपूर्ण ठरतो. स्थानिक बाजारपेठ तसेच निर्यातीसाठीच्या सर्वच द्राक्षांमध्ये ऑक्‍टोबर छाटणीनंतर जीएचा वापर केला जातो.
संजीवकांचे द्रावण तयार करताना विरघळणारे रसायन वापरले जाते. जीए-3चे द्रावण तयार करताना ऍसिटोनचा वापर केला जातो. त्यासाठी 50 मि.लि. ऍसिटोन प्रति ग्रॅम जीएसाठी सूत्रच झाले आहे; परंतु 25 ते 30 मि.लि. ऍसिटोनमध्ये एक ग्रॅम जीए पूर्णतः विरघळतो, त्यामुळे यापेक्षा जास्त ऍसिटोन वापरणे गरजेचे नाही. जीए या संजीवकाचे फवारणीसाठी द्रावण तयार करताना प्रथम मूळ द्रावण (स्टॉक सोल्यूशन) करता येते. सर्वप्रथम एक ग्रॅम जीए ऍसिटोन सॉलवंटमध्ये विरघळून घ्यावा. त्याचे एकत्रित पाण्यात एक लिटर मूळ द्रावण तयार करावे. अशा पद्धतीने तयार झालेले द्रावण हे 1000 (एक हजार) पीपीएम तीव्रतेचे होईल. यातून पाहिजे त्या पीपीएमचे द्रावण फवारणीसाठी तयार करता येते. जर 10 ग्रॅम जीए एक लिटर पाण्यात (वर नमूद केल्याप्रमाणे) विरघळवल्यास द्रावण हे 10,000 पीपीएम तीव्रतेचे तयार होईल. फवारणीसाठी 10 पीपीएमचे द्रावण करावयाचे असल्यास 500 लिटर पाण्यासाठी 500 मि.लि. मूळ द्रावण घ्यावे लागेल.
खाली दिलेल्या तक्‍त्याचा वापर करून फवारणीसाठीचे द्रावण तयार करता येईल. दहा हजार पीपीएमच्या मूळ द्रावणातून हवे त्या तीव्रतेचे द्रावण तयार करता येईल.
जीए-3चे द्रावण हे सर्वपरिचित आहे. जीए-3चे द्रावण जर ऍसिडिक म्हणजेच जीएच्या द्रावणाचा पीएच (सामू) 6.0 ते 6.5 एवढा असेल, तर त्याचे शोषण जास्त होते. बऱ्याच द्राक्ष बागांतील पाण्याचा सामू हा 7.5 पेक्षा जास्त असतो. अशा वेळी फवारणीच्या द्रावणाचा सामू कमी करणे आवश्‍यक असते. यासाठी सायट्रिक ऍसिड, फॉस्फोरिक ऍसिड किंवा युरिया फॉस्फेट यांचा वापर करावा. सर्वच द्राक्ष बागांत पाण्याचा सामू, विद्युत वाहकता (ईसी), तसेच पाण्यातील विद्राव्य सोडिअमचे प्रमाण सारखे नसल्यामुळे सामू कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या द्रावणात पाहिजे त्या प्रमाणात पाच ते सहा पीएच (सामू) मिळेपर्यंत सामू कमी करणारे रसायन पाण्यात मिसळून द्रावण ढवळून पीएच पेपरच्या साह्याने सामू तपासून पाहावा. शक्‍यतोवर युरिया फॉस्फेटची सलग फवारणी टाळावी, जेणेकरून घडाचा कडकपणा टाळता येईल.
अधिक वाचा

द्राक्ष घड जिरण्याच्या समस्येवर उपाययोजना

द्राक्ष बाग स्वमुळावर असेल तर आठ दिवसांत व खुंटावर असेल तर 10 ते 12 दिवसांत फुटी निघतात. या फुटी निघाल्यानंतर फुटीला साधारणतः एका आठवड्याने तीन ते पाच पाने दिसू लागतात. अशातच काही फुटींसोबत घड निघण्याऐवजी बाळी घड निघतात, त्यालाच घड जिरणे असे म्हणतात. काही फुटींसोबत जर घड आधीच जोमात असेल तर घड जिरणार नाही; परंतु बऱ्याच ठिकाणी घडाचा जोम पूर्णतः नसतो, त्यामुळे घड जिरण्याची समस्या उद्‌भवते. हे लक्षात घेऊन बागेचे योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.
मागील लेखात आपण ऑक्‍टोबर छाटणीनंतर एकसारख्या फुटी काढण्यासाठी हायड्रोजन सायनाईडच्या वापराबद्दल तसेच द्राक्ष बागेत बोदाचे महत्त्व याबाबत माहिती मिळवली. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे ऑक्‍टोबर छाटणी हे कौशल्याचे काम आहे.ऑक्‍टोबर छाटणी ही प्रत्यक्षपणे उत्पादनाशी निगडित असते. एकसारख्या निघणाऱ्या फुटी व फुटीबरोबर दिसणाऱ्या घडांच्या संख्येवर पुढील हंगामाचे भवितव्य ठरलेले असते.
हायड्रोजन सायनामाईड लावल्यानंतर फुटी आठ ते 12 दिवसांत दिसू लागतात. द्राक्ष बाग स्वमुळावर असेल तर आठ दिवसांत व खुंटावर असेल तर 10 ते 12 दिवसांत फुटी निघतात. या फुटी निघाल्यानंतर फुटीला साधारणतः एका आठवड्याने तीन ते पाच पाने दिसू लागतात. अशातच काही फुटींसोबत घड निघण्याऐवजी बाळी घड अथवा बाळी निघतात, त्यालाच घड जिरणे असे म्हणतात. काही फुटींसोबत जर घड आधीच जोमात असेल तर घड जिरणार नाही; परंतु बऱ्याच ठिकाणी घडाचा जोम पूर्णतः नसतो व घड जिरण्याची समस्या उद्‌भवते.
घड जिरण्याच्या समस्येचे मूळ कारण जरी एप्रिल छाटणीतील व्यवस्थापन व त्या वेळीस होणारा वातावरणातील बदल असेल तरी या समस्येस बरीच कारणे आहेत.
घड जिरण्याची कारणे ः
1) उशिरा झालेली खरड छाटणी ः खरड छाटणी उशिरा झालेल्या बागांमध्ये खरड छाटणीनंतर अन्नसाठा तयार होणाऱ्या कालावधीमध्ये सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे ऑक्‍टोबर छाटणीनंतर घड जिरण्याची समस्या येते.
2) खरड छाटणीनंतर ढगाळ हवामान ः खरड छाटणी मुख्यतः सुप्त अवस्थेतील घडनिर्मिती घडवून आणण्याकरिता केली जाते. सूक्ष्म घडनिर्मितीची प्रक्रिया चालू असताना वातावरणातील घटक अनुकूल नसल्यास पेशी विभाजनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम घडनिर्मितीवर होतो किंवा अंशतः घडनिर्मिती होऊन प्रत्यक्षात फूट निघण्याच्या वेळी दिसून येणारा घड हा योग्य प्रकारे तयार होत नाही.
3) फुलोरा निर्मितीतील घटकांमधील बदल ः फळधारक डोळ्यांची निर्मिती तीन अवस्थांमधून होते. ऍनालाजेनची निर्मिती, फळधारक डोळ्यांची निर्मिती आणि फुलांची निर्मिती या तीन अवस्थांपैकी फुलोऱ्यांची निर्मिती ही अवस्था खूप महत्त्वाची असते. या अवस्थेच्या निर्मितीसाठी कारणीभूत असलेल्या घटकांमध्ये त्यात प्रकाश सायटोकायनिन, आरएनए (रायबोन्युक्‍लिक ऍसिड) बदल झाल्यास त्याचा परिणाम बाळी किंवा शेंडा निर्मितीमध्ये होतो.
4) सूक्ष्म घडांचे पोषण ः काडी तपासणी अहवालामध्ये अनेक वेळा पांढऱ्या घडांची नोंद असते, म्हणजेच सूक्ष्म घडनिर्मितीमधील पहिले दोन टप्पे व्यवस्थित पार पडलेले असतात; परंतु तिसऱ्या टप्प्यात खरड छाटणीनंतर 61 ते 90 दिवसांच्या कालावधीत काही कारणामुळे घडांचे पोषण योग्य प्रकारे होत नाही. त्यातच असे घड फुटीची वाढ होताना पावसाळी हवा असेल तर असे घड फुटींच्या वाढीच्या अवस्थेत जिरण्याची शक्‍यता जास्त असते. स्वच्छ हवामानात असे घड टिकून राहतात; परंतु वाढ फारशी समाधानकारक होत नाही.
5) वेलीतील अन्नसाठा ः खरड छाटणीनंतर काडी पक्वतेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये रोगांचा प्रादुर्भाव, पाने गळणे किंवा नवीन फुटींची सतत वाढ या कारणांमुळे वेलींमध्ये पुरेसा अन्नसाठा होत नाही. या अगोदर सूक्ष्म घडनिर्मितीची प्रक्रिया पूर्ण झालेली असते. त्यामुळे ऑक्‍टोबर छाटणीनंतर घड जिरण्याची समस्या या परिस्थितीमध्ये यायला नको, तरी फुटींच्या वाढीसोबत घडाचा विकास होणे अडचणीचे ठरते.
6) बोद व पांढऱ्या मुळींची संख्या ः संशोधनाअंती आढळून आले, की बागांमध्ये छाटणीच्या वेळी वेलींच्या वाढीसाठी आवश्‍यक असलेली पांढरी मुळे नसल्याने त्याचा प्रत्यक्ष परिणाम घड जिरण्यात होतो. वेलींमध्ये मुळातच अन्नसाठा कमी त्यात मुळी कार्यक्षम नसल्याने तसेच पांढरी मुळे कार्यक्षम न करून घेतल्याने फूट बाहेर पडण्यासाठी आवश्‍यक जोम मुळांद्वारे मिळत नाही, त्यामुळे घड जिरण्याची समस्या उद्‌भवते.
7) ऑक्‍टोबर छाटणीतील चुका ः ऑक्‍टोबर छाटणी करताना झालेल्या चुकांमुळे वेलीवर कमी घड लागतात. योग्य ठिकाणी छाटणी न झाल्यामुळे घड जिरण्याची शक्‍यता कमी होते. हायड्रोजन सायनामाईडची पेस्टिंग करताना जास्त डोळ्यांना पेस्टिंग केली गेल्यामुळे जास्त डोळे फोडून निघतात. वेलीमध्ये अन्नसाठ्याचा अभाव असताना जास्त डोळे फुटल्यास फुटीचा जोम कमी राहतो. अन्नसाठ्याची विभागणी होते व घड जिरणे किंवा लहान येणे यासारखे दुष्परिणाम दिसून येतात.
ऑक्‍टोबर छाटणीनंतरच्या उपाययोजना ः
बागेच्या व्यवस्थापनात झालेल्या काही चुका तसेच काही घटकांचा ऑक्‍टोबर छाटणीशी असणारा प्रत्यक्ष संबंध याचा विचार करता या समस्येवर ऑक्‍टोबर छाटणीनंतर कशाप्रकारे मात करता येईल यासाठी काही उपाययोजना करणे आवश्‍यक असते.
1) खरड छाटणी शक्‍यतोवर उशिरा करू नये.
2) द्राक्ष काडीची घडासाठी तपासणी करावी ः ऑक्‍टोबर छाटणीपूर्वी द्राक्ष काडीची तपासणी करून काडीवरील डोळ्यांमधील घडांची परिस्थिती समजावून घेणे आवश्‍यक आहे. सुरवातीच्या डोळ्यांमध्ये घडनिर्मिती चांगली झालेली असते तेव्हा परिस्थिती लक्षात घेऊन छाटणी केल्यास चांगली घडनिर्मिती झालेले डोळे उपयोगात येऊ शकतात.
3) ऑक्‍टोबर छाटणीपूर्वी ताण देणे ः छाटणीअगोदर ताण दिल्यास पानांमधील अन्नसाठा द्राक्ष काडीकडे व डोळ्यांकडे वळविला जाऊन त्याचा फायदा नवीन फुटीस होईल व एकसारखी फूट निघण्यास मदत होईल.
4) योग्य छाटणी व एकसारखी फूट ः योग्य छाटणी व नियंत्रित डोळ्यांमधून एकसारखी फूट काढणे यास देखील महत्त्व आहे. काडीवरील जितके जास्त डोळे फुटून येतील तेवढा अन्नसाठ्याचा व्यय जास्त होईल. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी घड जिरण्याची समस्या उद्‌भवू शकते. म्हणूनच नेमके डोळे फुटून येण्यासाठी छाटणी व पेस्टिंगद्वारे उपाययोजना करावी. हायड्रोजन सायनामाईडचे प्रमाण योग्य वापरून पेस्टिंग करताना नेमकेच डोळे फोडून काढावेत व नंतर साधारणतः एका काडीवर एक घडाची फूट व विस्ताराच्या दृष्टीने काही वांझ फुटी राखाव्यात.
घड जिरण्याची समस्या दिसत असल्यास वाढ विरोधकांचा वापर करावा. सध्या सीसीसी सारख्या वाढविरोधकास मनाई नसली तरी त्यावरील प्रयोग सुरू असल्यामुळे ते वापरणे इष्ट होणार नाही म्हणून दुसरे वाढविरोधके वापरू नयेत. वेलीच्या वाढीचा वेग हा पाणी तसेच नत्र यांच्या नियंत्रणाने कमी करावा. या वेळी वेलीच्या वाढीचा वेग मंदावणे गरजेचे असते. त्यासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचा योग्य वापर करावा. त्यामध्ये जास्त रसायनाचा वापर टाळावा व जोपर्यंत घड व्यवस्थित होत नाही तोपर्यंत नत्र तसेच जीएचा वापर करू नये. या दरम्यान सी. विड एक्‍सट्रॅक्‍ट किंवा तत्सम रसायनांचा वापर टाळावा. घडात सुधारणा दिसू लागल्यानंतर जीएच्या फवारणीस सुरवात करावी.
5) जमिनीचे व्यवस्थापन ः पांढऱ्या मुळींची संख्या बरेच प्रमाणात घड जिरण्याच्या समस्येसाठी कारणीभूत आहेत. त्यामुळे ऑक्‍टोबर छाटणीपूर्वी जमिनीचे व्यवस्थापन करायला हवे. जमिनीच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत ऑक्‍टोबर छाटणीपूर्वी बोद हलकेसे हलवून मोकळे करावेत. तसेच पांढऱ्या मुळीच्या वाढीस पोषक वातावरण तयार करणे आवश्‍यक असते.
या वर्षीच्या सध्या परिस्थितीमध्ये घड जिरण्याची समस्या जास्त प्रमाणात उद्‌भवणार नाही; परंतु अनियमित पावसामुळे घड जिरण्याची समस्या उद्‌भवू शकते. एप्रिल छाटणी उशिरा झालेल्या द्राक्ष बागांमध्ये ही समस्या उद्‌भवू शकते. त्यामुळे त्यांना वरील काही उपाययोजना फायदेशीर ठरतील. शेवटी प्रत्येक बागेतील परिस्थिती वेगवेगळी असेल व अशाप्रकारे एकसुरी विश्‍लेषण फायद्याचे ठरणार नाही. तेव्हा समस्येचे मूळ शोधण्याकरिता बागेत केल्या जाणाऱ्या कामाची नोंद ठेवून राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचा सल्ला घ्यावा.
अधिक वाचा

...असे ठेवा द्राक्ष बागेचे व्यवस्थापन

द्राक्ष बागेत सध्याच्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या अवस्थेतील कामे सुरू आहेत. आजच्या परिस्थितीचा विचार करता, बागेत पावसाळी वातावरण नाही. त्यामुळे रोगाच्या समस्या कमी असतील. परंतु इतर काही कामे करत असताना बागेत काय काळजी घेतली पाहिजे, याबद्दलची माहिती आजच्या लेखात घेत आहोत.
खुंटावर कलम केलेल्या बागेत डोळे फुटून निघाले असतील. काही ठिकाणी डोळे उमलण्यास अडचण येत असावी. ज्या बागेत कलम केले आहे, अशा बागेत सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गवत काढून बाग स्वच्छ ठेवावी. कारण पाऊस झाला असेल अशा ठिकाणी जमिनीत जास्त आर्द्रता अनुभवास येईल. याचसोबत गवत जास्त असल्यास कलम जोडाजवळ पुन्हा जास्त आर्द्रता वाढेल. कलम जोड व जमीन यामधील अंतर फार कमी असल्यामुळे डाऊनीचा त्रास जास्त वाढू शकतो. कलम जोडावर रोग आल्यास ती कलम पूर्णत: वाया जाऊ शकते. कारण कलम जोडाच्या अवतीभवती गवत असल्यामुळे फवारणी व्यवस्थित करता येत नाही.
फळछाटणी झालेली बाग :
ज्या बागेत नुकतीच फळछाटणी झाली आहे, अशा बागेत आता डोळे फुटून घड बाहेर येण्याची स्थिती असावी. पाऊस संपून जवळपास एक आठवडा झाला, त्यामुळे या वेळी घड जिरण्याची समस्या कमी असेल. वातावरणात जास्त तापमान व आर्द्रता असेल, अशावेळी फूटसुद्धा जास्त जोमात दिसेल. अशा वातावरणात कमीत कमी हायड्रोजन सायनामाईडचा वापरसुद्धा चालेल; परंतु एकसारखी फूट निघावी या दृष्टीने जाड काडी पुन्हा एकदा पेस्ट करावी किंवा पहिल्यांदा पेस्टिंग करतेवेळी जाड काडी मोडून किंवा पिळून घ्यावी. यामुळे एकसारखी फूट बाहेर येण्यास मदत होईल. या बागेत वाढीकरिता पोषक वातावरण असल्यामुळे वाढ जास्त होईल. म्हणजेच फेलफूट लवकर काढून टाकण्याची अवस्था लवकर येईल. फुटीमध्ये अन्नद्रव्य वाया जाणार नाही, याची दक्षता घेऊन वेळीच फेलफूट काढून टाकाव्यात.
रोगनियंत्रण :
फळछाटणी होऊन काही बागेत प्रीब्लूम अवस्थेत घड दिसून येतात. सध्याच्या वातावरणाचा विचार करता द्राक्ष बागेत तापमान जास्त व आर्द्रतासुद्धा जास्त असल्याचा अनुभव येतो. याच बागेत सायंकाळी व सकाळी पानावर दवबिंदू दिसून येतील. अशावेळी पानांवर डाऊनीचा पुन्हा त्रास होण्याची समस्या आढळून येईल, तेव्हा ज्या ठिकाणी कॅनॉपीची गर्दी जास्त आहे, अशा ठिकाणी तळातील पाने काढून टाकल्यास गर्दी कमी करण्यास मदत होईल. त्याचसोबत शिफारशीत फवारणी केल्यास व्यवस्थित कव्हरेज मिळेल. या बागेत शिफारशीप्रमाणे बुरशीनाशकांची फवारणी घेऊन रोगनियंत्रणात ठेवावा.
कीडनियंत्रण :
जास्त आर्द्रतेमुळे बागेत फुलकिडी प्रादुर्भाव दरवर्षीपेक्षा या वर्षी जास्त असल्याचे आढळून येते. नवीन फुटींवर अजूनही हा त्रास दिसतो. नवीन पाने काढून टाकल्यास पानांवरील फुलकिडी घडावर पोचतील, तेव्हा शिफारशीत कीटकनाशकांचा वापर करून वेळीच या फुलकिडीवर नियंत्रण ठेवावे, अन्यथा मण्यांवर कीड पोचल्यास समस्या उद्‌भवतील.
थिनिंग :
लवकर छाटणी झालेल्या बागेत सध्या थिनिंगची कामे सुरू आहेत. घड जर सुरवातीसच सुटा झाला असल्यास आता जास्त थिनिंग करायची गरज नसेल; परंतु थिनिंग करतेवेळी सुरवातीच्या वरच्या तीन पाकळ्या तशाच ठेवून त्यानंतर घडाच्या परिस्थितीनुसार एका आड एक किंवा एकाआड दोन पाकळ्या अशा काढून घडातील मण्यांची संख्या ठेवावी. थिनिंग झाल्यानंतर लगेच बागेत शिफारशीत बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी. यामुळे मण्याला झालेल्या इजेपासून बचाव होईल.
अधिक वाचा

संजीवकांचा वापर

द्राक्ष बागेत अनेक संजीवकाचा वापर केला जातो त्यामध्ये प्रामुख्याने इथ्रेल (इथिलीन),जिब्रेलिक अ‍ॅसिड, लिहोसीन, सिक्स बीए ,ब्रासोनो  (पोषक ) सीपीपीयु यांचा वापर करण्यात येतो.ही संजीवके वापरतांना फारच काळजी घ्यावी लागते त्यांचे प्रमाण कश्या प्रकारे घ्यावे याची थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे-
१) ईथ्रेल (इथिलीन): ऑक्टोबर छाटणी पूर्वी साधारणता दोन आठवडे या संजीवकाचा वापर पानगळ करण्यासाठी केला जातो.१००० ते २५०० पीपीएम तीव्रतेचे द्रावण फवारले असता छाटणी पर्यत पाने ९० % पर्यत पानगळ होते.तसेच छाटणी योग्य डोळावर करणे सोपे जाते.तसेच छाटणीनंतर डोळे लवकर फुटण्यास मदत होते.
प्रमाण - ईथ्रेल  १२५ मिली ९९ लिटर पाणी -५०० पीपीएम
              ईथ्रेल  १५० मिली ९९ लिटर पाणी -१००० पीपीएम
             ईथ्रेल  ५०० मिली ९९ लिटर पाणी -२००० पीपीएम
             ईथ्रेल  ६२५ मिली ९९ लिटर पाणी -२५०० पीपीएम
२.जिब्रेलिक अ‍ॅसिड : जिब्रेलिक अ‍ॅसिड हे जीब्रेलीन गटातील असून याच्या मुळे पेशी लांबट होतात.घडाच्या पाकळ्या, मण्यांचे  देठ आणि मणी आकार लांबट करण्यासाठी जिब्रेलिक अ‍ॅसिड उपयोग होतो.ऑक्टोबर छाटणीनंतर घड कोवळा असतांना हे संजीवक घडावर वापरावे.घड पोपटी हिरवा असतांना १० पी.पी.एम द्रावणाची फवारणी करावी.यामुळे घडाची लांबी वाढून पाकळ्या मोकळ्या होतात
जर आपणास पहिली बुडवणी (डीप) करावयाची नसल्यास पहिल्या फवारणीनंतर दर पाच दिवसांनी पुन्हा १५ ते २० पीपीएम ने फवारणी करावी. यानंतर पुन्हा पाच दिवसांनी २० पीपीएम ने फवारणी करावी.एकूण तीन फवारण्या घ्याव्यात.
जिब्रेलिक अ‍ॅसिड द्रावण तयार करण्यासाठी प्रमाण:
एक ग्रॅम जीए + ३० मिली अ‍ॅसिटोनमध्ये विरघळून घ्यावे.त्यात क्षारविरहित स्वछ पाणी मिसळुन एक लिटर द्रावण करावे. यास मुळ द्रावण (स्टॉक सोलुशन) असे म्हणतात.
वेगवेगळ्या तीव्रतेचे द्रावण तयार करण्यासाठी :-
१ ग्रॅम जीए , १ लिटर मुळ द्रावण- ९९ लिटर पाणी - १० पी पी एम
१ ग्रॅम जीए , १ लिटर मुळ द्रावण- ४९ लिटर पाणी - २० पी पी एम
१ ग्रॅम जीए , १ लिटर मुळ द्रावण- ३९ लिटर पाणी - २५ पी पी एम
१ ग्रॅम जीए , १ लिटर मुळ द्रावण- २४ लिटर पाणी - ४० पी पी एम
१ ग्रॅम जीए , १ लिटर मुळ द्रावण- १९ लिटर पाणी - ५० पी पी एम
जिबरेलीक अ‍ॅसिड वापरण्यासाठी घडाची अवस्था आणि संजीवकाची तीव्रता याचा मेळ घालणे महत्त्वाचे असते.
३. क्लोरमॅक्कॉट (लिहोसीन):
क्लोरमॅक्कॉट,सायकोसील,सीसीसी,मेपीकॉट क्लोराईड, आणि  लोहोसीन इत्यादि नावाने हे संजीवक ओळखले जाते.हे संजीवक वाढ निरोधक म्हणून काम करते.ऐनवेळी पाऊस पडला तर कोवळी फुट जोमाने वाढते. अशा वेळी घडापुढील शेंडा लवकर वाढतो. त्यामुळे घडांचा जोम मंदावतो या वेळी शेंड्याचा जोम थांबविण्यासाठी वाढ विरोधक संजीवकाचा वापर आवश्यक असतो. पावसाप्रमाणे काही बाबीमुळे सुद्धा शेंडा वाढीस चालना मिळते अशा वेळी हे संजीवक वापरूनसंभाव्य नुकसान टाळावे. ऑक्टोबर छाटणीनंतर घड आणि घडांची फुट वाढीचा काळात फुटीचा शेंडा जोमाने वाढतो वेलीत वाढलेल्या अन्नरसात वाढ चालू असते. फुटीच्या पाचव्या सहाव्या डोळ्यातून घड बाहेर येतो खोडाकडील अन्न रसाचा ओध शेंडा वाढीकडे असल्याने घडाचे पोषण मंदावते. याचा परिणाम घडांचा दर्जा खालवण्यात होतो. शेंडा वाढ थांबवून अन्नरसाचा ओघ घडाकडे वळवल्यास घडांचा दर्जा सुधारतो आणि हेच काम संजीवके करतात
द्राक्षासाठी लिहोसीन वापरण्याची अवस्था :
ऑक्टोबर छाटणीनंतर नवीन फुटीचा ५,६ व्या डोळ्यातील.घड कोवळा असतांना म्हणजे त्यांचा रंग पिवळट
अगर पोपटी असतांना हे संजीवक वापरावे. वेलीवर सर्वच घडाची आणि फुटीची अवस्था एक सारखी नसते. लिहोसीनचा वापर करताच सर्वच शेंड्यांचा जोम मंदावतो आणि तो घडाकडे वळतो. पानांची कर्बग्रहण शक्ती वाढते.शेंड्याकडील अन्नरसाचा ओघ थांबल्यामुळे आणि नवीन पानांची कर्बग्रहणशक्ती वाढल्यामुळे असा दुहेरी अन्नरस घडांना मिळाल्यामुळे घडाचा पोत सुधारतो.सर्व घडांची अवस्था समान पातळीवर येते आणि परिणामी जीब्रालिक असिडचा वापर सुलभ रित्या करता येतो.
द्रावणाची तीव्रता :    
योग्य वेळी वापर केल्यास २५० पीपीएम तीव्रतेचे द्रावण योग्य ठरते.पाहिजे असणा-या अवस्थेपूर्वी एक दिवस अगोदर कमी तीव्रतेचे म्हणजे पीपीएम द्रावण आणि दोन दिवस आगोदर १२५ पीपीएम चे द्रावण वापरावे.या उलट उशीर झाला तर ३७५ किंवा ४५० पीपीएम तीव्रता वापरावी. परंतु ५०० पीपीएम पेक्षा जास्त तीव्रतेचे संजीवक वापरने नुकसानीचे ठरते.सध्या बाजारात लिहोसीन हे संजीवक उपलब्ध आहे.त्याची तीव्रता ५०% असून ते द्रवरूपात उपलब्ध होते.ते पाण्यात मिसळते.
१०० मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी -१००० पीपीएम 
५० मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी -५०० पीपीएम
२५ मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी -२५० पीपीएम
२० मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी -१२५ पीपीएम
४० मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी -२०० पीपीएम
६० मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी- ३०० पीपीएम
७५ मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी -३७५ पीपीएम
९० मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी -४५०पीपीएम
लिहोसीन  वापरतांना घ्यावयाची काळजी :
हे संजीवक वापरतांना जमिनीत पुरेसा ओलावा असावा.संजीवक फवारतांना शेड्याकडील भागावर एकसारखी फवारणी करावी.फुटीवर ६ ते ७ पाने असतांना तसेच घडापुढे ५-६ पाने असतांना हे संजीवक अधिक परिणामकारक ठरते.
४) सिक्स -बी ए :
   हे संजीवक कायनेटिक या गटात मोडते.पेशीचे विभाजन करण्याच्या गुणधर्मामुळे द्राक्ष भरदार होतात. पानात अधिककर्ब ग्रहण होते.त्यामुळे फळाचे वजन आणि गोडी वाढण्यास मदत होते.फलधारणा पूर्ण झाल्यावर लगेच हे संजीवक १० ते १५ या तीव्रतेने पीपीएम फवारावे.जीब्रालिकच्या फवारण्या झाल्यानंतर गडलिंग करण्यास उशीर होत असल्यास हे संजीवक वापरावे.  
सिक्स बीए च्या जास्तीत जास्त दोन फवारण्या आणि एकूण २० पीपीएम पेक्षा कमी प्रमाणात वापर करावा.सिक्स बीए संजीवक आयसोप्रोपाईल अल्कोहोल मध्ये विरघळून घ्यावे.
५.एनएए: नॅपथेलिक अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड : य़ा संजीवकाचा द्राक्षात वापर काही विशिष्ट कारणासाठी केला जातो.मोहरगळ अथवा लहान फळ गळ थांबवण्यासाठी या संजीवकाचा उपयोग होतो.घड फुलो-यातून बाहेर पडल्यापासून तर मणी ज्वारीच्या आकाराचे होईपर्यंतच्या काळात होणारी गळ थांबवण्यासाठी याचा उपयोग केला जातो.यासाठी सुरुवातीस २० पीपीएम तिव्रतेचे द्रावण वापरावे.फलधारनेनंतर एनएए संजीवक वापरले असता फळावरील लव (नॅचरल ब्लूम ) चांगली येते.काढणीपूर्वी मणीगळ कमी होते.तसेच एक आठवडा काढणी लांबवता येते.द्राक्ष काढणीपूर्वी कोणतेही संजीवक २५ दिवस आगोदर वापरू नये.
अधिक वाचा

द्राक्ष गुणवत्तेची त्रिसूत्री :

१.जीब्रेलिक अ‍ॅसिडचा वापर
२. विरळणी
३.गडलिंग
दर्जेदार द्राक्ष म्हणजे एक सारखे लांब असलेले व उत्तम स्वाद रंग व गोडी असलेले मणी,घडामध्ये शक्यतो शॉर्ट बेरीजचे प्रमाण असू नये.मणी एकसारख्या लांबी व फुगवणीचे असावे.दर्जेदार द्राक्ष बनविण्यासाठी अप्रत्यक्षपणे परीणाम करणारे घटक उदा.द्राक्षाची जात,हवामान ,जमिनीचा प्रकार ,मशागत पद्धती ,पाणी देणे पध्दत,रोग व किडींचा बंदोबस्त प्रत्यक्षपणे परिणाम करणारे घटक उदा.घड संख्या कमी करणे,विरळणी करणे ,गडलिंग करणे व संजीवकांचा योग्य वापर करणे हि आहेत.
१.जीब्रेलिक अ‍ॅसिडचा वापर:
१) पहिली बुडवणी (प्रीब्लूम  बुडवणी ) :घड सोनेरी हिरवा पिवळा असतांना म्हणजेच पोपटी असतांना २० ते २५  पीपीएमच्या जीएच्या द्रावणात घडाची बुडवणी करावी.साधारणपणे  थॉमसन सीडलेस २० ते २३  व्या दिवशी स्टेज येते.घडाची पहिली पाकळी मोकळी होणे म्हणजे घडाच्या दांडयापासून अलग झालेली असते.व त्या खालील पाकळ्या कॅप्सुल गोळी आकारात असतात. अशा वेळी वर नमूद केलेल्या स्टेजला बुडवणी करावी.स्टेज आलेली असेल परंतु शेंडा वाढ झालेली नसल्यास किंवा मिळालेला असल्यास घड बुडविणे अवघड होते. व अशा वेळी घडाची व फांद्यांची मोडतोड जास्त प्रमाणात होते. शेंदावाढ मिळालेली नसल्यास घड व फुटीचा शेंडा जिएच्या द्रावणात बुडवून घ्यावा. म्हणजे शेंडा वाढ व घड वाढ होण्यास मदत होईल.ही बुडवणी केल्याने घडाच्या पाकळ्या ३-४-५ दिवसांनी संपूर्ण मोकळ्या होतात व दोन पाकळ्यातील अंतरात लांबी मिळते. प्लेमसीडलेस द्राक्षामध्ये सुरुवातीला स्टेजला घड गोळी सारखा दिसत असलातरी जीए वापरल्यानंतर तो आकाराने मोठा होऊन एक चांगल्या प्रकारचा घड तयार होतो. पहिली बुडवणी झाल्यानंतर पुन्हा ४-५ दिवसांनी १० ते १५ पीपीएम जीएची फवारणी किंवा बुडवणी करावी. बुडवणी करीत असताना घडाला १/२ ते १/३ शेंडा नखलावा म्हणजे घड वीरळणी होऊन पाकळ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होते. तसेच दोन पाकळ्यातील व पाकळ्यातील कांड्याची लांबी मिळण्यास मदत होते.घडांचा दांडा नखलल्यास जीएमध्ये १ ग्रॅम बेनोमील किंवा १/२ मिली अ‍ॅमिस्टार प्रती लिटर पाण्यातसाठी मिसळावे म्हणजे जखमेमधून रोगराईचा प्रादुर्भाव होणार नाही.जीए फवारणी केली तरी चालेल परंतु फुटीची दाटी असता कामा नये .जीए बरोबर २ ग्रॅम युरिया प्रती लिटर पाण्यासाठी वापरावा  फवारणी एकसारखी व सर्वत्र करावी.
२.दुसरी बुडवणी (कॅपफॉल बुडवणी नंतर  ) :घडाच्या टोप्या उचलल्या नंतर किंवा गळाल्या नंतर  म्हणजेच मणी सेटिंग नंतर सीपीपीयु  बरोबर ४० पीपीएम जीए ची बुडवणी करावी.ही अवस्था साधारणता ४० ते ४५ व्या दिवशी येते.तापमाननुसार व जमिनीच्या प्रकारानुसार हि अवस्था थोडी उशीरा येऊ शकते
३.तिसरी बुडवणी - मणी ज्वारीच्या आकारा एवढे झाल्यानंतर तिसरी बुडवणी ३० ते ४० पीपीएमने करावी. भुरी नियंत्रणासाठी अ‍ॅमिस्टार १/२ मिली प्रतिलीटर ही अवस्था ५५ ते ६० दिवसांत येते.
२.विरळणी (थीनिंग )  : म्हणजे वेलीच्या क्षमतेनुसार,दर्जेदार उत्पादन मिळण्यासाठी काड्या, पाने, घड, पाकळ्या,मणी याची परिस्थीतीनुसार संख्या कमी करणे .विरळणीमुळे मण्यांची फुगवण ,पोषण ,आकर्षकता आणि वजन सुधारते.घडातील मनीकुज कमी होते. व रोग किडीचा प्रादुर्भाव टाळणे शक्य होते.सर्व घड एकसारख्या आकाराचे तयार होण्यास मदत होते.निर्यात योग्य उत्पादन घ्यावयाचे असल्यास सर्वांत जास्त महत्व विरळणीलाच आहे.
३.गडलिंग: गडलिंगची अवस्था दुसरी बुडवणी झाल्यानंतर ३/४ दिवसांनी येते.गडलिंग करण्याची स्टेज साधारणपणे छाटणीनंतर ५० ते ६० दिवसांच्या दरम्यान येते. गडलिंग करण्याअगोदर सर्व मांडव -वेली हेलकावून घ्याव्यात.म्हणजेविरळणी होऊन शॉर्टबेरीज होणार नाही. गडलिंग साधारणपणे २ ते २.५ मि.मी.
रुंद आकाराची करावी.म्हणजेच एक रुपया नाणे जाडीची करावी. गडलिंगची जखम २१ ते २८ दिवसात भरून आली पाहिजे.गडलिंगमुळे मुळाकडे जाणारा अन्नसाठा वेलीवरील ऑक्झीन व जीब्रेलिक सारख्या संजीवकाची पातळी वाढते.
               मणी व घड मोठे करण्यासाठी  गडलिंगची  मणी  हे बाजरीच्या आकाराचे असतांना परंतु नैसर्गिक गळ झाल्यानंतर करावी.म्हणजे शॉर्टब्रेरीज होणार नाही.गडलिंग केल्यानंतर वेलीला पाण्याचा ताण पडणार नाही या कडे लक्ष द्यावे.
अधिक वाचा

द्राक्षवेलीसाठी फर्टीगेशनचे नियोजन

गोडी छाटणीसाठी विद्राव्य खतांच्या ग्रेड्स निवडतांना व त्याचे दररोजचे प्रमाण वाढविण्यासाठी द्राक्षवाढीच्या विविध अवस्थांचा विचार करणे आवश्यक आहे.गोडी छाटणीपासून ते द्राक्ष काढणीपर्यंत द्राक्षवेलीच्या वाढीच्या अवस्थेनुसार लागणारी अन्नद्रव्यांची गरज व वापरावयाच्या विद्राव्य खतांच्या ग्रेड्स पुढील प्रमाणे -
छाटणी पासून ते पहिले १५ दिवस  
या अवस्थेत डोळे फुट होत असतांना नत्राचे प्रमाण हे स्फुरद व पालाश यांच्या पेक्षा दुप्पट लागते.म्हणजे एकसारखी डोळे फुट होते.या मध्ये २०:१०:१० +१ मग्नेशीअम +सूक्ष्मअन्नद्रव्ये ही ग्रेड उपयुक्त आहे.
काडीच्या वाढीची अवस्था
या अवस्थेमध्ये घड बाहेर पडत असतात व काडीची वाढ होत असते म्हणून नत्र,स्फुरद,व पालाश यांचे प्रमाण एकसारखे ठेवावे लागते.म्हणून २०:२०:२०: किंवा १९:१९:१९ + मग्नेशीअम +सूक्ष्मअन्नद्रव्ये ही ग्रेड वापरावी 
फुलोरा व फलधारणा
या अवस्थेमध्ये नत्र व पालाशच्या तुलनेत स्फुरदाचे प्रमाण जास्त लागते म्हणून १२:६१:०० ही ग्रेड वापरावी .
फळधारणा ते मणी वाढीची अवस्था 
या अवस्थेमध्ये द्राक्ष वेलींना नत्र,स्फुरद व पालाश १:३:१ या प्रमाणात लागतो म्हणून १३:४०:१३ हि ग्रेड वापरावी.
मण्यात  पाणी फिरण्याची अवस्था
या अवस्थेमध्ये अत्यंत कमी कमी प्रमाणात नत्र व भरपूर पालाश लागतो म्हणून १३:००:४५ ही ग्रेड वापरावी.
फळ पक्वतेची अवस्था
या अवस्थेमध्ये मण्यांमध्ये साखर भरत असते.म्हणून पालाश बरोबर सल्फर असल्यास साखरेचे प्रमाण वाढते व फळ पक्वता लवकर होते.त्यामुळे ००:००:५० +१८% सल्फर ही ग्रेड उपयुक्त ठरते.तसेच मालाची साठवणूक क्षमता वाढते.
 फर्टीगेशन करत असतांना घ्यावयाची काळजी
गेल्या १५ हंगामातील अनुभवांचा विचार करता  फर्टीगेशन तंत्रज्ञान अवलंबताना खालील गोष्टींचा बारकाईने विचार व कृती होणे गरजेचे आहे.
१.शेड्यूलसं मध्ये दिलेली खतांची मात्रा ही सर्व साधारणपणे द्राक्षाला लागणा-या अन्नद्रव्यांची एकूण गरज व चाचणी प्रयोगाचे निष्कर्ष यांच्यावरून ठरवण्यात आलेली आहे.त्यामध्ये माती आणि देठ पृथक्करण अहवालानुसार योग्य वेळी योग्य तो बदल करून घेणे गरजेचे आहे.
फर्टीगेशनचा चांगला फायदा मिळवण्यासाठी छाटणीपूर्वी मातीचे परीक्षण करणे गरजेचे आहे.हे केल्याने जमिनीचा प्रकार, जमिनीचा पीएच (सामू) , सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता,सेंद्रीय कर्ब ,चुनखडीचे प्रमाण व जमिनीची क्षारता या सर्व गोष्टी कळतात.त्या नुसारच खतांची मात्रा ठरवावी.
३.बदलते हवामान अवेळी पाउस या सर्व गोष्टींचा विचार करून व आपल्या अनुभवानुसार यामध्ये योग्य तो बदल करणे गरजेचे आहे.उदा. जर शेंडा वाढ ही अत्यंत जास्त असेल व हवामान अनकूल असेल तर नत्रयुक्त खतांच्या वापरावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे.
४.विद्राव्य खतांची मात्रा ही जास्तीत जास्त वेळा विभागणी करून देणे केव्हाही चांगले असते.
५.फर्टीगेशन करत असतांना ठिबक संचाची काळजी घेणे आवश्यक आहे ,प्रत्येक वेलीला समान प्रमाणात खते मिळतीलच ही काळजी घेणे खुपच महत्वाचे आहे.
अधिक वाचा

द्राक्ष बागेत स्लरीचे महत्व

 द्राक्ष बागेत स्लरीचे आतिशय महत्व आहे.स्लरीचा वापर केल्याने द्राक्षवेलीची मुळी सतत चालू राहते त्यामुळे द्राक्ष पिकास अतिशय पोषण होऊन उत्पादनात निश्चित वाढ होते.माझ्या अनुभवा नुसार व माहिती नुसार द्राक्षाची पांढरी मुळी सतत चालू ठेवण्यासाठी खालील प्रमाणे स्लरी अतिशय उपयुक्त आहे.
स्लरी  एकरी २०० लिटर पाण्यासाठी-
२०० लिटर पाणी
४० किलो शेण (४ घमेले )
० ते १५ लिटर गोमुत्र
२ किलो. हरभरा ( भरडलेला)
२ किलो सोयाबीन (भरडलेली )
४ लिटर दही अथवा ताक
२ ते ४ किलो काळा गुळ
२ किलो तांदूळ पेज
 +  बॅक्टेरिया कल्चर 
वरील  सर्व ७ दिवस सावलीत  भिजत ठेवा.पहिल्या तीन दिवस दिवसातून तीन वेळेस उलटे-पालटे हलवा. वरील स्लरीचा एक भाग + १० भाग पाणी घेऊन एकरी मणी सेटिंग नंतर २१ दिवसाच्या अंतराने ३ वेळेस टाका.
सेंद्रीय पदार्थ आणि विघटन करणारे जीवाणू बरोबर सुपिकता म्हणजे जिवाणूंचे संवर्धन केल्यामुळे अन्नद्रव्याची  पिकास उपलब्धता वाढणार आहे.हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे.त्यामध्ये स्फुरद विरघळणारे जीवाणू (पी.एस.बी.),अझोतोबाक्ट्र्र डिक्स हे दर्जेदार उत्पादनासाठी सेंद्रीय पदार्थ पिकास देणे अनिवार्य असून जीवाणू संवर्धनासाठी देखील तितकेच महत्वाचे आहे.पिकावर येणारे बॅक्टेरिया फंगल इन्पशन हे जमिनीतील सेंद्रिय पदार्थावर उपजीविका करून जिवंत राहतात व पिकाच्या प्रतिकूल परिस्थीतीत आणि त्यांच्या वाढीस अनकूल असलेल्या हवामानात पिकावर हल्ला चढवितात परंतु जीवाणू खतांच्या वापराने हानिकारक जीवाणु पेक्षा उपयुक्त जीवाणूंची वाढ जोमाने होते.ती जागा मायक्रोऑर्गनायझेशने घेतल्याने इतर रोगकारकांचा उपजीवीकेवर परीणाम होऊन त्यांची संख्या नियंत्रणात येते व उपयुक्त जिवाणूमुळे पिकास मुक्त स्वरुपात हुमिक आम्ल,प्रथिन एन्झाइम्स,ओर्गानिक असिडस इ.मुबलक स्वरुपात उपलब्ध होतात त्यामुळे पिकाची रोग प्रतिकारक शक्ती वाढून पिक सदैव काळोखीवर राहते.
अधिक वाचा

द्राक्षफळ द्राक्षाची आवश्यकता

हिवाळा संपण्याची चाहूल लागली, की द्राक्षांचे घोस लक्ष वेधून घेतात. प्राचीन काळापासून ज्ञात असलेल्या या रसदार फळाचा स्वाद मधुर आहेच; पण जीवनसत्त्वे आणि औषधी गुणधर्मांनीही ते परिपूर्ण आहे. कारण द्राक्ष तयार करतांना बागायतदार आपल्या मुलाप्रमाणे त्याला सर्व अन्नद्रव्ये घालत असतात.द्राक्ष हे पाणीदार फळ असल्याने त्याच्या रसात १६ पेक्षा जास्त अन्नद्रव्य असल्याने आपल्या शरीराला मिळतात.द्राक्ष हे प्राचीन फळ मानले जाते. महर्षी वाग्भट द्राक्षाला "फलोत्तमा' असे संबोधतात. द्राक्षाची उपयुक्तता, निवड आणि वापर कसा करावा याची माहिती.
द्राक्षाची लागवड :द्राक्ष पिकाचा कालावधी हा ४ ते ५ महिने झाडावर असते.त्या वरील रोग व किडीच्या बंदोबस्तासाठी द्राक्ष बागायतदार औषधाची फवारणी करतात परंतु फळ पक्व होण्यापूर्वीच फवारणी बंद केली जाते.तेव्हा द्राक्ष तयार झाल्यानंतर त्यामध्ये शक्यतो औषधांचे अंश शिल्लक राहत नाही.आज जवळपास सर्वच द्राक्ष बागायतदार आपली द्राक्ष निर्यात करतात.परंतु निर्यातीसाठी द्राक्ष आकारमान हे १६ ते २० मिमी असावे लागते.म्हणून द्राक्ष वेलीवरील प्रत्येक घड हा निर्यातच होतो असे नाही.जो माल निर्यातक्षम असेल तो निर्यात होतो.व राहिलेला माल हा लोकल बाजारपेठेत जातो.तेव्हा द्राक्ष खाणे हे हानिकारक नाही.हे आता सिद्ध झाले आहे.भारतात मोठ्या प्रमाणात द्राक्षाची लागवड केली जाते. पुणे, सातारा, नाशिक, खानदेश तसेच पंजाबमध्येही द्राक्षलागवड केली जाते. युरोपमध्ये अधिक व्यापक प्रमाणात द्राक्षबागा उभारल्या जातात. द्राक्ष हे उत्तम प्रतीचे फळ आहे. रंगांवरून द्राक्षाचे हिरवी, काळी आणि लालसर काळी असे प्रकार तर बियांसह आणि बियाविरहित असेही प्रकार आढळतात. आयुर्वेदाने सबीज द्राक्षे श्रेष्ठ तर बिया नसलेली द्राक्षे अल्पगुणी मानली आहेत. काळ्या द्राक्षाचा वापर औषधांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. द्राक्षांपासून जॅम, ज्यूस, जेली, वाइन, व्हिनेगर बनवले जाते. द्राक्षे वाळवून मनुका, बेदाणे बनवले जातात. औषधांसाठी द्राक्षाचे बी, फळ, पाने यांचाही वापर होतो.
द्राक्षाची पौष्टिकता:
* द्राक्षात कॅल्शिअम, कॉपर, आयर्न, मॅग्नेशिअम, मॅंगनीज, पोटॅशिअम, सल्फर, सिलिकॉन असे पोषक घटक असतात.
* द्राक्षात जीवनसत्त्व सी आढळते त्यामुळे त्वचारोगावर उपयुक्त.
* जीवनसत्त्व बी 1, बी 2, बी; तसेच फ्लेवोनाइड्‌स आढळतात, जी शरीरास हितकर असतात.
* द्राक्षाचा रंग जेवढा गडद तितकी फ्लेवोनाइड्‌स अधिक असतात.
* त्वरित ऊर्जानिर्मितीसाठी द्राक्षाचा उपयोग होतो.
* द्राक्षबियांतील सॅलिसिलेटमुळे रक्त गोठत नाही, प्लेटलेट्‌स चिकटत नाहीत, त्यामुळे ती ऍस्पिरिनसारखी काम करतात.
* द्राक्षात ग्लुकोज असल्याने तापाने आजारी रुग्णांना द्राक्ष आवर्जून द्यावे; मात्र मधुमेहींनी द्राक्षाचे फार सेवन टाळावे.
* ताजी द्राक्षे योग्य प्रमाणात खाल्ल्यास बद्धकोष्ठतेवर गुणकारी ठरतात.
* डोळ्यांच्या आरोग्यासाठी द्राक्षे उपयुक्त असतात.
* द्राक्षामध्ये आढळणारे फोलेट गर्भवतींसाठी उपयोगी ठरते. या काळात योग्य प्रमाणात द्राक्षांचे सेवन करावे.
* रक्तशुद्धीसाठी द्राक्षाच्या रसाचा (ज्यूस) उपयोग होतो.
* द्राक्षातील फायटोकेमिकल्सचा कर्करोग, हृदयविकाराच्या प्रतिबंधासाठी उपयोग होतो.
* आपल्या शरीरासाठी एका व्यक्तीने कमीत कमी ६ किलो द्राक्ष एका सिझन मध्ये खावी.तेव्हा आपल्या शरीराची झीज उत्तम प्रकारे भरून निघते.
गुणकारी द्राक्ष
* द्राक्षफळ तोंडाला उत्तम रुची आणि स्वाद आणते.
* भूक-तहान शमविण्यासाठीही वापरता येते.
* शरीराचे आणि मनाचेही पोषण त्यातून होते.
* द्राक्षसेवनाने शरीराला व मनाला उत्साह,ऊर्जा, स्फूर्ती मिळते.
* शरीरसंवर्धनासाठी द्राक्ष उपयुक्त ठरते.
* अशक्तपणावरही द्राक्षे गुणकारी ठरतात.
* औषधी गुणधर्मामुळे द्राक्ष हा उत्तम उपचार समजला जातो.
द्राक्षाची निवड आणि वापर
* ताजी, घट्ट द्राक्षे निवडून घ्यावीत. ती सुरकुतलेली नसावीत. पिवळसर द्राक्षे मधुर असतात. शक्‍यतो रंगाने पिवळी द्राक्षे निवडावीत आणि लवकर संपवावीत. साठवण करू नये.
* द्राक्षे प्रथम पाण्यात बुडवून ठेवावीत. हलक्‍या हाताने चोळून स्वच्छ करावीत आणि मग खावीत.
अधिक वाचा

आपली जाहिरात

दरमहा ८००० अधिक मराठी वाचक असलेली आणि ११०० हून अधिक सभासद असलेली निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी माहिती पुरवणारी मराठीतील हि अग्रणी साईट आहे.nashikgrapes.in हि वेबसाईट केवळ द्राक्ष उत्पादकांसाठी महत्वाची माहिती देणारी साईट आहे.द्राक्ष उत्पादकासाठी अनेक चर्चासत्र आयोजित करत असलेली या साईटवर आपल्याला आपल्या पुस्तकाची ,शेतीयोग्य उत्पादनाची जाहिरात करणं हे नक्कीच कधीही आपल्याच फायद्याचं आहे. जाहिरातींचे प्रकार आणि त्यांसाठीच्या जागा तयार आहेत. याशिवाय इतर काही जाहिरात प्रकार आपल्या मनात असतील, तर त्याचे स्वागत आहे. त्यासाठी nashikgrapes.in च्या मुख्य पानावर जाऊन आपल्याला कोणत्या ठिकाणी जाहिरात द्यायला आवडेल!? ते ठरवावे.
जाहिरात देण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधता येईल. त्यात * केलेल्या जागा भरणं आवश्यक आहे. बाकी जागा नाहीत भरल्या तरी चालेल. याशिवाय nashikgrape@gmail.com हा संपर्कासाठीचा ई-मेल पत्ता आहे. धन्यवाद!
अधिक वाचा

सभासद धन्यवाद!



धन्यवाद !

लवकरच आपल्याला नाशिकग्रेप्स सभासद यादी मध्ये समाविष्ट केले जाईल.



अधिक वाचा

प्रश्न तुमचे उत्तर तज्ञांचे

द्राक्ष बागेत काम करतांना अनेक समस्या येतात.या समस्यांसंदर्भात द्राक्ष बागायतदारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची तज्ञांनी दिलेली उत्तरे......


मातीचे आणि देठाचे पृथ:करण नियमीत करणे गरजेचे आहे काय?
-निदान करणे :अशा पध्दतीचे पृथ:करण वेलीमधील अन्नद्रव्यांचा असमतोलपणा, कमतरता व त्यांचे जास्त प्रमाण (विषमता) तपासण्यासाठी केली जाते.असे पृथ:करण केल्यास वेलीतील प्राकृतिक बिघाड कि,जो उत्पादकता कमी करतात,तो समजण्यासाठी मदत होते.कधी कधी वेलीमधील दोन पेक्षा अधिक मुलद्रव्यांची कमतरता आढळल्यास ती ओळखणे अवघड ज़ाते अशा वेळेस देठाचे पृथ:करण करणे जरुरीचे बनते.भुरी सारख्या रोगाचे लक्षण क़ि ज्यात पानांच्या बाहेरील बाजु आतमध्ये वळतात,पालाश कमतरतेशी मिळती जुळती असतात,द्राक्षबागायतदार अशा स्थितीत गोंधळून जातो.वेलीच्या मुळ्य़ांभोवती पाणी साठून राहिल्यास,तेथील हवा खेळती राहत नाही,आणि त्यात जर क्षारतेची भर पडली तर पाने तशीच लक्षणे दाखवतात. अशा पस्थितीत निरोगी वेल व आजारी वेल बाजुला करुन त्यांचे पृथ:करण केले जाते.त्यांचे नमुने एकत्र करण्यासाठी देखील निरोगी व आजारी वेल निवडली जाते.


निरीक्षण : अशा पध्दतीने पृथ:करण हे वेलीमधील अन्नद्रव्याची योग्य रितीने देखरेख करते. जेणे करुन आपणास परिणामी उत्पादन मिळते.यामुळे वेलींना लागणा-या अन्नद्रव्यांची चालु हंगामात गरज आणि अन्नद्रव्यांनवर निष्फळ खर्च कमी करता येतो. आपण सुक्ष्म घड निर्मीतीच्या वेळेस आणि घडांची फुलोरा अवस्थेत देठ पृथ:करण करण्यास शिफारस करतो,यामुळे वेलीमधील घडांचा दर्जा व उत्पादनासाठी लागणा-या अन्नद्रव्यांची निरीक्षणे करावयाची असल्यास, बागेत विशिष्ठ ठिकाण शोधुन प्रत्येक वेळेस त्याच वेलीवरुन नमुने गोळा करावेत.यामुळे अन्नद्रव्यांचे आणि त्यामुळे वेलीच्या उत्पादकतेचे निरीक्षण करणे देखील सोपे जाते.
मातीचे पृथ:करण हे हंग़ाम सुरु होण्य़ापूर्वी आणि खते देण्याआधी करुन घेणे महत्वाचे आहे, यामुळे जमीनीतील सामु,विद्युत वाहकता आणि विशिष्ठ मुलद्रव्यांचे कमी आधिक प्रमाण ओळखता येते,आणि त्याच प्रमाणात त्यांचे व्यवस्थापन करता येते.वेलीवरील संशोधनाद्वारे आपणाला असे निदर्शनास आले आहे की,वेलीतील गरज आणि जमिनीत असलेल्या अन्नद्रव्यांची मात्रा यांचा परस्पर संबंध हा एक सारखा नाही.म्हणूनच वेलीमधील अन्नद्रव्यांचे निरीक्षण क़ऱण्यासाठी देठ पृथ:करण करणे जरुरीचे आहे.


कलम यशस्वी होण्याकरिता कोणती परीस्थीती असावी?
- कलम यशस्वी होण्याच्या दृष्टीने बागेतील वातावरणात तापमान ३५ अंश से.पर्यंत व आद्रता ८० टक्क्यांच्यापुढे असणे मह्त्वाचे असते.खुंटकाडी ही पुर्ण परिपक्व झालेली नसुन,रसरशीत असल्यास त्या काडीतुन कलमजोडाच्या मध्यमातुन सायन काडीमध्ये रस पुढे जाईल व कॅलस लवकर तयार होण्यास मदत होईल.या गोष्टीसोबत कलम करणा-या कारागीराची कुशलता तेवढीच महत्वाची आहे.


कलम करण्याकरिता सायनकाडी (डोळ ) ही स्वमुळावरील की खुंटावरील वेलीवरुन घ्यावी?
- कलम करण्याकरीता सायनकाडी ही कोणत्याही प्रकारच्या वेलीवरुन घेतल्यास हरकत नाही.या मध्ये काडीची निवड क़ऱताना महत्वाचा मुद्दा हा आहे, की सायनकाडी परीपक्व झालेली असावी.ही काडी खुंटकाडीला मॅच होइल व मजबुत,फुगीर डोळे असलेली असावी.


रुटस्टॉक बागेतील काडया फारच बारीक असल्यास दोन काड्यांना जोडुन कलम करता येईल का?
-बागेत पुर्णपणे कलम यशस्वी होण्याकरीता काडीची जाडीसुध्दा तेवढीच महत्वाची आहे.बागेत एक दोन ट्क्के अशा दामनाच्या जाडीच्या( दोन-तिन एम एम) काड्यांनवर कलम करता येईल.यामधे फक्त प्रयत्न करता येईल.काही कलम यशस्वी होईल किंवा नाही याची जास्त खात्री नसेल.बागेत पुर्ण काड्या अशाच असल्यास शक्यतो कलम करु नये.


मी किती प्रमाणात खते वेलींना देऊ?
-वरती सांगितल्या प्रमाणे, वेलींना तंतोतंत प्रमाणात अन्नद्रव्ये देणे,हे वेलीच्या देठाचे व मातीचे परिक्षण क़ऱूण ठरवता येईल.वेलींना देण्यात येणा-या पाण्याचा दर्जा देखील काही प्रमाणात अन्नद्रव्ये व्यवस्थापनात मोलाचा वाटा निभावू शकतो,कारण बरीचशी मुलद्रव्ये ही पाण्यात असतात.याच्या पलीकडे कोणत्याही प्रकारची खते आपणाला द्यावयाची आहेत हे ठरवण्यासाठी पाण्याचा व मातीचा दर्जा देखील कारणीभूत ठरतो.


खुंटावर रंगीत जातीचे कलम करणे योग्य आहे का?
-बागेत असलेल्या पाण्याच्या व मातीच्या बिकट परिस्थीतीमुळे स्वमुळावरील बागेच्या उत्पादनात घट येत आहे.खुंट रोपांचा वापर सुरु झाल्यापासुन उत्पादनात वाढ झाली व सोबतच चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळु लागले.तेव्हा ,द्राक्ष जातीचा विचार न करता बागेत असलेल्या अडचणीचा विचार करुन कोणत्या खुंटाचा वापर करता येईल याकडे लक्ष द्यावे.


कलम केल्यानंतर डोळे फुटण्याकरीता किती कालावधी लागतो?
-कलम केल्यानंतर डोळे फुटण्याकरीता बागेतील वातावरण (तापमान व आद्रता) महत्वाचे असते.त्याच सोबत वापरलेली सायन काडी (डोळाची) कशी आहे, त्या काडीवरील डोळा कसा आहे, यावर ब-याच गोष्टी अवलंबुन आसतात.कलम केल्यानंतर काडी फुटायला साधारण बारा ते आठरा दिवसांचा कालावधी लागतो.


जिरणारा घड कसा समजावा?
-तीन-चार पानांच्या अवस्थेत आपल्याला घड बाहेर येतांना दिसतो.अशक्त घडाच्या तळात बाळी दिसेल व घडाचा आकार गोल दिसेल,रंग फिक्कट पिवळसर,असा घड जिरण्याची शक्यता जास्त असते.याच तुलनेत सशक्त अशा घडाचा आकार लाबट असेल व त्याच्या तळात बाळी नसेल.हा जोमदार असा न जिरणाऱा घड असेल.


घड जिरायला लाग़ताच काय करावे?
-फळछाटणी झाल्यानंतर चांगल्या वातावरणात सहा-सात दिवसानंतर डोळे फुटायला सुरुवात होते.बागेत पोंगा अवस्थेत जर वातावरण बिघडले असेल,म्हणजेच पाउस आला असेल,ढगाळी वातावरण असेल किंवा बागेत पाणी साचले असेल,अशा परीस्थीत वेलीमध्ये शरीरशास्रीय हालचालीमध्ये अडथळे येतात.पोंगा अवस्थेतील डोळ्यात सायटोकायीनचे प्रमाण कमी होउन जिबरेलीकचे प्रमाण वाढते,त्यामुळे घड जिरायला लागतो किंवा गोळी घड तयार होतो.अशा परीस्थीत बागेत सीसीसी व ६ बीए यांसारख्या संजिवकांची फवारणी करुन घड जिरण्यापासुन बागेला वाचवता येते.  


फेलफुट क़ाढण्याची योग्य वेळ क़ोणती?
-द्राक्षबागेत तिन ते चार पानांच्या फुटीनिघाल्या की घड दिसायला सुरवात होते.दोन दिवस पुन्हा थांबुन पाच पानांच्या अवस्थेत तो घड (जिरणाऱा क़िवा शसक्त) स्पष्टपणे दिसतो.तेव्हा अशा परीस्थीत फेलफुट काढुन घ्यावी यामुळे काडीतुन वाया जाणारे अन्नद्रव्ये घडाच्या वाढीकरता उपयोगात येईल. ही  फेलफुट काढण्याकरीता उशीर होणार नाही,याची बागायतदारांनी काळजी  घ्य़ावी,कारण या फुटी जेवढ्या कोवळ्या असतात,तेवढय़ाच अन्नद्रव्ये शोषुन घेण्याकरीता सक्षम असतात.     


अधिक वाचा

थोडक्यात-खरड छाटणीनंतर

द्राक्षाची (एप्रिल) खरड छाटणी
१) छाटणीच्या १५ ते २० दिवसांपूर्वी म्हणजे द्राक्ष बाग माल उतरविल्या नंतर लगेचच २० टन कुजलेले शेणखत व २० किलो नत्र १०० किलो स्फुरद (दाणेदार) प्रति एकर द्यावेत.
२)खुंटावरील द्राक्ष वेलीस स्वमुळा वरील द्राक्ष वेलीच्या तुलनेत ३-४ दिवस पाण्याचा ताण द्यावा.
३)खुंटावरील जुन्या द्राक्षबागेत हायड्रोजन सायनाईडचा वापर एकसारखी फुट निघण्याकरिता करावा.
४)छाटणीनंतर डोळे फुटण्याचा अवस्थेत उघडल्यापासून संरक्षणाकरिता कार्बारील फवारणी करावी.
५) ४-५ पानाच्या अवस्थेत अशक्त, डबल येणा-या कड्या काढून प्रत्येक दोन स्क्वेअर फुटास १ ते १.२५ काडी राखावी,म्हणजेच विरळणी करावी.
६)जोमदार वाढीच्या (५पानाच्या) अवस्थेत ५०० पीपीएम लिहोसीनची फवारणी करावी.अथवा पाण्याचा ताण द्यावा.
७)छाटणीपासून ३० दिवसापर्यंत नत्र व पाणी भरपूर द्यावे व वाढ करून काडी दमदार करून घ्यावी.
८)बागेला आवश्यक असलेले पाणी उपलब्ध असल्यास ९ पानांच्या अवस्थेत ७ पानांवर खुडून सबकेन तयार करावे अन्यत:सरळ काडी ठेवावी.
९)४५ ते ६० दिवसांच्या कालावधीत नत्र बंद करून पाण्याची मात्रा १/३ करावी.
१०)शेंडा खुड्ल्यानंतर आलेल्या बगलफुटीवर ५ पाने आल्यानंतर पुन्हा ५०० पीपीएम लिहोसीनची फवारणी द्यावी.
११)४५ ते ५० दिवसाच्या काळात ५० किलो प्रती एकर पालाश द्यावे. यामुळे द्राक्षकाडी सशक्त होऊन भूरीसारख्या रोगास जास्त बळी पडत नाही.
१२) ५ पाने व १२ पाने या अवस्थेत ५० पीपीएम युरासिलची फवारणी द्यावी.
१३)४०व्या दिवशी १० पीपीएम ६-बीए ची फ़वारणी द्यावी.
१४)१५ पानाच्या अवस्थेत शेंड्याची पिंचींग करावे.म्हणजे काडी सरळ राहील.
१५)पाऊस जास्त असल्यास किंवा तसे वातावरण जास्त काळ असल्यास लिहोसीनची फवारणी मात्रा वाढवून द्यावी व वाढ थांबवावी.
१५)एकसारखी नवीन फुट काढू नये त्यामुळे तयार झालेले अन्नद्रव्य वाया जाते.
१७)६० दिवसातनंतर पुन्हा पालाश देऊन पक्वता करून द्यावी.
१८)कोरडया वातावरणात भूरीचा प्रादुर्भाव फवारणी करून टाळावा.
१९)तयार झालेल्या कड्या तारेवर सुतळीने बांधून घ्याव्यात. त्यामुळे सूर्यप्रकाश एकसारखा पडेल व घडनिर्मिती चांगली होईल.
२०)६० दिवसानंतर पाण्याची मात्रा कमी करावी म्हणजे नवीन फुट जास्त येणार नाही.
२१)काडी पक्व झाल्यानंतर व शक्यतोवर बुरशी नाशकांची आणि किडनाशकाची फवारणी संपल्यानंतर पावसाळी व आर्द्रतेच्या वातावरणात व्हर्ट्रीसेलीयम 2-3 फ्वारण्या कराव्या म्ह ण जे मिलीबग आटोक्यात राहील.
अधिक वाचा

द्राक्ष उत्पादकांची निर्यातीकडे पाठ

निर्यात निम्म्याने घटली;उत्पादकाची पसंती स्थानिक बाजाराला,
गेल्या वर्षी युरोपिय देशांनी भारतीय द्राक्ष नाकारल्याचा परिणाम यंदाच्या निर्यातीवर दिसून आला असून,द्राक्षाची निर्यात निम्म्याने घटली आहे.महिनाभरापूर्वी सुरु झालेला द्राक्ष हंगाम आणखी आठवडाभर सुरु राहण्याची शक्यता आहे.आतापर्यत सुमारे १,६०० कंटेनर (अंदाजे २० हजार टन)द्राक्षाची निर्यात झाली आहे. गेल्या वर्षी ३ हजार ७०० कंटेनर द्राक्ष निर्यात झाली होती.
युरोपीय देशांकडून द्राक्षाला चांगला दर मिळत असल्याने दशकाभरापासून द्राक्ष निर्यातीत सतत वाढ होत गेली, या वर्षी द्राक्षांवर फवारलेल्या कीड-कीटकनाशकांचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याने कारण देऊन गेल्या वर्षी जर्मनीसह युरोपातील काही देशांनी भारतातील द्राक्ष नाकारली होती.त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी व एक्सपोर्टर यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते.युरोपातील द्राक्ष निर्यातीबाबत महाराष्ट्रातील शेतकरी अत्यंत सावध झाले आहेत.
शासकीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,या वर्षी युरोपातील नेदरलँडस,बेल्जियम आणि इंग्लंड या देशांमध्ये द्राक्ष निर्यात झाली.जर्मनीमध्ये द्राक्ष पाठवण्यास शेतक-यांची पसंती नव्हती यंदा १५ हजार शेतक-यांनी एकूण १२ ह्जार हेक्टर द्राक्षबागांची नोंदणी द्राक्ष निर्यातीसाठी केली होती, प्रत्यक्षात झालेली निर्यात मात्र मात्र कमी आहे. कारण याला निसर्ग आणि लोकल मार्केट आहे.
द्राक्षनिर्यात करणा-या एक्सपोर्टरांनी दिलेल्या माहिती नुसार, दरवर्षी निर्यात होण्यापूर्वी एकूण किंमतीच्या ४० टक्के रक्कम अदा केली जाते,उर्वरीत रक्कम द्राक्ष विक्रीनंतर खर्च वजा करून चुकते होतात.मात्र या वर्षी परिस्थती वेगळी आहे.मागील वर्षी युरोपात द्राक्ष निर्यात केलेल्या अनेक द्राक्षबागायतदारांना त्यांचे पैसे अजून मिळालेले नाहीत.त्यामुळे बागायतदारांनी याचा धसका घेतला आहे.द्राक्ष निर्यातीमध्ये नव्याने उतरलेल्या एक्स्पोर्ट कंपन्यानी सुध्दा गेल्या वर्षी निर्यातीसाठीचा आवश्यक दर्जा राखण्यास काही चुका केल्या.त्याचाही फटका या द्राक्ष बागायतदारांना सहन करावा लागला.
युरोपीय बाजारात यंदाच्या प्रतिक्रियेवर लक्ष
साधरणतः १४ एप्रिल पासून पुढे ३० दिवस भारतीय द्राक्ष निर्यातदारांनसाठी महत्वाचे असतात.या कालावधीत युरोपात प्रमुख्याने भारतातूनच द्राक्षे जात असल्याने दर चांगले मिळतात.भारतातून होणा-या एकूण द्राक्षनिर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा जवळपास ९९% असतो.त्यामुळे युरोपातील निर्यात आपल्या दृष्टीने फारच महत्वाची असते.मात्र मागील वर्षीच्या अनुभवामुळे बागायतदार कचरत आहेत.आत्ता पर्यत युरोपात पोहचलेल्या द्राक्षांचे स्वागत तेथे कसे करतात आणि त्या द्राक्षांना किती दर मिळतो,याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.या द्राक्ष उत्पादन कमी असल्याने भारतीय बाजारपेठेत द्राक्षांना चांगली किंमत मिळाली,परंतु एकरी उत्पादनात मात्र घसरण झाल्याचे चित्र दिसते.
नाशिक निर्यातदार संघ
पुणे,सोलापूर,सांगली या भागातील द्राक्ष निर्यात जवळपास संपली आहे.नाशिकमधून अजून काही प्रमाणात निर्यात सुरु आहे.मात्र,विपरीत हवामानामुळे यंदा द्राक्ष उत्पादन घटल्याचे चित्र आहे.द्राक्ष उत्पादन कमी असल्याने स्थनिक बाजारपेठेत चांगले दर ही मिळाले आहे.सरासरी ३० रुपये किलोपेक्षा आधिक दर शेतक-यांना बागेच्या स्तरावर मिळाले आहेत.त्यामुळे निर्यातीचा धोका पत्करण्याचे शेतक-यांनी टाळले.बेदाण्याला यंदा चांगले दर मिळालेल्याने बेदाणे निर्मितीलाही उत्पादकांनी प्रधान्य दिले.
द्राक्ष निर्यात पूर्णतः व्यापा-यांच्या हातात आहे,बोटांवर मोजण्याइतकेच शेतकरी स्वत:द्राक्ष निर्यात करतात.निर्यातीसाठीचे निकष कडक आहेत.शेतक-यांना शासकीय पातळीवरून सर्वतोपरी सहकार्याची गरज असते.त्यात त्रुटी असल्याने शेतक-यांनी धसका घेतला आहे.लातूर सारख्या जिल्हामधून गेल्या वर्षी सव्वादोनशे कंटेनर द्राक्षाची निर्यात झाली होती.या वर्षी ती ५० कंटेनरपर्यत खाली आली.आहे.
अधिक वाचा

गुणवत्ता आणि दर्जा व्यवस्थापन

द्राक्षाची गुणवत्ता आणि मालाचा दर्जा हा व्यवस्थापनातून होणा-या कामांवरती अवलंबून असतो. जास्तीत जास्त रसायनांच्या वापरामुळे दर्जावर परिणाम होतो. तर असंतुलित व्यवस्थापनामुळे गुणवत्ता ढसळते. पूर्वी आयुर्वेदामध्ये द्राक्षाच्या वापर बुरशी व जीवाणू नाशक म्हणून केला जात असे परंतु आजकाल त्याच द्राक्षांना काढणीपर्यंत बुरशी, बॅक्टेरीयाची लागवण होते. दिवसेंदिवस द्राक्षाची गुणवत्ता आणि त्याचा दर्जा खालावल्याचे आढळून येते. पाश्चीमात्य देशांमध्ये आंबट, गोड द्राक्षाला मागणी असते म्हणून त्या गुणवत्तेची द्राक्ष बनविली आणि कीड रोगांच्या कारणामुळे ती जर निर्यात झाली नाही तर स्थानिक बाजार पेठेमध्ये द्राक्षाला ग्राहक मिळत नाही. मग ग्राहक देखील सहज बोलतात पूर्वी सारखी द्राक्ष राहिली नाही, द्राक्ष आंबट राहिली, पांचट लागतात. म्हणजे नेमका द्राक्षाचा दर्जा ढासळला कुठे या समस्येच्या मुळापर्यंत पोहचल्यास त्यांची लागेबांधे सापडतील.
पूर्वी द्राक्षाला सहज फुगवण व गोडी मिळत होती. त्यामध्ये शेंगदाणा पेंड, सेंद्रिय खते यांचा वापर शेतकरी करत. आजकाल द्राक्षाच्या फुगवणीसाठी, साका बांधण्यासाठी अनेक कृत्रिम रसायनांचा वापर केला जातो. सीपीपीयु सारख्या रसायनाने द्राक्षामध्ये प्रथिनांची प्रमाण चांगले राखले जाते परंतु त्याचा प्रतिकूल परिणाम हा द्राक्षातील शर्करा आणि पिष्टमय पदार्थ यांच्यावर होतो. केवळ प्रथिनांच्या प्रमाण वाढीमुळे शर्करा आणि पिष्टमय पदार्थाचे प्रमाण द्राक्षात कमी होते. शर्करेमुळे द्राक्ष गोड लागतात व त्यास वजन मिळते तर स्निग्ध पदार्थामुळे द्राक्षाची चव कळते, त्याचा सुगंध दरवळतो आणि त्यांची टिकवू क्षमता वाढते. केवळ या दोन घटकांच्या  दुर्लक्षित  पणामुळे द्राक्षाची गुणवत्ता व दर्जा ढासळला असून त्या दृष्टिकोनातून शेतक-यांनी बागेचे व्यवस्थापन करावे असे वाटते.
द्राक्ष फुगवणी मधील प्रथिनांच्या वाढीबरोबर शर्करा आणि स्निग्ध पदार्थ यांचे देखील प्रमाण टिकून ठेवल्यास द्राक्षाची गुणवत्ता आणि दर्जा बागायतदारांना अनुभवता येतो.यामुळे शरद सीडलेस ,त्याच बरोबर थॉमसन,माणिक चमन,आणि सोनाका या वाणांना देखील चांगला भाव मिळतो.व मालाची टिकवू क्षमता वाढते.
अधिक वाचा

द्राक्षावरील खोडकिडा- समस्या आणि व्यवस्थापन

भारतामध्ये द्राक्षावर खोडकिडा प्रथमत: विभागीय फळ संशोधन केंद्र पुणे येथे सन १९६८ मध्ये आढळून आली.सुरुवातीस ही कीड दुय्यम स्वरूपाची होती कारण या किडीचे प्रमाण एक-दोन टक्केच दिसून येत असे शिवाय ज्या बागा जुन्या झालेल्या असत अशाच बागांमध्ये ही कीड आढळून येत असे.त्यामुळे द्राक्षबागायतदार या किडीचा प्रामुख्याने असा विचार करत नसे.परंतु द्राक्षबागायतदार खुंटाकडे वळले तस तसे या किडीचे प्रमाण वाढत असतांना दिसून येत आहे.आज या किडीचा विचार केला असता ही एक प्रमुख कीड म्हणून ओळखली जाते.हल्ली ह्या किडीचे प्रमाण ५०ते ९० टक्क्यांनी वाढले आहे.या किडीस पोषक असलेले उष्ण कोरडे वातावरण आणि पाण्याची कमतरता शिवाय योग्य खुंट रोपाची निवड न केल्या गेल्या मुळे आणि खोडावर तसेच ओलांड्यावर अनावधनाने झालेल्या जखमामुळे ही कीड वाढते.
किडीची ओळख:
खोड किडीचे भुंगेरे हे २-३ से.मी.लांब व विटकरी रंगाचे असतात शिवाय अन्टेना (मिशा)ह्या शरीरा पेक्षा  जास्त लांब असतात.हे भुंगेरे पावसाळ्यात रात्रीच्या वेळी प्रकाशाकडे आकर्षित होतात.खोड किडीची अळी ही रंगाने पांढरट पिवळसर असते.अळीचे डोळे हे चपटे असून लहान असतात.शिवाय ह्या अळीला पाय नसतात,फक्त शरीरच्या हलचाली वरून अळी खोडात किंवा ओलांड्यात मागे पुढे सरकते.
किडीचा जीवनक्रम:
खोड किडीचे मादी भुंगेरे जून-जुलै महिन्यात बाहेर पडून खोडावर किंवा ओलांड्यावर ज्या ठिकाणी वेलीला जखमा असतील तेथे किंवा जखमा करून त्यात १०० ते २०० अंडी घालते.अंडी दीड ते दोन आठवड्यात उबवून अळ्या बाहेर येतात.बाहेर पडलेल्या अळ्या खोड तसेच वलांडे पोखरण्यास सुरवात करतात.अळीने खोडात किंवा ओलांड्यात प्रवेश केल्यानंतर ४ ते ६ महिने आतच राहते.कोषावस्था हीसुद्धा आतच असते.कोषावस्था एक महिन्याची असते.कोषांतून बाहेर पडलेले भुंगेरे तीन महिन्या पर्यत जगू शकतात.अशा त-हेने एक वर्षात फक्त एकच जीवनक्रम पूर्ण होतो.
अड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्या जखमेच्या ठिकाणी पोखरण्यास सुरवात करतात.खोड किंवा ओलांडे पोखरलेल्या वेलीचे पाने प्रथम पिवळी दिसू लागतात.आणि नंतर या पानांवर सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यासारखी लक्षणे दिसू लागतात.कालांतराने अशा वेली किंवा ओलांडे वाळून जातात.खोडात किंवा ओलांड्यात जर अळी असेल अशा वेळी अळीने पाडलेल्या छिद्रातून भुसा बाहेर येत असतो.कारण जर खोडावर किवा आजुबाजूला निरीक्षण केले असता आपणास भुसा दिसून येतो.
ज्या बागा खुंटावर आहेत (रुट) अशा बागेमध्ये आपणास जरा वेगळा अनुभव येतो.कलम करतांना द्राक्ष बागायतदार चार ते पाच फुटवे ठेवतात. कलम करते  वेळी फक्त चांगल्या निरोगी पेन्सिल आकाराच्या दोन काडयावर कलम केले जाते.आणि शिल्लक फुटवे कट केले जातात. परंतु अशा ठिकाणी पेस्ट केली जात नाही.या कट केलेल्या फुटव्यावर(कड्यावर ) मादी भुंगेरे अंडी घालतात.आणि त्याच ठिकाणा पासून पोखरण्यास सुरुवात करतात.त्यामुळे आपणास खुंटावरील बागेत दुस-या वर्षापासूनच खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येतो.याचा अर्थ खुंटावरील बागेत खोड किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो असा नाही तर आपण वेलीला केलेल्या जखमांमुळे मादी भुंगे-यांना अंडी घालण्यास वाव मिळतो.म्हणून खुंटावर कलम केल्यानंतर पेस्ट केलीच पाहिजे.
व्यवस्थापन:
१) जून तसेच जुलै महिन्यात बागेजवळ प्रकाश सापळे लावले असता या सापळ्याकडे खोड किडीचे भुंगेरे आकर्षित होतात.असे आकर्षित झालेले भुंगेरे रॉकेल मिश्रीत पाण्यात नष्ट केले असता पुढील उत्पत्ती थांबेल.
२) आपल्या द्राक्ष बागेत खोडावर तसेच ओलांड्यावर जखमा होणार नाही याची दक्षता घ्यावी.जखमा असल्यास खोड तसेच ओलांड्यावर १:१  या प्रमाणात ब्लायटोस आणि कार्बारीलचे पेस्टीग करावे.पेस्टीग  हे एप्रिल तसेच ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस घेणे अधिक चांगले.
३) छाटणी आगोदर खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास असे ओलांडे,खोड किंवा काड्या करवतीने काढून घ्याव्या.आणि जखमांवर वरील प्रमाणे पेस्टीग करावे.
४)रुटस्टोकवर कलम करतांना अतिरिक्त फुटवे काढल्यानंतर त्यावर पेस्ट करावे.म्हणजे नवीन बागेत खोडकिडीचा प्रादुर्भाव होणार नाही.
५)बागेत खोड किडीचा प्रादुर्भाव झालेला आसेल अशा वेळी खोड किडीचे छिद्रे तारेच्या साह्याने मोकळी करावीत.व अशा छिद्रात इंजेक्शनच्या  साह्याने नुवान २० मिली प्रतिलीटर या प्रमाणात द्रावण तयार करून प्रत्येक छिद्रात २० ते २५ मिली या प्रमाणात सोडून छिद्र गाळाच्या साह्याने हवाबंद करावीत.नुवान खेरीज आपण क्लोरोपायरीफॉस सुद्धा वापरू शकता.क्लोरोचे प्रमाण २५ मिली प्रतिलीटर या प्रमाणात वापरावे.
६) माझ्या प्रयोगानुसार छिद्रात इंजेक्शनच्या  साह्याने जर पेट्रोल सोडून गाळाच्या साह्याने  छिद्र  लगेचच बंद केलीतर खोड कीड लगेच मरते.
विषारी आमिष वापरताना वर्षातून दोन तीन वेळेस वापरावे.
अशा त-हेने द्राक्ष बागायतदार बंधूंनी आपल्या बागेची सुरुवातीपासूनच काळजी घेतली तर निश्चित खोड किडीचे प्रमाण एकदम कमी होऊन आपल्या बागेचे होणारे नुकसान टाळता येईल.
अधिक वाचा

माहिती तंत्रज्ञान शेतीसाठी उपयुक्त


शेतीमधील नवीन तंत्रज्ञाना बरोबरीने इंटरनेटवर देखील माहितीचा प्रचंड खजिना आहे.देशातील मह्त्वाच्यासंस्थांच्या वेबसाईटवर(संकेतस्थळ)काय काय पहाल,त्याबाबतची माहिती...

 www.agri.mah.nic.in : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे.या संकेतस्थळवर कृषी विभाग,त्यातील नवी भरती ,विभागाची कार्यपद्धती आदी माहिती सुरुवातीला दिली आहे.तसेच राज्याचा नकाशा दिला आहे.त्यातील प्रत्येक जिल्हावार माउसने क्लिक केल्यावर त्या त्या जिल्हातील शेती संबधीची माहिती मिळते.त्याशिवाय बियाणे,खते,कीटकनाशके यांच्या उपल्बधतेची माहितीही या संकेतस्थळावर मिळते.विशेष म्हणजे हे संकेतस्थळ मराठी भाषेतही पाहाण्याची सोय आहे.
या संकेतस्थळावर उपल्बध असलेली महत्वाची माहिती:
१) शैक्षणिक,माती परीक्षण आणि कीडनाशक अंश तपासणी प्रयोगशाळांची माहिती
२) बाजारभाव, निर्या,किमान आधारभूत किंमत
३) शेतीसंबधित महत्वाची आकडेवारी,राष्ट्रीय पीक विमा 
४) पीक उत्पादन,प्रतवारी, अन्नप्रक्रिया, सेंद्रियशेती,जैवतंत्रज्ञान,ग्रीन हाउस, उतीसंवर्धन, एकात्मिक पीक व्यवस्थापन ,मृद व जल संधारण इत्यादीची सविस्तर माहिती 
५) हवामानाचा अंदाज,मह्त्वाचे नकाशे, सादरीकरणे, टेंडर्स 
६) मह्त्वाचे संपर्क ,प्रदर्शने,प्रशिक्षण कार्यक्रम
७) विविध योजना, जीआर, लाभार्थींची नावे, कृषीविषयक शासकीय प्रकाशने
८)राज्य शासनाचे पुरस्कारविजेते, हिवरे बाजार या गावाची यशोगाथा
९)नॅशनल हॉर्टीकल्चर मिशन आणि नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन यासंबंधीची माहिती.
या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
www.apeda.com:'कृषी व प्रक्रियायुक्त अन्न निर्यात विकास प्राधिकरण' (अपेडा) या संस्थेचे हे संकेत स्थळ आहे.यावर संस्थेची माहिती,नोंदणी करण्याची पद्धत,संस्थेची कार्य पद्धती, भारताचे निर्यात विभाग,बासमती निर्यात विकास संस्था,अभ्यास अहवाल,प्रकाशने, आपेडा कडून निर्यात केली जाणारी उत्पादने,त्यांच्या लॅब रेग्नीशन सिस्टीम,व्यापारासंदर्भातील माहिती,ट्रेड जंक्शन,आंतराष्ट्रिय किंमती, पीकनिहाय आयातदार व निर्यातदारांची यादी आदी माहिती या संकेत स्थळावर मिळू शकते.त्याच प्रमाणे काही आंतरराष्ट्रिय मह्त्वाच्या घटना, निर्यातीसंबंधी नवे निर्णय तसेच नव्या योजना,इंडीयन अ‍ॅग्री ट्रेड जंक्शन,ग्रेपनेट इत्यादी बद्दलची माहिती या संकेत स्थळावर उपल्बध आहे.ही माहिती हिंदी मध्ये पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
www.nabard.org:हे संकेतस्थळ राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेचे(नाबार्ड) आहे.बँकेची माहिती,तिची विकासकार्य,मॉडेल्स प्रकल्प,ग्रामीण अर्थव्यवस्था,नाबार्डचे विभाग,कर्जपुरवठा विषयी माहिती, नाबार्ड रुरल बॉडस,न्यूजलेटर.नोकरीच्या संधी,संद्या चालू असलेली कामे, तसेच ताज्या घडामोडी, टेंडर्स, वार्षीकअहवाल आदी बाबदची सविस्तर माहिती या संकेतस्थळावर उपल्बध आहे.या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
शेतीविषयी महत्वाची संकेतस्थळे खालील प्रमाणे 
कृषी विद्यापिठांचे संकेतस्थळे :
www.dbskkv.org:
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,दापोली 
www.mpkv.mah.nic.in:
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी 
www.mkv2.mah.nic.in
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी 
www.pdkv.mah.nic.in
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला 
  ही महाराष्ट्रतील कृषी विद्यापीठांची संकेतस्थळे आहेत.या संकेतस्थळावर विद्यापीठाची सविस्तर माहिती उपल्बध आहे.
अधिक वाचा
.........................................................