द्राक्षाच्या महत्त्वाच्या जाती व गुणधर्म

  द्राक्ष फळपीक हे मख्यत: शीत कटीबंधातील असून रशियामधील कॅसपियन समुद्राजवळील अरमेबिया हे मुळ गाव आहे. तेथून युरोप, इराण व अफगणीस्थान येथे प्रसार झाला. भारतामध्ये १३०० ऐ.डी.मध्ये इराण आणि अफगणीस्थानाद्वारे द्राक्षाचा प्रसार झाला.द्राक्षाच्या जगभरामध्ये १०,००० जाती विविध देशात विविध हवामानात घेतात. भारतामध्ये १००० द्राक्षाच्या जाती संग्रही आहे. तथापी काही मोजक्याच जातींचा खाण्यासाठी, बेदानेसाठी, रस व वाईन यासाठी लागवड केली जाते. यामध्ये ७७ ते ८० % द्राक्ष त्यामध्ये २ % निर्यात केली जाते. बेदाणेसाठी १७ ते २० % रसासाठी १.५ % आणि वाईनसाठी ०.५ % द्राक्षाच्या जातीची लागवड केली जाते.व्यापारी दृष्टया महत्वाच्या जातींच्या माहिती खाली नमूद केली आहे.
१. खाण्याची(टेबल ग्रेप्स) द्राक्ष  
 अ. पांढ-या जाती: थॉमसन, सिडलेस, तास-अ-गणेश, सोनाका, माणिक चमन, सुपेरीअर सिडलेस.
 ब. रंगीत जाती: शरद सिडलेस, फ्लेम सिडलेस, क्रीमसन सिडलेस,फ़ॅन्टसी सिडलेस, रेडग्लोब इ.
 २. बेदाणेच्या जाती: थॉमसन सिडलेस, तास-अ-गणेश, सोनाका व अर्कावती
 ३. रसाच्या जाती: बंगलोर पर्पल, पुसा नवरंग
 ४. ग्रेपवाईच्या जाती
 अ. रंगीत जाती: कॅबेरणेट सोव्हीनीओ, कॅबेरने क्रक,मर्लो, पिनॉट नॉयर, खिराज.
 ब. व्हाईट जाती: शर्डोंन्ही,शेनीन ब्लॉक, सोव्हिनॉन ब्लॉक.
 या लेखामध्ये टेबल ग्रेप्स तथा खाण्याची द्राक्षाच्या जातीची सखोल माहिती दिली आहे.
१. थॉमसन सिडलेस  
   या जातीचे उगमस्थान हे आशिया खंडातील आहे. कॅलिफोर्नीयाजवळील युबा शहराजवळ विल्यम थॉमसन यांनी या जातीचा प्रथम लागवड केली. म्हणून थॉमसन सिडलेस या नावाने ती प्रचलीत झाली आहे. ही जात भूमध्यसागरच्या पूर्व भागात ओव्हन किशमिश तर ऑस्ट्रेलिया व दक्षिण अफ्रिकेत सुलतान या नावाने ओळखली जाते. या जातीची लागवड जगामध्ये बहुतेक द्राक्ष पिकवणार्‍या देशांमध्ये करतात. ही एकमेव बहुउद्देशीय जात आहे.जगामधील ५० % पेक्षा जास्त बेदाणे निर्मिती याच जातीपासून केली जाते. कॅलिफोर्नीयामध्ये ९५ % बियाणे थॉमसन सिडलेस याच जातीपासून करतात. तसेच बेदाणे, खाण्यासाठी प्रामुख्याने या जातीचा उपयोग करतात.
  महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तमिळनाडू आणि म्हैसूर या राज्यात या जातीचे क्षेत्र मोठया प्रमाणात आहे. अलिकडच्या काळामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष व जमिनीतील क्षारतेचे प्रमाण वाढल्यामुळे बहुतेक ठिकाणी थॉमसन सिडलेसची लागवड डॉगरीज खुंटावर करतात. वेलीची वाढ जोमदार असून मालकडीवर ६ ते १० डोळ्यामध्ये घड निर्मिती होत असते. घडाचा आकार, मध्यम, त्रिकोणी, लांबट, पूर्ण भरलेला असतो. मणी हिरवे पिवळसर रंगाचे असतात. आकार लांब गोल, गर घट्ट असून पारदर्शक असतो. चव आंबट गोड, रसाचा रंग हिरवट पांढरा, प्रत अतिशय चांगली असते. मण्यातील विद्राव्य घटकाचे प्रमाण १८ ते २२ % तर आम्लता ०.४६ ते ०.६० % असते. मण्यातील रसाचे प्रमाण ८० टक्यापर्यंत असते. मण्याची उत्तमवाढ जीए, ६ बीए, सिपीपीयू व ब्रॉंसिनो स्टरोईडसला योग्य प्रतिसाद देते. प्रतिकुल हवामान केवडा, भुरी, करपा , अणुजीवजन्य करपा रोगास सहज बळी पडते. परंतु योग्यबागेचे व्यवस्थापन असलेल्या बागेमधून एकरी १० ते १२ मे.टन उत्पादन मिळते.
२. तास-अ -गणेश 
   थॉमसन सिडलेस या जातीपासून बड स्पोर्टद्वारे तास-अ-गणेश या जातीची निर्मिती झाली. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामध्ये बोरगाव येथील श्री. सुभाष आर्वे यांच्या ते निदर्शनास आले. थॉमसन व तास-अ-गणेश यांचे सर्व गुणधर्म जवळजवळ सारखेच आहेत. परंतु तास-अ-गणेश या जातीची शेंड्याकडील कोवळी फुट लालसर तांबूस रंगाची असते. याची लांबट गोल, दंडगोल हिरवट पिवळा, पारदर्शक व जाड साल असते. दूरवरच्या बाजारपेठेसाठी उत्तम व टिकाऊ आहे.
३. सोनाका 
   थॉमसन सिडलेस जातीपासून बड स्पोर्टद्वारे विकसित झाली आहे. १९७७ साली सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथील नानासाहेब काळे यांच्या हे निदर्शनास आले आहे. या जातीच्या वाढीचे गुणधर्म थॉमसन सिडलेस या जातीसारखेच आहे. फरक हा मण्यांमध्ये आहे. मणी दंडगोलाकार, लांबी ३० मी.मी व १४ ते १५ मि.मी. व्यासाचे असतात. परिपक्व मणी सोनेरी पिवळसर दिसतात. मण्यांमध्ये विद्राव्य घटकांचे प्रमाण २२ ते २४ % तर आम्लतेचे प्रमाण ०.५० ते ०.५५ % असते.
४. माणिक चमन
   ही जात थॉमसन सिडलेसची प्रजात असून १९८२ साली सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथील श्री.टी.आर. दाभाडे यांनी ही जात बड स्पोर्ट द्वारे विकसित केली आहे. वाढीचे गुणधर्म थॉमसन सिडलेस या जातीसारखेच आहे. व जी.ए. शिवाय या जातीचे मणी लांबट होतात.
रंगीत जाती 
१. किशमिश चोरणी
   किशमिश चोरणी ही जात युनायटेड सोव्हिएट रशिया या देशामध्ये विकसित झाली असून अबग्निस्थान मध्ये या जातीस चांगली मागणी असून बाजारभावही चांगला मिळतो. वेलीची वाढ मध्यम आहे.घड मध्यम  आकाराचे, त्रिकोणी, एकसारखी मण्याची ठेवण असते. मण्याचे आकार लांबट गोल, लांबी  १६ ते १९ मि.मी. व्यास १४ ते १६ मि.मी., वजन २.५ ते ३.० ग्रम असून रंग तांबूस काळसर आहे. मण्यांमध्ये एकूण विद्रव्य घटकाचे प्रमाण २० ते २२ % व आम्लता ०.५ % ते ०.७५ %आहे. उत्पन्न ८ ते १० मे. टन प्रती एकरी मिळते.
२. शरद सिडलेस  
   किशमिश चोरणी या जातीपासून नैसर्गिक बड स्पोर्ट द्वारे,सोलापूर नान्नज येथील नानासाहेब काळे यांनी ही जात विकसित केली आहे. घडाचा आकार मोठा, त्रिकोणी,आकर्षण, एकसारखी मण्याची ठेवण, मणी लांबट गोल, रंग काळसर तांबूस, भरपूर नैसर्गिक लव, वजन ३ते ३.५ ग्रम लांबी १६ ते १९ मि.मी व व्यास १४ ते १६ मि.मी.असतो.मण्यातील विद्राव्य घटकाचे प्रमाण २२ ते २४ % व आम्लता ०.५ ते ०.७ % इतकी असते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशमध्ये ह्या जातीची लागवड मोठया प्रमाणावर वाढली आहे.
३. फ्लेम सिडलेस
   कॅलिफोर्निया येथील फ्रेन्सो येथे अमेरिकेच्या कृषी विभागाद्वारे ही जात विकसित केली आहे. वेलीची वाढ मध्येम असून या जातीमध्ये सूक्ष्म घडाची निर्मिती ५ ते ७ व्या डोळ्यापर्यंत होते. घडाचा आकार मोठा असून त्रिकोणी निमुळता असतो.घडामध्ये मण्यांची ठेवण आकर्षक असते. मण्याचा रंग फिकट गुलाबी आणि आकर्षक असतो व जास्त पक्क झाल्यावर गडद गुलाबी रंगाचे मणी दिसतात. मण्यांमध्ये एकूण विद्राव्य घटकाचे प्रमाण १८ ते २१ % आम्लाता ०.६५ ते ०.७५ % असते. उत्पादन ९ ते १० मे. टन प्रती एकरी मिळते. 
४.रेड ग्लोब 
   या जातीची निर्मिती रेड एम्परर या जातीच्या मुक्त परागीभवन द्वारे निवड पध्दतीने कॅलीफोर्निया विद्यापिठात  विकसित केली आहे. वेलीची वाढ जोमदार असते व घडाचा आकार मोठा व आकर्षक असतो. मालकड्यांवर ४ ते ७ व्या डोळ्यामध्ये सूक्ष्म घड निर्मिती होते. या जातीचे मणी फिकट तांबडे-गुलाबी रंगाचे असून मण्यांमध्ये २ ते ३ बिया असतात. मण्यांचा आकार गोल, आकर्षक, पातळ लव,स्वच्छ रस असतो.१२० ते १३० दिवसांत तयार होते. एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण १६ ते १८ %, आम्लता ०.५ ते ०.६% व रसाचे प्रमाण ६५ ते ७० % असते. हा माल दूरवरच्या बाजारपेठेसाठी अधिक काळ टिकवता येतो.   

अधिक वाचा

नाशिक ग्रेप्स गोपनीयता

नाशिक ग्रेप्स गोपनीयता 

 www.nashikgrapes.blogspot.in/ 


If you require any more information or have any questions about our privacy policy, please feel free to contact us by email at   nashikgrape@gmail.com. 



At www.nashikgrapes.blogspot.in/, the privacy of our visitors is of extreme importance to us. This privacy policy document outlines the types of personal information is received and collected by www.nashikgrapes.blogspot.in/ and how it is used. 



Log Files

Like many other Web sites, www.nashikgrapes.blogspot.in/ makes use of log files. The information inside the log files includes internet protocol ( IP ) addresses, type of browser, Internet Service Provider ( ISP ), date/time stamp, referring/exit pages, and number of clicks to analyze trends, administer the site, track user’s movement around the site, and gather demographic information. IP addresses, and other such information are not linked to any information that is personally identifiable. 



Cookies and Web Beacons 

www.nashikgrapes.blogspot.in/ does use cookies to store information about visitors preferences, record user-specific information on which pages the user access or visit, customize Web page content based on visitors browser type or other information that the visitor sends via their browser. 



DoubleClick DART Cookie 

.:: Google, as a third party vendor, uses cookies to serve ads on www.nashikgrapes.blogspot.in/.

.:: Google's use of the DART cookie enables it to serve ads to users based on their visit to www.nashikgrapes.blogspot.in/ and other sites on the Internet. 

.:: Users may opt out of the use of the DART cookie by visiting the Google ad and content network privacy policy at the following URL - http://www.google.com/privacy_ads.html 



Some of our advertising partners may use cookies and web beacons on our site. Our advertising partners include ....

Google Adsense




These third-party ad servers or ad networks use technology to the advertisements and links that appear on www.nashikgrapes.blogspot.in/ send directly to your browsers. They automatically receive your IP address when this occurs. Other technologies ( such as cookies, JavaScript, or Web Beacons ) may also be used by the third-party ad networks to measure the effectiveness of their advertisements and / or to personalize the advertising content that you see. 



www.nashikgrapes.blogspot.in/ has no access to or control over these cookies that are used by third-party advertisers. 



You should consult the respective privacy policies of these third-party ad servers for more detailed information on their practices as well as for instructions about how to opt-out of certain practices. www.nashikgrapes.blogspot.in/'s privacy policy does not apply to, and we cannot control the activities of, such other advertisers or web sites.



If you wish to disable cookies, you may do so through your individual browser options. More detailed information about cookie management with specific web browsers can be found at the browsers' respective websites. 


अधिक वाचा

नवीन द्राक्ष लागवड पूर्वतयारी

  द्राक्ष लागवडीचा बारकाईने अभ्यास करून, द्राक्षवेलीची योग्य काळजी घेवून द्राक्ष लागवड एक प्रगत उद्योग म्हणून केला तर नवनिर्मितीचा आनंद प्राप्त करुन देऊन, इतर पिकापेक्षा अधिक नफा मिळवून देणारे असे हे पीक आहे.
जमीन 
  द्राक्षबागेला हलकी, मुरुमाची व उत्तम निचरा असणारी जमीन चांगली समजली जाते. मात्र काळ्या खोल जमिनीत कुजलेले शेणखत व मुरूम टाकुण योग्य निचरा निर्माण करून द्राक्षाचे चांगले पीक घेता येते. तसेच १०% पेक्षा जास्त चुनखडी असणा-या जमिनीत फॉस्फेट क्रियांशील होत नसल्यामुळे फॉस्फेटचे खडे तयार होतात. म्हणजेच फॉस्फेट वेलीला उपलब्ध होत नसल्यामुळे ब्लॉक होते. अशा जमिनीत द्राक्षासाठी च-या पाडून त्यात दुसरीकडून कसदार माती व चांगले कुजलेले शेणखत आणून च-या भरल्या तर अशा जमिनीतही द्राक्षबाग यशस्वी होऊ शकते. द्राक्ष लागवडीस ६.५ ते ८.५ पी.एच. सामू असलेली जमीन हवी. तसेच क्षारता १.० मिलीमोज व क्लोराईडचे प्रमाण ३५० पी.पी. एम. व सोडीयमचे प्रमाण ७०० पी.पी एम. पर्यंत चालू शकते. म्हणून नवीन द्राक्षबाग लागवड करू इच्छिणार्‍या अभ्यासू शेतक-यांना माझी एक विंनती आहे कि, त्यांनी महाराष्ट्र राज्य बागायतदार संघाच्या पुणे, नाशिक, सांगली, सोलापूरच्या विभागीय कार्यालयात मातीचे व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत. म्हणजे त्यांना त्या तपासणी संबंधीचा सविस्तर अहवाल घरपोच पोस्टाने पोहोच केला जातो. नवीन द्राक्षबागेची लागवड करावयाच्या जमिनीत ठराविक ठिकाणी योग्य कसाची माती बनवून उत्तम निचरा असणा-या कोणत्याही जमिनीत द्राक्षबागेचे उत्तमरीत्या पीक येऊ शकते. 
हवामान    
  द्राक्ष वेलीच्या जोमदार वाढीला मध्यम उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. तसेच २५ ते ३६ डिग्री. से. तपमान सर्वात उत्तम असते. म्हणून महाराष्ट्रातील कोकण सोडून इतर बहुतेक जिल्ह्यांची भौगोलीक परिस्थीती द्राक्ष उत्पादनास अनुकूल अशीच आहे.
  महाराष्ट्रातील नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे या भागात मोठ्या प्रमाणात द्राक्षाची लागवड आहे. उस्मानाबाद, लातूर, अहमदनगर या जिल्ह्यानंतर धुळे, औरंगाबाद, जालना, बीड, जळगाव, परभणी, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, अकोला या जिल्ह्यातूनही द्राक्ष लागवडीचे क्षेत्र वाढू लागले आहे.
भांडवली खर्च
  नवीन द्राक्षबाग उभी करत असताना योग्य अंतरावर ठराविक खोलीच्या ठराविक रुंदीच्या च-या खोदणे, चांगले कुजलेले शेणखत व रासायनिक खते, मांडव उभारणी, पाणी पुरवठयासाठी ठिबक सिंचन पध्दत, बुरशीनाशके, कीटकनाशके, संजीवके व मजुरी इत्यादी बाबीवरील खर्चासाठी भांडवलाची आवश्यकता असते.
पाणी
  द्राक्षवेलही इतर पिकांच्या तुलनेने फारच संवेदनाक्षम आहे. तिला क्षारयुक्त, रवाळ, मचूळ पाणी चालत नाही. चांगल्या गुणवत्तेचे पाणी आवश्यक आहे. पाण्याची चांगली गुणवत्ता ही त्यात उपलब्ध असलेले क्लोराईड, सोडीयम तसेच पाण्यात विरघळलेले क्षार यावर अवलंबून असते. पाण्यात ५० पी.पी.एम. पेक्षा कमी क्षार तसेच   १२० पी.पी.एम. पेक्षा कमी क्लोराईड व ३४० पी.पी.एम. कमी सोडीयम असेल, असेच स्वच्छ, हलके, मृदू व गोड पाणी द्राक्षपिकाला चांगले मानवते.
द्राक्षांच्या विविध जाती
  महाराष्ट्रात पूर्वी चिमासाहेबी (सिलेक्शन७), भोकरी, अनाबेशाही, रावसाहेबी, काळीसाहेबी, अर्काश्याम, अर्काकांचन,बंगलोर ब्ल्यू, बंगलोर पर्पल इत्त्यादी बियांच्या द्राक्ष पिकांची लागवड करत असत. मात्र गेल्या ४५ वर्षापासून बिनबियांच्या सीडलेस द्राक्षवाणाची लागवड केली जाते. त्यामध्ये थॉमसन, तास-ए-गणेश, सोनाका, माणिक चमन, मोनिका, शरद सीडलेस, किसमिस चोर्नी, कृष्णा सीडलेस,सरिता सीडलेस, क्लोन टू ए,रेड ग्लोब इत्यादी वाणांची लागवड आहे. अलीकडच्या काळात चुनखडीच्या जमिनीचे प्रश्न भेडसावू लागल्यामुळे रुट्स्टॉकचा वापर आवश्यक बनला त्यामध्ये बेंगलोर डाग्रीज, अमेरिकन  डाग्रीज, रामसे, १६१३, १६१६, सॉल्टिक्रिक इत्यादी जंगली जाती आहेत.शास्रज्ञांच्या अथक प्रयत्नाने महाराष्ट्रात बंगलोर डाग्रीज ह्या रुट्स्टॉकचे रिझल्ट इतर डाग्रीज जातीपेक्षा खुपच चांगले असल्यामुळे त्यांनी बंगलोर डाग्रीजची रुट्स्टॉक म्हणून शिफारस केलेली आहे.
लागवडीचे अंतर
  द्राक्ष लागवड करीत असताना दोन ओळीतील व दोन रोपातील अंतर नेमके किती असावे याबाबत तज्ञांमध्ये अनेक मते आहेत. द्राक्षवेल ही किती जोमाने वाढणार आहे, वेलाचा विस्तार किती करावयाचा आहे? ओनरूट (स्वमुळ) की डाग्रीजची लागवड करायची आहे. तसेच जमिनीची व पाण्याची प्रत कशी आहे? तसेच हवामान, पाऊस व उष्णतामान कोणत्या प्रकारचे आहे. जमिनीची मशागत कशी व कोणत्या औताने करणार आहेत? चर जे.सी.पी. ने कि टॅक्टरने काढावयाची आहे? द्राक्षवेलीपासून कोणत्या गुणवत्तेचे, क्वालिटीचे किती उत्त्पन्न व किती वर्षे अपेक्षित आहे? या सर्व गोष्टींचा विचार करून लागवडीचे अंतर ६ बाय ४ फुट, ८ बाय ४फुट , ८ बाय ५ फुट, १० बाय ६ फुट, १२ बाय ६ फुट, ९ बाय ५ (नवीन) फुट ठरवावे लागेल.
द्राक्ष बागेची लागवण      
  पूर्वतयारी- ज्या निवडलेल्या जमिनीत द्राक्षबाग लावावयाची आहे. ती जमीन पलटी नांगराने खोल नांगरावी. खुरटणी करावी, काडीकचरा, पालापाचोळा, धसे वेचावित. कुळवन करावी. शेत भुसभुशीत करावे. द्राक्षबाग किती अंतरावर लावायची त्या अंतराने आरवणी(आखणी) शक्यतो दक्षिणोत्तर करावी.टॅक्टरच्या सहाय्याने किंवा जे.सी.पी. च्या सहाय्याने २.५ फुट रुंद व २ फुट खोल च-या  पाडाव्यात. माती व पाण्याच्या तपासणीच्या अहवालानुसार एकरी कुजलेले शेणखत ४० बैलगाड्या म्हणजेच १० ट्रॉल्या फॉंलीडोल पावडर एकरी २५ कि.ग्रॅ. सुपर फॉंस्फेट १/२ टन,मॅग्नेशिअम सल्फेट २५ कि.ग्रॅ. टाकून त्यावर माती ओढावी.चर जमिनीपासुन ४' इंच खोल ठेवावी.पाटाने पाणी द्यावे.वापसा येताच ठराविक अंतरावर ६' व्यासाचे व ६' खोलीचे खड्डे काढावेत.स्वमुळावरील नर्सरी १५ ऑगस्ट किंवा १५ जानेवारीला लावावी.त्याचप्रमाणे रुट्स्टॉकची लागवण १५ जानेवारी नंतर ३० एप्रिल पर्यतच करावी.रुट्स्टॉकच्या मुळ्या काढून सप्टेंबर महिन्यात योग्य डोळा भरण्यासाठी योग्य रीतीने काडी तयार करावी.  

अधिक वाचा

द्राक्ष शेतीतील नवे संकट

भारतात सन १९६५ च्याआसपास हरित क्रांती झाली. शेतीचे उत्पादन प्रचंड वाढून अन्नधान्य  उत्पादनात देश स्वयंपूर्ण झाला. त्यानंतर जवळपास ३० वर्ष शेतीत नवनवे प्रयोग होऊन उत्पादन वाढेले. मागील दशकापासून मात्र शेतीत विशेष परिवर्तन न होता शेती उत्पादनात सातत्याने घट होत असल्याचे निदर्शनास येत आहे. पहिल्या पेक्षा शेतकर-याचा शैक्षणिक दर्जा आता उंचावला आहे. प्रत्येक तंत्रज्ञानाच वापर आता शेतीत होत आहे. परंतु बदलत्या वातावरणात व वाढीव तापमानात शेतीत उत्पादनातील घट ही चिंतेची बाब झाली आहे.
  युरोपियन राष्ट्रामध्ये शेती तंत्रज्ञान सूक्ष्म पातळीवर पोहचले आहे. तेथील शेतक-यांना प्रत्येक कीडरोग मागील मुख्य कारण माहित झलेले आहे. व त्या रोगांची आणि किडींची नुकसानीची पातळी देखील अभ्यासली गेली आहे. त्याप्रमाणे भारत मागे असल्याचे निदर्शनास येते. 
  कीटकांच्या २० लाख प्रजाती पाठोपाठ सूत्रकृमिच्या जगात १० लक्ष प्रजातीच्या संख्येने आहे. व किमान पिकांना नुकसान पोहचविणारे सुमारे १ लक्ष सूत्रकृमी जगभर अभ्यासले गेले आहे,भारतात १९७२मध्ये सर्वेक्षण झाले त्यात ७०० सूत्रकृमी विविध पिकांवर अढळले असून त्यापैकी महाराष्ट्रात ७५ सूत्रकृमीच्या हानिकारक जाती अढळल्या आहेत. सूत्रकृमी बदलत्या वातावरणात आक्रमक झाल्यामुळे दिवसेंदिवस द्राक्ष, डाळींब,टोमॅटो सहित इतर भाजीपाला फळपिके व तृणधान्य प्रभावीत होत आहेत. कृषी उत्पादनातील होत असलेली घट व वाढत चाललेली खतांची गरज आणि वाढलेले कीडरोग व पिकांची कमी झालेली प्रतिकारक क्षमता यामागील नंबर एकचा शत्रू सूत्रकृमी असल्याचे लक्षात आले म्हणूनच महाराष्ट्रात खाजगी क्षेत्रात सूत्रकृमी तपासणीच्या प्रयोगशाळा सुरू केल्या आहे.
  आत्तापर्यंत महाराष्ट्रातील किमान ५००च्या वर माती नमुने व विवीध पिकांची सूत्रकृमी तपासणी करण्यात आली त्यात मुळावर गाठी करणारे व मुळावर गाठी न करणारे असे दोन्ही प्रकार महाराष्ट्रात मोठ्या व विविध पिकांवर आढळून आले आहे. सूत्रकृमी हे ०.३ ते ०.५ मी.मी इतके लांब सूक्ष्म जंनतासारखे असतात, ते उघडया डोळ्यांनी दिसत नाही. त्यामुळे पिकावर येणारे विविध रोग दिसल्यावर पीकसंरक्षण आपणाकडे केले जाते. सूत्रकृमी मध्ये नर व मादी असतात. त्यांचे प्रमाण १:१ असते. मादी २०० ते २५० अंडी मुळावर घालते. २ ते ३ दिवसात त्यातून जंतासारखे सूत्रकृमी बाहेर पडतात. पांढ-या मुळीवर ते स्टायलेट (तोंडाचा भाग) जखमा करतात. त्या जखमांवर बुरशी बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे द्राक्षवेलीची मूळकुज होते.द्राक्ष पिकात मूळकुजीमुळे पिकांचे कुपोषण होते मग असे झाड वातावरणानुसार प्रत्येक रोगास बळी पडते व रोग नियंत्रणाचा खर्च वाढत जातो. पिकांची समाधानकारक वाढ न झाल्याने खतांचा खर्च वाढतो. जमिनीतून अन्नद्रव्य देऊन देखील अन्नद्रव्यांचा कमतरता वेल दाखवते.जंत ३ ते ४ अवस्था २१ ते २५ दिवसांत पूर्ण करून त्या पासून पुढे मादी व नर तयार होतात. त्यांचे मिलन होऊन पुन्हा प्रत्येक मादी २०० ते २५० अंडी घालते.एक ग्रॅम मातीत दोन सूत्रकृमी आढळल्यास ते प्रमाण नुकसानीच्या तीव्रतीच्या पलीकडे समजले जाते. एक महिन्यात २५० याप्रमाणे दोन महिन्यात २५,००० तर तीन महिन्यात जवळपास २,५०,०० च्या संख्येने सूत्रकृमी पांढ-या मुळीवर जमिनीत वाढतात त्यामुळे सर्वसाधारण द्राक्ष पिकाचे किमान ३० ते ४० % इतके मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या सर्वेक्षनात अढळले आहेत. तर इतर पिके देखील सुत्रकृमींनी टारगेट केले आहेत.
  ज्या पिकांमध्ये करपा, व्हायरस, मूळकुज व समाधानकारक वाढ दिसून येत नाही त्या पिकांमध्ये सूत्रकृमी मुळावर गाठी करणारे व गाठी न करणारे अशा दोन्ही प्रकार आढळून येतात.
  अलिकडील संशोधकांच्या निष्कर्षानुसार ट्रायकोडर्मा हर्जीनियम व पॅसीलोमायसीस या बुरशी सुत्रीकृमी चांगल्या पैकी नियंत्रणात ठेवल्याचे आढळून येत आहे. द्राक्षातील मूळकुज व कमी फुगवण, मर ह्या समस्यांचे मूळ सूत्रकृमी हेच होय. सूत्रकृमी दलदलीच्या भागात, लोहाळा असणा-या जमिनीत मोठया संख्येने वाढतात. त्यांच्या नियंत्रणासाठी डेक्सट्रोजबेस रिप्लेस २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात किंवा एकरी एक किलो ह्या प्रमाणात पिकास सुरवातीच्या दिवसांत दिल्यास कृषी उत्पन्नातील घटत चाललेले टनेज रोखता येईल व गुणवत्तापूर्ण व निर्यातक्षम शेती उत्पादन कमी खर्चात व रोगमुक्त वातावरणात सहज घेता येईल.
अधिक वाचा

नाशिकग्रेप्स करीता संपर्क

मी आणि माझा पत्ता

दत्तात्रय  विठ्ठल आवारे 
 अंगणवाडी जवळ ,ओणे-सुकेणा मार्ग,
नारायणगाव ,निफाड ,
नाशिक  - ४२२२०१.
दूरध्वनी : मो. ० ७५८८०९७०६२ , घ.०२५५०२०२४८७
ईमेल : nashikgrape@gmail.com
http://www.nashikgrapes.blogspot.com
अधिक वाचा

नाशिकग्रेप विषयी


थोडक्यात नाशिकग्रेप विषयी ..........

आज नाशिकग्रेप्स आपल्या हाती देताना आम्हास प्रचंड आनंद होत आहे. द्राक्षपिकाविषयी अशा प्रकारची माहितीचा साठा आसलेली आणि जगभरातील सर्व मराठी भाषिकांना ज्ञानमयी ठरणारी ही पहिलीच वेबसाइट आहे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
  द्राक्ष पिकाच्या वर्तमानकाळातील व्यवस्थापनात भविष्यकाळातील समस्यांची बीजे रोवली जातात. केवळ व्यवस्थापनातील कळत नकळत घडणार्‍या चुकामुळे द्राक्ष वेलीची रोग प्रतिकारक क्षमता लक्षात न घेता कीटकनाशकांचा वापर केल्यास परिणाम न मिळणे तसेच जमिनीच्या प्रति प्रमाणे आणि वेलीच्या गरजेनुसार खतांचा वापर योग्य पद्धतीने न झाल्यास अनेक विकृतीचा सामना करावा लागतो. रासायनिक निविष्ठांच्या वापरामुळे अनेक क्षणीक फायदे होतात परंतु दुरोगामी परिणाम किती कठोर आहेत याचा देखील विचार करणे गरजेचे आहे एप्रिल छाटणी नंतरचे  व्यवस्थापन त्याच बरोबर छाटणीपूर्व नियोजन आणि छाटणीनंतरचे  व्यवस्थापन करतांना ठराविक उद्दिष्टे ठेऊन काम केले जाते. परंतु ते उद्दिष्ट साध्य न झाल्यास पुन्हा त्याच समस्यांचा सामना करावा लागतो. मग काम करतांना व्यवस्थापनातील किरकोळ चुकामुळे संपूर्ण नियोजनावर पाणी फिरते. प्रत्येक येणा-या समस्येचे मॉंनिटरिंग शेतकर्यांना करता यावे, प्रत्येक समस्यांच्या मुळापर्यंत  द्राक्ष शेतकरी (बागायतदार ) पोहचवा आणि मुख्य कारणापर्यंत पोहचल्यानंतर त्याची दिशा त्यांना मिळावी. त्या दृष्टीकोनातून शेतकर्यांना मार्गदर्शनपर संकेतस्थळ देतांना आनंद होत आहे.

  द्राक्ष शेतीचा कानमंत्र
गेल्या काही वर्षात नाशिक, सांगली, पुणे, सोलापूर आदि महत्वाच्या पट्ट्याबरोबर विदर्भ, मराठवाडयातहि द्राक्ष शेती विस्तारलेली आहे, याचे महत्वाचे कारण म्हणजे द्राक्ष हे नगदी पिक आहे.
योग्य लागवड  व्यवस्थापन असेल, तसेच निर्यातक्षम माल पिकवला, तर हे पिक चांगले नफा देऊन जाते. या पिकाने छोट्या शेतकर्‍यालाहि सन्मान मिळवून दिला आहे. राज्यातील द्राक्ष बागायतदारांनी युरोपची अवघड बाजारपेठ आपल्या आवाक्यात आणली आहे, त्याचबरोबरीने जागतिक बाजारपेठेत महाराष्ट्राचा वेगळा ठसा या पिकाने  उमटवला आहे, त्याचे सर्व श्रेय बागायतदारांचे आहे. राज्यातील द्राक्ष उत्पादन देशात प्रथम क्रमांकावर आहे; परंतु येत्या काळात केवळ लागवड वाढून उपयोग नाही, तर प्रती हेक्टर नफा कसा वाढेल, याकडे सर्वांना लक्ष द्यावे लाणार आहे. यासाठी नव्या बागायतदारांनी पीक व व्यवस्थापन नेमके कसे करायचे हे समजावून घेणे गरजेचे आहे. द्राक्षतून  चांगला नफा मिळवायचा असेल, तर या पिकाचा सर्व अंगाने शास्रशुद्द अभ्यास आणि स्वत:च्या नोंदी ठेऊन त्यानुसार पिक व्यवस्थापनात बदल करणे गरजेचे आहे. अलीकडील काळात द्राक्ष बागायतदारला हवामानाच्या विविध समस्यांनासामोरे जावे लागते आहे, त्यातून हिमतीने मार्ग काढायचा आहे
नवीन बागायतदारांची द्राक्ष लागवडीची तयारी असते; परंतु त्याला लागणारे योग्य मार्गदर्शन कसे मिळेल,हा प्रश्न त्यांचासमोर असतो. या सर्व गोष्टींचा विचार करून हे संकेतस्थळ तयार केले आहे. संकेतस्थळच्या माध्यमातुन शेतकर्‍याला द्राक्ष लागवड तंत्र, छाटणीचे तंत्र, बागेचे व्यवस्थापण, कीड-रोग नियंत्रण,खत-पाणी  व्यवस्थानातील मुद्दे, बेदाणा, वाईन बाजारपेठ,निर्यातीचा संदर्भातील माहितीचा, तसेच रीकट आणि खरड छाटणी कशी करावी याबाबतचे मुद्दे समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे. या संकेस्थळातून व्यवस्थापनाचे मार्गदर्शन आपल्या मिळेलच, त्याचबरोबरीने व्यापारी, उद्योजक आणि द्राक्ष शेतीशी संबधीत सर्व उद्योगघटकांनाहि यातून चार गोष्टी निश्चितच उपुयक्त ठरतील, द्राक्ष पिकामध्ये दररोज बदल होत असतात, त्यानुसार शेतकऱ्यांनी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, त्यासाठी हे संकेतस्थळ निश्चीतच उपुयक्त ठरेल, असा मला विश्वास वाटतो.  
अधिक वाचा

संपादकीय

नाशिकग्रेप्स
आपले विचार आपले अनुभव आपल्या कल्पना .आपली मतं आणि आपल्या भावनांचे भावविश्व साहित्याच्या माध्यमातून फुलविता यावं.निर्माण करता यावं
यासाठी द्राक्ष बागायतदारांना देऊ केलेलं व्यासपीठ म्हणजे
 ' नाशिकग्रेप्स ' हे संकेतस्थळ , ह्या संकेतस्थळावर लिखाण करणारी लेखिका
     स्व.सौ.अनिता दत्तात्रय आवारे
(१८ ऑगस्ट १९८० - ११ फेब्रुवारी २०१४ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
जीवनातील प्रत्येक बाबीकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवता
यावा.विचारांचे आदान प्रदान करता यावे .अनुभवलेली प्रत्येक गोष्ट दुस-यांबरोबर वाटून घेता यावी यासाठी मनात दडलेल्या गोष्टींना बाह्यदर्शन घडविता आले तरच मानवी जीवन समृद्धीच्या दिशेने जातांना दिसेल मग त्यासाठी कुठतरी या गोष्टी लिहिल्या गेल्या पाहिजेत , चितारल्या गेल्या पाहिजेत नाशिकग्रेप्स प्रयत्न .बहुतेकांच्या मनात सुप्त इच्छा असतात . मी लेखक होईन , कवी होईन .त्यांचे विचारभाव मनातल्या मनात जुळत असतात .मात्र कागदावर उतारवयाच्या वेळी त्यांची नेमकी भंबेरी उडते.
अनिता संकलन भूमिका उत्तमरीत्या निभावून गेली आहे. तिचं निरीक्षर विवेक बुद्धीचे खंर कौतुकच करायला पाहिजे.जे योग्य आहे .गरजेचे आहे .त्याचीच ' वेचणी ' केली आहे .
विशेषत: ज्यांनी नाशिकग्रेप्स या संकेतस्थळावर कोणता लेख लिहावं याची मागणी केली त्यांचा मी आभारी आहे.
धन्यवाद.
अधिक वाचा

Everything About Nashikgrapes

  I am optimistic enough to believe that this website will help grape growers and personnel associated with with viticulture in understanding the grapevine nutrition and rationalize fertilizer use.Due to lack of location specific research data available the recommendations on fertilizer doses have been kept broad and will require minor adjustments at different locations depending upon the soil and water quality.The language has been kept simple as far as possible.The readers may detect omissions and deficiencies.The author will be grateful if the readers bring to his notice any comments.errors or inadvertent omission of important work and misrepresentation of some of the research findings.Corrections and suggestions for improvement will be welcomed.
 Growers experience has contributed a lot in preparation of this website.I am indebted to the grower friends who had been constantly providing reliable feedback in management of different nutrient deficiencies and sharing their experiences on various aspects of grape growing.I am thankful to Maharashtra Rajya Draksh Bagaitdar Sangh (MRDBS) and NRC for Grapes, Pune for arranging surveys,visits and seminars in different part of the country,which helped in indentifying the different nutritional disorders.The literature from other countries has also been referred to provide the world-wide picture of the subject.I am extremely grateful to krishnalila Farm for publishing this nashikgrapes I am thankful to Mr.Ankush Aware, Mr.Aditya Aware, and Mrs Anita , for their valuable contributions and suggestions and staff of Nashik Grapes Team for their contributions in preparing the Marathi.
---------------------------------------------------------------------------------
या वेबसाईटचा मुख्य हेतू असा कि या वेबसाईटच्या मदतीने वाचकांना स्वत: द्राक्षवेलीवरील अन्नद्रव्यांची कमतरता किंवा अतिरिक्त अन्नद्रव्यांचा परिणाम ओळखण्यास मद्दत करणे हा आहे.
तसेच निर्यातक्षम द्राक्षे तयार करतांना वेलीमध्ये निर्माण होणा-या अडचणींवर निदान करतांना या संकेतस्थळाची निश्चित मद्दत होईल. वेलीमध्ये  अन्नद्रव्याची कमतरता कशी कमी करता येईल याचे निदान होण्यासाठीया संकेतस्थळाची मदत होईल कारण प्रत्येक ठिकाणी तपासणीसाठी प्रयोगशाळा जवळच असतीलच असे नाही.शिवाय प्रयोगशाळेत पृथ:करण करून त्याचे निदान झाल्यावर त्याचा अहवाल मिळेपर्यत भरपूर वेळ जातो आणि अहवाल मिळण्यात सूक्ष्म घड निर्मितीचा काळ तसेच मणी वाढीचा कालावधी आणि मणी पक्व होण्याचा कालावधी हा अतिशय महत्वाचा कालावधी असतो. अशावेळी एक एक दिवस वाया गेलातर त्याचा परिणाम द्राक्ष वेलीच्या आरोग्यावर आणि द्राक्षांच्या एकूण उत्पन्नावर, तसेच गुणवत्तेवर होऊ शकतो. 
  मी नाशिक ग्रेप्स टीम व राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे यांचे कर्मचारी, अधिकारी यांच्या सहकार्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. 
---------------------------------------------------------------------------------
अधिक वाचा

प्रश्न तुमचे उत्तर तज्ञांचे


द्राक्ष बागेत काम करतांना अनेक समस्या येतात.या समस्यांसंदर्भात द्राक्ष बागायतदारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची तज्ञांनी दिलेली उत्तरे......


मातीचे आणि देठाचे पृथ:करण नियमीत करणे गरजेचे आहे काय?
-निदान करणे :अशा पध्दतीचे पृथ:करण वेलीमधील अन्नद्रव्यांचा असमतोलपणा, कमतरता व त्यांचे जास्त प्रमाण (विषमता) तपासण्यासाठी केली जाते.असे पृथ:करण केल्यास वेलीतील प्राकृतिक बिघाड कि,जो उत्पादकता कमी करतात,तो समजण्यासाठी मदत होते.कधी कधी वेलीमधील दोन पेक्षा अधिक मुलद्रव्यांची कमतरता आढळल्यास ती ओळखणे अवघड ज़ाते अशा वेळेस देठाचे पृथ:करण करणे जरुरीचे बनते.भुरी सारख्या रोगाचे लक्षण क़ि ज्यात पानांच्या बाहेरील बाजु आतमध्ये वळतात,पालाश कमतरतेशी मिळती जुळती असतात,द्राक्षबागायतदार अशा स्थितीत गोंधळून जातो.वेलीच्या मुळ्य़ांभोवती पाणी साठून राहिल्यास,तेथील हवा खेळती राहत नाही,आणि त्यात जर क्षारतेची भर पडली तर पाने तशीच लक्षणे दाखवतात. अशा पस्थितीत निरोगी वेल व आजारी वेल बाजुला करुन त्यांचे पृथ:करण केले जाते.त्यांचे नमुने एकत्र करण्यासाठी देखील निरोगी व आजारी वेल निवडली जाते.


निरीक्षण : अशा पध्दतीने पृथ:करण हे वेलीमधील अन्नद्रव्याची योग्य रितीने देखरेख करते. जेणे करुन आपणास परिणामी उत्पादन मिळते.यामुळे वेलींना लागणा-या अन्नद्रव्यांची चालु हंगामात गरज आणि अन्नद्रव्यांनवर निष्फळ खर्च कमी करता येतो. आपण सुक्ष्म घड निर्मीतीच्या वेळेस आणि घडांची फुलोरा अवस्थेत देठ पृथ:करण करण्यास शिफारस करतो,यामुळे वेलीमधील घडांचा दर्जा व उत्पादनासाठी लागणा-या अन्नद्रव्यांची निरीक्षणे करावयाची असल्यास, बागेत विशिष्ठ ठिकाण शोधुन प्रत्येक वेळेस त्याच वेलीवरुन नमुने गोळा करावेत.यामुळे अन्नद्रव्यांचे आणि त्यामुळे वेलीच्या उत्पादकतेचे निरीक्षण करणे देखील सोपे जाते.
मातीचे पृथ:करण हे हंग़ाम सुरु होण्य़ापूर्वी आणि खते देण्याआधी करुन घेणे महत्वाचे आहे, यामुळे जमीनीतील सामु,विद्युत वाहकता आणि विशिष्ठ मुलद्रव्यांचे कमी आधिक प्रमाण ओळखता येते,आणि त्याच प्रमाणात त्यांचे व्यवस्थापन करता येते.वेलीवरील संशोधनाद्वारे आपणाला असे निदर्शनास आले आहे की,वेलीतील गरज आणि जमिनीत असलेल्या अन्नद्रव्यांची मात्रा यांचा परस्पर संबंध हा एक सारखा नाही.म्हणूनच वेलीमधील अन्नद्रव्यांचे निरीक्षण क़ऱण्यासाठी देठ पृथ:करण करणे जरुरीचे आहे.


कलम यशस्वी होण्याकरिता कोणती परीस्थीती असावी?
- कलम यशस्वी होण्याच्या दृष्टीने बागेतील वातावरणात तापमान ३५ अंश से.पर्यंत व आद्रता ८० टक्क्यांच्यापुढे असणे मह्त्वाचे असते.खुंटकाडी ही पुर्ण परिपक्व झालेली नसुन,रसरशीत असल्यास त्या काडीतुन कलमजोडाच्या मध्यमातुन सायन काडीमध्ये रस पुढे जाईल व कॅलस लवकर तयार होण्यास मदत होईल.या गोष्टीसोबत कलम करणा-या कारागीराची कुशलता तेवढीच महत्वाची आहे.


कलम करण्याकरिता सायनकाडी (डोळ ) ही स्वमुळावरील की खुंटावरील वेलीवरुन घ्यावी?
- कलम करण्याकरीता सायनकाडी ही कोणत्याही प्रकारच्या वेलीवरुन घेतल्यास हरकत नाही.या मध्ये काडीची निवड क़ऱताना महत्वाचा मुद्दा हा आहे, की सायनकाडी परीपक्व झालेली असावी.ही काडी खुंटकाडीला मॅच होइल व मजबुत,फुगीर डोळे असलेली असावी.


रुटस्टॉक बागेतील काडया फारच बारीक असल्यास दोन काड्यांना जोडुन कलम करता येईल का?
-बागेत पुर्णपणे कलम यशस्वी होण्याकरीता काडीची जाडीसुध्दा तेवढीच महत्वाची आहे.बागेत एक दोन ट्क्के अशा दामनाच्या जाडीच्या( दोन-तिन एम एम) काड्यांनवर कलम करता येईल.यामधे फक्त प्रयत्न करता येईल.काही कलम यशस्वी होईल किंवा नाही याची जास्त खात्री नसेल.बागेत पुर्ण काड्या अशाच असल्यास शक्यतो कलम करु नये.


मी किती प्रमाणात खते वेलींना देऊ?
-वरती सांगितल्या प्रमाणे, वेलींना तंतोतंत प्रमाणात अन्नद्रव्ये देणे,हे वेलीच्या देठाचे व मातीचे परिक्षण क़ऱूण ठरवता येईल.वेलींना देण्यात येणा-या पाण्याचा दर्जा देखील काही प्रमाणात अन्नद्रव्ये व्यवस्थापनात मोलाचा वाटा निभावू शकतो,कारण बरीचशी मुलद्रव्ये ही पाण्यात असतात.याच्या पलीकडे कोणत्याही प्रकारची खते आपणाला द्यावयाची आहेत हे ठरवण्यासाठी पाण्याचा व मातीचा दर्जा देखील कारणीभूत ठरतो.


खुंटावर रंगीत जातीचे कलम करणे योग्य आहे का?
-बागेत असलेल्या पाण्याच्या व मातीच्या बिकट परिस्थीतीमुळे स्वमुळावरील बागेच्या उत्पादनात घट येत आहे.खुंट रोपांचा वापर सुरु झाल्यापासुन उत्पादनात वाढ झाली व सोबतच चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळु लागले.तेव्हा ,द्राक्ष जातीचा विचार न करता बागेत असलेल्या अडचणीचा विचार करुन कोणत्या खुंटाचा वापर करता येईल याकडे लक्ष द्यावे.


कलम केल्यानंतर डोळे फुटण्याकरीता किती कालावधी लागतो?
-कलम केल्यानंतर डोळे फुटण्याकरीता बागेतील वातावरण (तापमान व आद्रता) महत्वाचे असते.त्याच सोबत वापरलेली सायन काडी (डोळाची) कशी आहे, त्या काडीवरील डोळा कसा आहे, यावर ब-याच गोष्टी अवलंबुन आसतात.कलम केल्यानंतर काडी फुटायला साधारण बारा ते आठरा दिवसांचा कालावधी लागतो.


जिरणारा घड कसा समजावा?
-तीन-चार पानांच्या अवस्थेत आपल्याला घड बाहेर येतांना दिसतो.अशक्त घडाच्या तळात बाळी दिसेल व घडाचा आकार गोल दिसेल,रंग फिक्कट पिवळसर,असा घड जिरण्याची शक्यता जास्त असते.याच तुलनेत सशक्त अशा घडाचा आकार लाबट असेल व त्याच्या तळात बाळी नसेल.हा जोमदार असा न जिरणाऱा घड असेल.


घड जिरायला लाग़ताच काय करावे?
-फळछाटणी झाल्यानंतर चांगल्या वातावरणात सहा-सात दिवसानंतर डोळे फुटायला सुरुवात होते.बागेत पोंगा अवस्थेत जर वातावरण बिघडले असेल,म्हणजेच पाउस आला असेल,ढगाळी वातावरण असेल किंवा बागेत पाणी साचले असेल,अशा परीस्थीत वेलीमध्ये शरीरशास्रीय हालचालीमध्ये अडथळे येतात.पोंगा अवस्थेतील डोळ्यात सायटोकायीनचे प्रमाण कमी होउन जिबरेलीकचे प्रमाण वाढते,त्यामुळे घड जिरायला लागतो किंवा गोळी घड तयार होतो.अशा परीस्थीत बागेत सीसीसी व ६ बीए यांसारख्या संजिवकांची फवारणी करुन घड जिरण्यापासुन बागेला वाचवता येते.  


फेलफुट क़ाढण्याची योग्य वेळ क़ोणती?
-द्राक्षबागेत तिन ते चार पानांच्या फुटीनिघाल्या की घड दिसायला सुरवात होते.दोन दिवस पुन्हा थांबुन पाच पानांच्या अवस्थेत तो घड (जिरणाऱा क़िवा शसक्त) स्पष्टपणे दिसतो.तेव्हा अशा परीस्थीत फेलफुट काढुन घ्यावी यामुळे काडीतुन वाया जाणारे अन्नद्रव्ये घडाच्या वाढीकरता उपयोगात येईल. ही  फेलफुट काढण्याकरीता उशीर होणार नाही,याची बागायतदारांनी काळजी  घ्य़ावी,कारण या फुटी जेवढ्या कोवळ्या असतात,तेवढय़ाच अन्नद्रव्ये शोषुन घेण्याकरीता सक्षम असतात.     


अधिक वाचा
.........................................................