द्राक्ष शेतीतील नवे संकट

भारतात सन १९६५ च्याआसपास हरित क्रांती झाली. शेतीचे उत्पादन प्रचंड वाढून अन्नधान्य  उत्पादनात देश स्वयंपूर्ण झाला. त्यानंतर जवळपास ३० वर्ष शेतीत नवनवे प्रयोग होऊन उत्पादन वाढेले. मागील दशकापासून मात्र शेतीत विशेष परिवर्तन न होता शेती उत्पादनात सातत्याने घट होत असल्याचे निदर्शनास येत आहे. पहिल्या पेक्षा शेतकर-याचा शैक्षणिक दर्जा आता उंचावला आहे. प्रत्येक तंत्रज्ञानाच वापर आता शेतीत होत आहे. परंतु बदलत्या वातावरणात व वाढीव तापमानात शेतीत उत्पादनातील घट ही चिंतेची बाब झाली आहे.
  युरोपियन राष्ट्रामध्ये शेती तंत्रज्ञान सूक्ष्म पातळीवर पोहचले आहे. तेथील शेतक-यांना प्रत्येक कीडरोग मागील मुख्य कारण माहित झलेले आहे. व त्या रोगांची आणि किडींची नुकसानीची पातळी देखील अभ्यासली गेली आहे. त्याप्रमाणे भारत मागे असल्याचे निदर्शनास येते. 
  कीटकांच्या २० लाख प्रजाती पाठोपाठ सूत्रकृमिच्या जगात १० लक्ष प्रजातीच्या संख्येने आहे. व किमान पिकांना नुकसान पोहचविणारे सुमारे १ लक्ष सूत्रकृमी जगभर अभ्यासले गेले आहे,भारतात १९७२मध्ये सर्वेक्षण झाले त्यात ७०० सूत्रकृमी विविध पिकांवर अढळले असून त्यापैकी महाराष्ट्रात ७५ सूत्रकृमीच्या हानिकारक जाती अढळल्या आहेत. सूत्रकृमी बदलत्या वातावरणात आक्रमक झाल्यामुळे दिवसेंदिवस द्राक्ष, डाळींब,टोमॅटो सहित इतर भाजीपाला फळपिके व तृणधान्य प्रभावीत होत आहेत. कृषी उत्पादनातील होत असलेली घट व वाढत चाललेली खतांची गरज आणि वाढलेले कीडरोग व पिकांची कमी झालेली प्रतिकारक क्षमता यामागील नंबर एकचा शत्रू सूत्रकृमी असल्याचे लक्षात आले म्हणूनच महाराष्ट्रात खाजगी क्षेत्रात सूत्रकृमी तपासणीच्या प्रयोगशाळा सुरू केल्या आहे.
  आत्तापर्यंत महाराष्ट्रातील किमान ५००च्या वर माती नमुने व विवीध पिकांची सूत्रकृमी तपासणी करण्यात आली त्यात मुळावर गाठी करणारे व मुळावर गाठी न करणारे असे दोन्ही प्रकार महाराष्ट्रात मोठ्या व विविध पिकांवर आढळून आले आहे. सूत्रकृमी हे ०.३ ते ०.५ मी.मी इतके लांब सूक्ष्म जंनतासारखे असतात, ते उघडया डोळ्यांनी दिसत नाही. त्यामुळे पिकावर येणारे विविध रोग दिसल्यावर पीकसंरक्षण आपणाकडे केले जाते. सूत्रकृमी मध्ये नर व मादी असतात. त्यांचे प्रमाण १:१ असते. मादी २०० ते २५० अंडी मुळावर घालते. २ ते ३ दिवसात त्यातून जंतासारखे सूत्रकृमी बाहेर पडतात. पांढ-या मुळीवर ते स्टायलेट (तोंडाचा भाग) जखमा करतात. त्या जखमांवर बुरशी बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे द्राक्षवेलीची मूळकुज होते.द्राक्ष पिकात मूळकुजीमुळे पिकांचे कुपोषण होते मग असे झाड वातावरणानुसार प्रत्येक रोगास बळी पडते व रोग नियंत्रणाचा खर्च वाढत जातो. पिकांची समाधानकारक वाढ न झाल्याने खतांचा खर्च वाढतो. जमिनीतून अन्नद्रव्य देऊन देखील अन्नद्रव्यांचा कमतरता वेल दाखवते.जंत ३ ते ४ अवस्था २१ ते २५ दिवसांत पूर्ण करून त्या पासून पुढे मादी व नर तयार होतात. त्यांचे मिलन होऊन पुन्हा प्रत्येक मादी २०० ते २५० अंडी घालते.एक ग्रॅम मातीत दोन सूत्रकृमी आढळल्यास ते प्रमाण नुकसानीच्या तीव्रतीच्या पलीकडे समजले जाते. एक महिन्यात २५० याप्रमाणे दोन महिन्यात २५,००० तर तीन महिन्यात जवळपास २,५०,०० च्या संख्येने सूत्रकृमी पांढ-या मुळीवर जमिनीत वाढतात त्यामुळे सर्वसाधारण द्राक्ष पिकाचे किमान ३० ते ४० % इतके मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या सर्वेक्षनात अढळले आहेत. तर इतर पिके देखील सुत्रकृमींनी टारगेट केले आहेत.
  ज्या पिकांमध्ये करपा, व्हायरस, मूळकुज व समाधानकारक वाढ दिसून येत नाही त्या पिकांमध्ये सूत्रकृमी मुळावर गाठी करणारे व गाठी न करणारे अशा दोन्ही प्रकार आढळून येतात.
  अलिकडील संशोधकांच्या निष्कर्षानुसार ट्रायकोडर्मा हर्जीनियम व पॅसीलोमायसीस या बुरशी सुत्रीकृमी चांगल्या पैकी नियंत्रणात ठेवल्याचे आढळून येत आहे. द्राक्षातील मूळकुज व कमी फुगवण, मर ह्या समस्यांचे मूळ सूत्रकृमी हेच होय. सूत्रकृमी दलदलीच्या भागात, लोहाळा असणा-या जमिनीत मोठया संख्येने वाढतात. त्यांच्या नियंत्रणासाठी डेक्सट्रोजबेस रिप्लेस २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात किंवा एकरी एक किलो ह्या प्रमाणात पिकास सुरवातीच्या दिवसांत दिल्यास कृषी उत्पन्नातील घटत चाललेले टनेज रोखता येईल व गुणवत्तापूर्ण व निर्यातक्षम शेती उत्पादन कमी खर्चात व रोगमुक्त वातावरणात सहज घेता येईल.

1 आपली प्रतिक्रिया » :

Sujit kamble म्हणाले...

Mi 10 may la dogrj lavale ahe fut jorat ahe parantu vadh nahi

टिप्पणी पोस्ट करा

द्राक्ष बागे विषयी आपली कोणतीही समस्या आम्हाला लिहून पाठवा.आम्ही आपल्या समस्याचे निश्चितच निरसन करू.प्रश्न तुमचा उत्तर तज्ञाकडून दिले जाईल.

.........................................................