यशस्वी द्राक्ष उत्पादक होतांना

द्राक्ष शेती करतांना अनेक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करावा लागतो.यशस्वी द्राक्ष उत्पादक होण्यासाठी चांगले व्यवस्थापन,बाजाराचे नियोजन ,द्राक्ष पिकासंबंधीचा सतत अभ्यास व संशोधन,शेती करण्याची मनापासून प्रबळ इच्छा या गोष्टी ज्या शेतक-याकडे असतील,तो शेतकरी कधीच कर्जबाजारी होणार नाही.
द्राक्ष शेती करणे हा आता केवळ पारंपारिक शेती करण्याचा विषय नाही,अभ्यास,प्रचंड मेहनत,दक्षता घेऊन ही शेती करणे काळाची गरज आहे.बदलते हवामान,पीक परिस्थिती,तातडीने करावयाचे कामे याबाबद प्रचंड दक्ष असावे लागते.
द्राक्ष शेतीमधील काही महत्वाचे घटक:
१)पीक व्यवस्थापन: द्राक्षे पिकवताना पीक व्यवस्थापन फार मह्त्वाचे असते. यात खालीलप्रमाणे विभाग करून काम करावयाचे असते.खताचे व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापन शेणखता बाबदच्या नियंत्रणाविषयीचे व्यवस्थापन,मनुष्यबळ व्यवस्थापन.या बाबीचा सखोल अभ्यास करून द्राक्ष पिक पिकवण्याचे नियोजन करावे आणि अभ्यासपूर्ण नियोजन केल्यास उत्कृष्ट द्राक्ष हमखास तयार होतात.
२)बाजार व्यवस्थापन (विक्री व्यवस्थापन):
विक्री व्यवस्थापन करतांना अनेक बाजारांचा अभ्यास करावा लागतो.प्रत्यक्ष ग्राहकांच्या अपेक्षा काय आहेत.द्राक्ष खाणा-या लोकांच्या आवडीनिवडीचा अभ्यास करावा, द्राक्ष जर निर्यात करावयाची असल्यास त्या संबधीचा अभ्यास करून निर्यातीचे नियोजन करावे.
३) पिकासंबधीचा सतत अभ्यास:
काही द्राक्षांपासून बेदाणे बनविण्याचे नियोजन करावे.तसेच काही क्षेत्रावर रसा साठी द्राक्ष पिकवून उद्योग उभा करण्यास हरकत नाही.आज शेती व्यवस्थापन सगळीकडून अडचणीत असतांना धीराने त्यातून मार्ग काढणे गरजेचे आहे.अतिपावसात सुद्धा द्राक्ष शेती यशस्वी करता येते. 
-------------------------------------------------------------------------------------------------------------

0 आपली प्रतिक्रिया » :

टिप्पणी पोस्ट करा

द्राक्ष बागे विषयी आपली कोणतीही समस्या आम्हाला लिहून पाठवा.आम्ही आपल्या समस्याचे निश्चितच निरसन करू.प्रश्न तुमचा उत्तर तज्ञाकडून दिले जाईल.

.........................................................