द्राक्ष शेतीतील नवी दिशा

द्राक्ष खाणारा ग्राहक हाच केन्द्रबिंदू मानून: त्याच्या आवडी-निवडी,प्रांतानुसार भावणारी चव लक्षात घेऊन द्राक्षाचे उत्पादन घेतले पाहिजे ,प्रत्येक द्राक्ष उत्पादकाने निर्यातक्षम द्राक्ष आणि देशांतर्गत बाजारपेठेसाठी द्राक्ष या दोन बाबी भिन्न आहेत,हे लक्षात घेतले पाहिजे ....
नाशिक जिल्हात जवळपास ६० वर्षा पासून द्राक्ष शेती रुजली आणि ती आज मुख्य 'नगदी पिक ' म्हणून नावारुपाला आली आहे.आज संक्रमण काळातून जात असलेली ही शेती काही वेळा 'आपण का करतो 'असा प्रश्न शेतक-यांना पडतो.उत्पादन क्षमतेत खूप मोठा बद्दल झाला आहे.उत्पादन खर्चातही खुपमोठी तफावत पडत आहे.अर्थाजनासाठी ते आज 'आंबट-तुरट ठरत चाललेले आहे.
नाशिक जिल्हात जवळ जवळ एक लाख ५५ हजार एकरांवर द्राक्ष लागवड झाली आहे.त्यात प्रामुख्याने निफाड तालुका,दिंडोरी,चांदवड,येवला,इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या सर्व भागांत द्राक्ष आहेत.संपूर्ण जिल्हाच द्राक्ष शेतीसाठी जणू सरसवला.आज खाण्याची द्राक्ष थॉमसन,सोनाका,गणेश,शरद सीडलेस,प्लेम सीडलेस,आणि इतर अनेक जाती ,की ज्यात द्राक्ष बागायतदारांकडे देखील काही जाती विकसित झाल्याचे चित्र आहे.गेल्या दोन वर्षापासून  द्राक्षाचा ज्यूस किंवा द्राक्षावर प्रक्रिया करून काय पदार्थ तयार करता येतील यावर  द्राक्ष बागायतदार संघ अभ्यास करत आहे.खाण्याच्या द्राक्षात फार मोठी क्रांती झाल्याचे चित्र दिसते.
.
  पुढील काळात द्राक्षउत्पादकांना अधिक सतर्कता बाळगणे महत्त्वाचे आहे. द्राक्ष खाणारा ग्राहक हाच केंद्रबिंदू मानून त्याला आवडणारा माल, त्याला भावणारी चव आपण लक्षात घेतली पाहिजे. प्रत्येक द्राक्ष उत्पादकाने 'एक्स्पोर्ट ग्रेप्स' आणि 'डोमेस्टिक ग्रेप' या दोन बाबी भीन्न आहेत हे लक्ष्यात घेतले पाहिजे. निर्यात होणारी द्राक्ष ही टपोरी (मोठी) असतात. त्याच्यात साखरेचे प्रमाण १८ ब्रिक्स असते. तिची चव अंतर्गत मार्केटमध्ये ती २० ब्रिक्स डोमेस्टिक मार्केटमध्ये द्राक्षात पिवळा रंग अपेक्षीत असतो, तर निर्यातीसाठी ग्रीन रंग आपेक्षित असतो. मण्यांची साइज मिळण्यासाठी विशिष्ट संजीवके वापरावी लागतात. त्याचा अतिरेक झाल्यास द्राक्षाची साल जाड होते. अशी द्राक्षे चवीला तुरट लागतात. तेव्हा देशांतर्गत बाजारात द्राक्ष खाण्यालायक ठेवण्यासाठी संजीवकांचा संतुलित उपयोग पुढील काळात महत्वाचा ठरला पाहिजे.दूरच्या बाजारात द्राक्ष विक्रीस पाठवतांना त्याची कीपिंग क्वालिटी (प्रवासातील गुणवता) त्याच प्रमाणे मंडईत त्याचा तजेलेदार पणा कायम टिकवण्याच्या लोलिंग चेनदेखील पुढच्या काळात जास्त महत्वाची ठरणार आहे.
महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ आणि राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र(pune) यांच्या संयुक्त विधमाने गेल्या वर्षी कमी काळात तयार होणारी (९० दिवसात) त्याच प्रमाणे कमी जीए,तसेच जीए न देता चांगली साईज मिळणारी, सहजगत्या थिनिंग मिळणारी द्राक्षाची जात आयात केली आहे.तिचे संवर्धन करण्याचे काम द्राक्ष संघाच्या मांजरी फार्म (पुणे) येथे चालू आहे.आठ वर्षापूर्वी'२ ए-क्लोन 'ही जात संघाने दिलेली आहे.या जातीचे एक सारखे द्राक्षमणी व चांगली फुगवण हे या द्राक्षाचे वैशिष्ठ आहे.वरील जातीची द्राक्ष जेव्हा तयार होतील तेव्हा आज असलेला निर्यात द्राक्षाचा कालावधी वाढणार आहे.साधारण जानेवारी पासून एप्रिलपर्यत आपण द्राक्ष निर्यात करु शकू .अंतर्गत बाजारात देखील ग्राहकांना जास्त मिक्स जातीचा आस्वाद घेता येईल.द्राक्षउत्पादकांनी पुढील काळात उत्पादन खर्च कमी करणे,तसेच ग्राहक भिमुख उत्पादन करणे गरजेचे ठरणार आहे.अलीकडे द्राक्ष उत्पादक शेतकरी जमिनीची माती,पाणी,देठ परीक्षण करून योग्य त्या खतांचा वापर करु लागले आहे.औषधे व बुरशीनाशके प्रमाणित केलेल्या मात्रे प्रमाणे वापर करु लागले आहेत.तेव्हा देशांतर्गत देखील पुढच्या काळात औषधांचा अंश नसलेली द्राक्ष ग्राहकांना मिळणार आहेत.थोडक्यात संपूर्ण शास्रीय माहिती अंगीकारून द्राक्ष उत्पादक हा परिपूर्ण होईल.अशी आशा आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------   

0 आपली प्रतिक्रिया » :

टिप्पणी पोस्ट करा

द्राक्ष बागे विषयी आपली कोणतीही समस्या आम्हाला लिहून पाठवा.आम्ही आपल्या समस्याचे निश्चितच निरसन करू.प्रश्न तुमचा उत्तर तज्ञाकडून दिले जाईल.

.........................................................