द्राक्ष निर्यातीसाठी गुणवत्ता महत्वाची

द्राक्ष  हे भारतातील प्रमुख निर्यातक्षम पीक आहे .असे असले तरीही भारतातून फक्त दीड ते दोन टक्के एवढीच द्राक्ष प्रदेशात पाठवली जातात.द्राक्ष कमी निर्यात होण्याची कारणे अनेक आहेत.अभ्यासाअंती असे आढळून आलेली प्रमुख कारणे म्हणजे उच्च दर्जाची निर्यातक्षम गुणवता असलेली द्राक्षे कमी तयार होणे,जागतिकीकरणाने आणि मुक्त व्यापार पद्धतीमुळे निर्माण झालेल्या स्पर्धांमुळे आंतराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध न होणे,ही महत्वाची कारणे लक्षात घ्यावीत.
द्राक्षासाठी गुणवता,दर्जा:
  अधिक टिकाऊपणा,देखणे रूप व पाचकता या गोष्टी खाण्याची द्राक्ष निर्यात करण्यासाठी आवश्यक आहेत्त.थॉमसन सीडलेस या जाती करीता इंग्लडमध्ये निर्यात करण्यासाठी गुणवत्ता निकष ठरलेले आहेत.हेच निकष युरोपातील इतर देशांसाठी सुध्दा सारखेच आहेत.परंतु  इंग्लडमध्ये १७ ते १९ अंश ब्रिक्स असलेल्या हिरवट पोपटी रंगांच्या द्राक्षांना अधिक मागणी असते.तर इतर बाजार पेठेत (लोकल) मात्र पिवळसर सोनेरी  रंगाची १८ ते २१ अंश ब्रिक्स असलेल्या गोड द्राक्षांना चांगली मागणी असते.
किमान आवश्यकता :
 सर्व प्रकारच्या श्रेणीमध्ये घड व मण्यांच्या आवश्यकता:

  • गुणवता :खाण्याच्यादृतीने दर्जेदार द्राक्ष असावीत.
  • स्वच्छता: इतर पदार्थापासून किंवा धुळीचे कण यापासून मुक्ती असावीत.
  • कीड,रोगमुक्त व त्यांच्या इजापासून मुक्त असावीत.
  • बाह्य दुर्गंधीयुक्त किंवा खराब नसावी. 

 मण्यांच्या बाबतीत एकसंघता असावी,सुयोग्यवाढ असावी, सामान्य फुगवण असावी (१७ ते १९ एम एम ),उन्हाचे चट्टे नसावेत,घड काळजीपूर्वक तोडलेला असावा.घडाची वाढ पूर्ण असावी.मणी पक्व्व झालेले असावेत.घडाची आवस्था अशी असावी.की त्यामुळे घड हताळनी व वाहतुकीमध्ये चांगले राहावेत. ते ग्राहाकापर्यंत व्यवस्थित पोहचले पाहिजेत. 

गुणवत्ता दर्जा मिळवण्यासाठी उपाय :
 निर्यातक्षम द्राक्षाची जी गुणवत्ता ठरवण्यात आलेली आहे.ती गुणवत्ता मिळवण्यासाठी काही मशागतीची कामे तसेच योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.त्यात  एकसूत्रता नाही म्हणून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात वाढ करण्यासाठी अजूनसुद्धा भरपूर वाव आहे.
द्राक्षाच्या प्रतीसाठी जाती परत्वे घडाचा आकार ,घडाची भरण / घडातील मण्यांची रचना, मण्यांचा व्यास,मण्यांच्या रंगातील व आकारातील एकसारखेपणा, मण्यावर लव असणे किंवा नसणे ,मन्यांवरील डाग किंवा त्यावरील उन्हाचे चट्टे या सर्व बाबी उपयोगी ठरतात.
  त्याचप्रमाणे रासायनिक पदार्थांमध्ये एकूण विद्राव्य घटक ( TTS ) आम्लता ,तसेच कीटकनाशकांचे अंश या सुध्दा मह्त्वाच्या ठरतात.तसेच मण्यांचा टिकाऊपणा ,माण्यांतील गर ,देठाची जाडी व घडाचा देठ, मण्यांच्या देठासोबत असलेली पकड या गोष्टीसुध्दा साठवणुकीसाठी महत्वाच्या आहेत,म्हणूनच गुणवता ,दर्जा यावरही अवलंबून असतो.           

0 आपली प्रतिक्रिया » :

टिप्पणी पोस्ट करा

द्राक्ष बागे विषयी आपली कोणतीही समस्या आम्हाला लिहून पाठवा.आम्ही आपल्या समस्याचे निश्चितच निरसन करू.प्रश्न तुमचा उत्तर तज्ञाकडून दिले जाईल.

.........................................................